मुख्य मजकुरावर जा

The Feast of the Passover बद्दल बायबलमधील वचने

32 वचने · 43 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूंकडे आले आणि त्यांनी त्यांना विचारले, “वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कुठे करावी?”

  2. येशूंनी उत्तर दिले, “शहरात जा आणि या एका माणसाची भेट घ्या. त्याला सांगा की, ‘गुरुजी म्हणतात: माझी नेमलेली वेळ जवळ आली आहे. मी माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन तुझ्या घरी करेन.’ ”

  3. येशूंनी सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी केले आणि वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली.

  4. संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या बारा शिष्यांबरोबर मेजावर टेकून बसले होते.

  5. भोजन करीत असताना, येशूने भाकर घेतली आणि आशीर्वाद मागितल्यावर ती मोडली आणि आपल्या शिष्यांना दिली. मग ते म्हणाले, “घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे.”

  6. त्यांनी द्राक्षारसाचा प्याला हाती घेतला व त्याबद्दल आभार मानले आणि मग तो प्याला त्यांना दिला व म्हणाले, “तुम्ही प्रत्येकजण यामधून प्या;

  7. हे माझ्या कराराचे रक्त आहे. बहुतांना पापक्षमा मिळावी म्हणून ते पुष्कळांसाठी ओतले जात आहे.