मुख्य मजकुरावर जा

The Law of God बद्दल बायबलमधील वचने: Punishment for disobeying

7 वचने · 58 पैलू

"The Law of God" साठी शोधा

Punishment for disobeying बद्दल वचने

  1. “पण तुम्ही जे याहवेहचा त्याग करता आणि माझ्या पवित्र पर्वताला विसरता, जे भाग्य दैवतासाठी (गादसाठी) मेज पसरविता आणि विधिलिखितासाठी मिश्रित मद्य पात्रात ठेवता,

  2. तुमच्यासाठी मी तलवार तुमची नियती करेन, आणि तुम्ही सर्वजण तिच्या कत्तलीस बळी पडाल; कारण मी हाक मारली, तेव्हा तुम्ही उत्तर दिले नाही, मी बोललो पण तुम्ही ऐकले नाही. तुम्ही माझ्या डोळ्यादेखत पाप केले मला ज्याचा तिरस्कार आहे, नेमके तेच करण्याचे निवडले.”

  3. म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “माझ्या सेवकांना अन्न मिळेल, पण तुम्ही उपाशी राहाल; माझ्या सेवकांना पेय मिळेल, पण तुम्ही तहानेने व्याकूळ व्हाल. माझे सेवक हर्षोल्हास करतील, पण तुम्हाला लज्जास्पद केले जाईल.

  4. याहवेह म्हणाले, “कारण माझ्या लोकांनी माझ्या आज्ञांचा त्याग केला, जे मी त्यांच्यापुढे ठेवले होते; त्यांनी मला अनुसरण केले नाही व माझ्या नियमाचे पालन केले नाही.

  5. याउलट ते हट्टीपणाने मनाला येईल तसे वागले, आणि त्यांच्या पूर्वजांनी शिकविल्याप्रमाणे त्यांनी बआलच्या मूर्तीचे अनुसरण केले.”

  6. म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: “पाहा, मी त्यांना कडू अन्न खावयास घालेन आणि विषारी पाणी प्यावयास देईन.

  7. जे त्यांच्या पूर्वजांना माहीत नाही, अशा देशात मी त्यांची पांगापांग करेन, तिथे सुद्धा त्यांचा पूर्ण नायनाट करेपर्यंत माझी तलवार त्यांची पाठ सोडणार नाही.”