मुख्य मजकुरावर जा

The Law of God बद्दल बायबलमधील वचने

30 वचने · 58 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून व दास्यातून बाहेर आणले, तो मीच याहवेह, तुमचा परमेश्वर आहे.

  2. “माझ्यासमोर तुम्हाला इतर कोणतेही देव नसावेत.”

  3. तुम्ही स्वतःसाठी वर आकाशातील, पृथ्वीवरील व पृथ्वीच्या खाली जलातील कशाचीही प्रतिमा करू नका.

  4. तुम्ही त्यांना नमन करू नये किंवा त्यांची उपासना करू नये; कारण मी, याहवेह तुमचा परमेश्वर, ईर्ष्यावान परमेश्वर आहे. जे माझा द्वेष करतात त्यांच्या लेकरांना तिसर्‍या व चौथ्या पिढीपर्यंत त्यांच्या आईवडिलांच्या पापांचे शासन करतो.

  5. परंतु जे माझ्यावर प्रीती करतात आणि माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांपर्यंत प्रीती करतो.

  6. याहवेह तुमच्या परमेश्वराचे नाव तुम्ही व्यर्थ घेऊ नका, कारण जे त्यांचे नाव व्यर्थ घेतात, त्यांना याहवेह शिक्षा दिल्यावाचून राहणार नाहीत.

  7. शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळून त्याची आठवण ठेवा.

  8. सहा दिवस तुम्ही परिश्रम करावेत आणि आपली सर्व कामे करावी.

  9. परंतु सातवा दिवस याहवेह तुमचे परमेश्वर यांचा शब्बाथ आहे. त्या दिवशी तुम्ही कोणतेही काम करू नये, तुम्ही किंवा तुमचा पुत्र किंवा कन्या, तुमचा दास किंवा दासी, तुमचे पशू किंवा तुमच्या नगरात राहणारा परदेशी यांनी देखील कोणतेही काम करू नये.

  10. कारण सहा दिवसात याहवेहने आकाश व पृथ्वी, सागर आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले, परंतु सातव्या दिवशी त्यांनी विश्रांती घेतली, म्हणून याहवेहने शब्बाथ दिवस आशीर्वादित करून तो पवित्र केला.

  11. आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान करा, म्हणजे जो देश याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत आहे, त्यात तुम्ही दीर्घकाळ राहाल.

  12. तुम्ही खून करू नका.

  13. तुम्ही व्यभिचार करू नका.

  14. तुम्ही चोरी करू नका.

  15. तुमच्या शेजार्‍याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नका.

  16. तुमच्या शेजार्‍याच्या घराचा लोभ धरू नका. तुमच्या शेजार्‍याच्या पत्नीची अभिलाषा धरू नका किंवा त्याच्या दासाचा किंवा दासीचा, किंवा त्याच्या बैलाचा किंवा त्याच्या गाढवाचा, किंवा त्याच्या मालकीचे जे काही असेल त्या कशाचाही लोभ धरू नका.

  17. “पण तुम्ही जे याहवेहचा त्याग करता आणि माझ्या पवित्र पर्वताला विसरता, जे भाग्य दैवतासाठी (गादसाठी) मेज पसरविता आणि विधिलिखितासाठी मिश्रित मद्य पात्रात ठेवता,

  18. तुमच्यासाठी मी तलवार तुमची नियती करेन, आणि तुम्ही सर्वजण तिच्या कत्तलीस बळी पडाल; कारण मी हाक मारली, तेव्हा तुम्ही उत्तर दिले नाही, मी बोललो पण तुम्ही ऐकले नाही. तुम्ही माझ्या डोळ्यादेखत पाप केले मला ज्याचा तिरस्कार आहे, नेमके तेच करण्याचे निवडले.”

  19. म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “माझ्या सेवकांना अन्न मिळेल, पण तुम्ही उपाशी राहाल; माझ्या सेवकांना पेय मिळेल, पण तुम्ही तहानेने व्याकूळ व्हाल. माझे सेवक हर्षोल्हास करतील, पण तुम्हाला लज्जास्पद केले जाईल.

  20. याहवेह म्हणाले, “कारण माझ्या लोकांनी माझ्या आज्ञांचा त्याग केला, जे मी त्यांच्यापुढे ठेवले होते; त्यांनी मला अनुसरण केले नाही व माझ्या नियमाचे पालन केले नाही.

  21. याउलट ते हट्टीपणाने मनाला येईल तसे वागले, आणि त्यांच्या पूर्वजांनी शिकविल्याप्रमाणे त्यांनी बआलच्या मूर्तीचे अनुसरण केले.”

  22. म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: “पाहा, मी त्यांना कडू अन्न खावयास घालेन आणि विषारी पाणी प्यावयास देईन.

  23. जे त्यांच्या पूर्वजांना माहीत नाही, अशा देशात मी त्यांची पांगापांग करेन, तिथे सुद्धा त्यांचा पूर्ण नायनाट करेपर्यंत माझी तलवार त्यांची पाठ सोडणार नाही.”

  24. येशूंनी उत्तर दिले, “ ‘प्रभू तुमचे परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण हृदयाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्ण मनाने प्रीती करा.’

  25. हीच सर्वात पहिली आणि महान आज्ञा आहे.