मुख्य मजकुरावर जा

The Covenant बद्दल बायबलमधील वचने: Ratified by the blood of Christ

12 वचने · 24 पैलू

Ratified by the blood of Christ बद्दल वचने

  1. परंतु जेव्हा चांगल्या गोष्टी ज्या आता येथे आहेत त्यांचा महायाजक म्हणून ख्रिस्त आले होते, जो मानवी हाताने केलेला नाही व जो या सृष्टीचा भाग नाही, अशा अधिक महान व अधिक परिपूर्ण मंडपाद्वारे आत गेले.

  2. त्यांनी परमपवित्रस्थानात शेळ्यांच्या आणि वासरांच्या रक्ताद्वारे प्रवेश केला नाही; परंतु स्वतःच्या रक्ताद्वारे एकदाच प्रवेश केला आणि अनंतकाळची मुक्ती मिळविली.

  3. जर शेळ्यांचे आणि बैलांचे रक्त किंवा कालवडींची राख विधिपूर्वक अशुद्ध असलेल्यांवर शिंपडल्यास ते बाह्यतः शुद्ध केले जाते.

  4. तर, सनातन आत्म्याद्वारे ज्याने परमेश्वराला स्वतःस निष्कलंक असे अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त मृत्यूस कारणीभूत असणारी कामे केल्याच्या टोचणीपासून आपल्या विवेकबुद्धीला शुद्ध करून परमेश्वराची सेवा करण्यास किती अधिक प्रवृत्त करेल!

  5. कारण मृत्युपत्र असले की ज्याने ते तयार केले आहे त्याचा मृत्यू झाला आहे हे सिद्ध होणे आवश्यक आहे.

  6. मृत्युपत्र एखाद्याच्या मृत्यूनंतर अंमलात येते. ज्याने ते मृत्युपत्र केले आहे तो जिवंत असेपर्यंत ते अंमलात येत नाही.

  7. या कारणासाठीच पहिला करार रक्ताशिवाय अंमलात आला नाही.

  8. जेव्हा मोशेने सर्व लोकांना नियम जाहीर केले, तेव्हा त्याने पाण्याबरोबर वासरांचे रक्त घेतले आणि किरमिजी लोकर व एजोबाच्या फांद्या त्यात बुडवून ग्रंथावर आणि सर्व लोकांवर ते शिंपडले.

  9. मग तो म्हणाला, “हे कराराचे रक्त आहे, तो पाळावा म्हणून परमेश्वराने तुम्हाला आज्ञा दिली आहे.”

  10. आणि त्याच प्रकारे त्याने दोन्ही मंडप व विधींसाठी जी उपकरणे वापरली जात, त्यावरही रक्तसिंचन केले.

  11. खरे म्हणजे, नियमाप्रमाणे अंदाजे प्रत्येक वस्तू रक्तसिंचन करूनच शुद्ध करण्यात येई; आणि रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा होत नाही.

  12. मग हे आवश्यक होते की, स्वर्गीय गोष्टींचे प्रतिरूप या बलिदानांने शुद्ध करणे अगत्याचे होते, परंतु स्वर्गीय गोष्टी याहून चांगल्या बलिदानांने शुद्ध करणे अगत्याचे अगत्य होते.