मुख्य मजकुरावर जा

The Feast of the Passover बद्दल बायबलमधील वचने: Might be kept in the second month by those who were unclean at the appointed time

6 वचने · 43 पैलू

Might be kept in the second month by those who were unclean at the appointed time बद्दल वचने

  1. परंतु त्यांच्यापैकी काही व्यक्ती असे होते ज्यांना वल्हांडण सण पाळता आला नाही, कारण ते विधीनुसार मृत देहामुळे अशुद्ध झाले होते. म्हणून त्याच दिवशी ते मोशे व अहरोनकडे आले.

  2. आणि मोशेला म्हणाले, “आम्ही मृत देहामुळे अशुद्ध झालो आहोत, परंतु इस्राएली लोकांबरोबर नेमलेल्या वेळी याहवेहला अर्पण सादर करण्यापासून आम्हाला का वंचित ठेवावे?”

  3. मोशे त्यांना म्हणाला, “तुमच्याविषयी याहवेह काय आज्ञा देतील ते मी जाणून घेईपर्यंत तुम्ही थांबा.”

  4. मग याहवेहने मोशेला म्हटले,

  5. “इस्राएली लोकांना सांग: ‘जर तुमच्यातील किंवा तुमच्या गोत्रातील कोणी मृत देहामुळे अशुद्ध झाला किंवा दूर प्रवासात असला, त्यांनी तरीही याहवेहसाठी वल्हांडण सण पाळावा,

  6. परंतु त्यांनी तो दुसर्‍या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळी पाळावा. त्यांनी बेखमीर भाकर व कडू पाल्याबरोबर वल्हांडणाचे कोकरू खावे.