The Roe बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
तरीसुद्धा, याहवेह तुमचे परमेश्वर देत असलेल्या आशीर्वादाप्रमाणे तुम्ही तुमच्या नगरात तुमचे पशू ज्याप्रमाणे सांबर व हरिण मारून खाता त्याप्रमाणे पाहिजे तेवढे खा. विधिनियमानुसार अशुद्ध आणि शुद्ध असे दोघेही ते खाऊ शकतात.
सांबर, हरिण, भेकर, रानबोकड, रोही, गवा व डोंगरी मेंढा.
जेरुइयाहचे हे तीन पुत्रः योआब, अबीशाई आणि असाहेल तिथे होते. असाहेल हरिणीसारखा चपळ पायाचा होता.
गोठ्यात चारलेले दहा बैल, कुरणात चरणारे वीस बैल आणि शंभर मेंढरे व बोकडे, याशिवाय हरिण, सांबरे, भेकरे आणि पुष्ट पक्षी.
गादचे महान शूर वीरसुध्दा फितूर होऊन दावीद अरण्यवासात असताना त्याच्याकडे गेले. ते ढाली व भाले वापरण्यात निष्णात होते. त्यांचे चेहरे सिंहाच्या मुखासारखे असून ते डोंगरावरील हरणांसारखे चपळ होते.
प्रेमळ हरिणी सारखी, एक आकर्षक हरिणी अशी ती— तिचे स्तन तुला नेहमीच तृप्त करोत, तिच्या प्रेमाने तू नेहमी धुंद व्हावेस.
शिकार्याच्या हातातून निसटलेल्या हरिणासारखे, पारध्याच्या जाळ्यातून सुटलेल्या पक्ष्याप्रमाणे तू स्वतःला मुक्त कर.
माझा प्रियकर हरिणीसारखा किंवा तिच्या वत्सासारखा आहे. पाहा, तो तिथे आमच्या भिंतीआड उभा राहून, खिडक्यांतून न्याहळत आहे, जाळीतून डोकावीत आहे.
दिवस संपेपर्यंत आणि सावली जाईपर्यंत, खडतर पर्वतावरच्या हरिणांसारखा किंवा लहान वत्सासारखा हे प्रियतमा, माझ्याकडे परत ये.
तुझे स्तन दोन हरिणींसारखे आहेत, जुळ्या मृगांसारखे ते मनोरम आहेत, कमळपुष्पांमध्ये चरतात
तुझे स्तन दोन हरिणींसारखे आहेत, जुळ्या मृगांसारखे ते मनोरम आहेत.