मुख्य मजकुरावर जा

The Covenant बद्दल बायबलमधील वचने

74 वचने · 24 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मी त्याचे वंशज सर्वकाळ सुस्थापित करेन, त्याचे सिंहासन गगनमंडळाच्या अस्तित्वापर्यंत राहील.

  2. “जर त्याच्या मुलांनी माझ्या नियमांचा त्याग केला आणि माझे विधी पाळले नाहीत,

  3. माझ्या आज्ञेचे पालन केले नाही आणि माझे नियम भंग केले,

  4. मी त्यांच्या पापांचा छडीने समाचार घेईन, व दुष्कृत्यांसाठी चाबकाच्या फटकार्‍यांची शिक्षा करेन.

  5. पण मी माझी प्रेममयदया त्याच्यापासून कधीही काढून घेणार नाही व माझी सत्यता मी त्यागणार नाही.

  6. मी माझा करार मोडणार नाही; मी जे बोललो त्यातील एक शब्दही बदलणार नाही.

  7. सर्वकाळासाठी एकदाच दावीदाला माझ्या पवित्रतेची शपथ दिली— मी दावीदाशी खोटे बोलणार नाही—

  8. दावीदाचा वंश सर्वकाळ टिकेल आणि त्याचे सिंहासन माझ्यासमोर सूर्यासमान काळाच्या अंतापर्यंत राहील.

  9. आकाशातील विश्वसनीय साक्षीदार चंद्राप्रमाणे त्याचे सिंहासन युगानुयुग सुस्थिर राहील.” सेला

  10. तर याहवेह असे म्हणतात: “जे षंढ माझे शब्बाथ पवित्रपणे पाळतात, जे मला आवडणार्‍या गोष्टीच निवडतात, आणि माझा करार दृढ धरून राहतात—

  11. त्यांना मी माझ्या मंदिरामध्ये व त्याच्या भिंतीच्या आत पुत्र व कन्यापेक्षाही चांगले असे संस्मरणीय बनवेन व एक नाव देईन. त्यांना मी सर्वकाळ टिकणारे नाव देईन, जे नाव कधीही नाहीसे होणार नाही.

  12. आणि जे विदेशी याहवेहशी एकनिष्ठ राहतात, जे त्यांची सेवा करतात, त्यांच्या नावावर प्रीती करतात, आणि त्यांचे सेवक झाले आहेत, जे सर्व त्यांच्या शब्बाथास अपवित्र न करता त्याचे पालन करतात, आणि माझा करार दृढ धरून राहतात—

  13. अशांना मी माझ्या पवित्र पर्वतावर आणेन आणि माझ्या प्रार्थना मंदिरामध्ये त्यांना आनंदित करेन. त्यांच्या होमार्पणे व अर्पणांचा माझ्या वेदीवर स्वीकार केला जाईल; कारण माझ्या घराला सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनेचे घर असे म्हणतील.”

  14. “असे दिवस येतील जेव्हा, इस्राएलच्या लोकांशी व यहूदीयाच्या लोकांशी मी एक नवीन करार करेन,” याहवेह म्हणतात.

  15. “मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले, तेव्हा मी त्यांच्याशी केलेल्या कराराप्रमाणे हा करार नसेल. मी जरी त्यांचा पती होतो, तरी त्यांनी माझा करार मोडला.” असे याहवेह जाहीर करतात.

  16. “परंतु मी इस्राएलाच्या लोकांबरोबर करार करेन तो असा” याहवेह जाहीर करतात, “त्या वेळेनंतर मी माझा नियम त्यांच्या मनात ठेवेन, आणि ते त्यांच्या हृदयावर लिहेन, मी त्यांचा परमेश्वर होईन, आणि ते माझे लोक होतील.

  17. तरीही तुझ्या तारुण्याच्या दिवसांत मी तुझ्याशी केलेला करार मी स्मरण करेन आणि तुझ्याबरोबर सर्वकाळचा करार मी स्थापित करेन.

  18. आणि तुझ्यापेक्षा थोरल्या व धाकट्या बहिणींचे तू स्वागत करशील, तेव्हा तुला तुझे मार्ग आठवतील व तुला लाज वाटेल. तुझ्याबरोबरच्या माझ्या करारानुसार नसले तरी मी त्यांना तुझ्या मुलींप्रमाणे तुला देईन.

  19. तुझ्याशी मी आपला करार स्थापित करेन आणि मीच याहवेह आहे हे तू जाणशील.

  20. तुझ्यासाठी व जे सर्व तू केले त्यासाठी मी जेव्हा प्रायश्चित करेन, तेव्हा तुला आठवण होईल व लाज वाटेल आणि अवमानामुळे पुन्हा कधी आपले मुख उघडणार नाहीस, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”

  21. “प्रभूची स्तुती करा! इस्राएलाच्या परमेश्वराची स्तुती करा, कारण ते आपल्या लोकांकडे आले आहेत आणि त्यांनी त्यांच्यासाठी खंडणी भरली आहे.

  22. त्यांनी आपला सेवक दावीदाच्या घराण्यातून आपल्यासाठी तारणाचे शिंग उभारले आहे.

  23. जसे त्यांनी फार पूर्वी आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते—

  24. आमच्या शत्रूपासून आणि आमचा द्वेष करणार्‍या सर्वांच्या हातातून आमचा उद्धार करावा,

  25. आमच्या पूर्वजांवर दया करावी आणि त्यांच्या पवित्र कराराची आठवण करावी.