- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
The Feast of the Passover बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
“इस्राएली लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग: ‘मी जो देश तुम्हाला देणार आहे, जेव्हा तुम्ही तिथे प्रवेश कराल आणि पिकांची कापणी कराल, तेव्हा तुम्ही कापणी केलेल्या पहिल्या धान्याची एक पेंढी याजकाकडे आणावी.
त्याने याहवेहसमोर पेंढी ओवाळावी, जेणेकरून ते तुमच्यावतीने मान्य केले जाईल; शब्बाथाच्या दुसर्या दिवशी याजकाने ते ओवाळावे.
आता ज्या दिवशी तुम्ही पेंढी ओवाळाल, त्याच दिवशी तुम्ही याहवेहला एक वर्षाच्या निर्दोष कोकर्याचे होमार्पण करावे.
त्याच्या धान्यासोबत, जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाच्या एक एफाचा दहावा भाग जैतुनाच्या तेलात मळून अर्पावा; हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे. त्यासोबत पावशेर हीन द्राक्षारसही याहवेहला अर्पण करावा.
तुम्ही आपल्या परमेश्वराला हे सर्व अर्पण आणल्याशिवाय पिकातील कोणताही भाग म्हणजे कोवळी कणसे, त्या धान्याच्या भाकरी किंवा भाजलेले दाणे यापैकी काहीही खाऊ नये. तुम्ही कुठेही राहिले तरी येणार्या पिढ्यांसाठी हा कायमचा नियम आहे.
नेमलेल्या वेळेस, म्हणजेच या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळी, त्यासंबंधी असलेल्या सर्व विधी नियमानुसार तो सण पाळावा.”
तेव्हा मोशेने इस्राएली लोकांना वल्हांडणाचा सण पाळावयास सांगितले.
त्याप्रमाणे सीनायच्या रानात, पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळी त्यांनी वल्हांडणाचा सण पाळला. जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याचप्रमाणे इस्राएली लोकांनी केले.
परंतु त्यांच्यापैकी काही व्यक्ती असे होते ज्यांना वल्हांडण सण पाळता आला नाही, कारण ते विधीनुसार मृत देहामुळे अशुद्ध झाले होते. म्हणून त्याच दिवशी ते मोशे व अहरोनकडे आले.
आणि मोशेला म्हणाले, “आम्ही मृत देहामुळे अशुद्ध झालो आहोत, परंतु इस्राएली लोकांबरोबर नेमलेल्या वेळी याहवेहला अर्पण सादर करण्यापासून आम्हाला का वंचित ठेवावे?”
मोशे त्यांना म्हणाला, “तुमच्याविषयी याहवेह काय आज्ञा देतील ते मी जाणून घेईपर्यंत तुम्ही थांबा.”
मग याहवेहने मोशेला म्हटले,
“इस्राएली लोकांना सांग: ‘जर तुमच्यातील किंवा तुमच्या गोत्रातील कोणी मृत देहामुळे अशुद्ध झाला किंवा दूर प्रवासात असला, त्यांनी तरीही याहवेहसाठी वल्हांडण सण पाळावा,
परंतु त्यांनी तो दुसर्या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळी पाळावा. त्यांनी बेखमीर भाकर व कडू पाल्याबरोबर वल्हांडणाचे कोकरू खावे.
याहवेहसाठी अन्नार्पण सादर करा, म्हणजेच दोन तरुण गोर्हे, एक मेंढा व एक वर्षाची सात कोकरे यांचे होमार्पण करा, हे सर्व निर्दोष असावे.
प्रत्येक गोर्ह्याबरोबर तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पीठ व मेंढ्याबरोबर दोन दशांश असे धान्यार्पण करावे.
व सात कोकर्यातील प्रत्येकासाठी, एफाचा एक दशांश अर्पावा.
आणि तुमच्यासाठी प्रायश्चित व्हावे म्हणून एक बोकड पापार्पण म्हणून अर्पावा.
ही अर्पणे सकाळच्या नियमित होमार्पणाखेरीज असावीत.
अशाप्रकारे सात दिवस दररोज याहवेहसाठी सुवास म्हणून हे अन्नार्पण करावे; नियमित होमार्पण व त्याचे पेयार्पण याबरोबरच ही अर्पणे अर्पावीत.
वल्हांडणाचा कोकरा त्यांनी दुसऱ्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी कापला. याजकांना आणि लेवीय लोकांना स्वतःची लाज वाटली आणि त्यांनी स्वतःला पवित्र केले आणि याहवेहच्या मंदिरात होमार्पणे आणली.
नंतर त्यांनी परमेश्वराचा मनुष्य मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांची नियमित पदे स्वीकारली. लेव्यांनी त्यांच्या हाती दिलेले रक्त याजकांनी वेदीवर शिंपडले.
जमलेल्या समुदायामधील पुष्कळ लोकांनी स्वतःला पवित्र केलेले नसल्यामुळे जे विधिपूर्वक शुद्ध झालेले नव्हते आणि त्यांना व त्यांच्या कोकऱ्यांना याहवेहसमक्ष पवित्र करू शकले नव्हते, त्यामुळे लेवीय लोकांनी त्या सर्वांकरिता वल्हांडणाच्या कोकरांचा वध केला.
एफ्राईम, मनश्शेह, इस्साखार आणि जबुलून येथून आलेल्या पुष्कळ लोकांपैकी बहुतेक लोकांनी स्वतःला शुद्ध केलेले नव्हते, तरीही जे लिहिलेले होते त्याविरुद्ध जाऊन त्यांनी वल्हांडण सणाचे अन्न खाल्ले. परंतु हिज्कीयाहने त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि म्हणाला, “याहवेह, जे चांगले आहेत, त्यांनी प्रत्येकांना क्षमा करावी.
जरी ते पवित्रस्थानाच्या नियमानुसार शुद्ध नसले तरीसुद्धा, ते त्यांचे अंतःकरण त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यांच्याकडे लावतात.”