मुख्य मजकुरावर जा

The Armies of Israel बद्दल बायबलमधील वचने

137 वचने · 50 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि त्या प्रत्येक वस्तू ज्या अग्नीत टिकतात त्या अग्नीत टाकाव्या, मग त्या शुद्ध होतील. परंतु त्या शुद्धीकरणाच्या पाण्यानेही शुद्ध कराव्या. ज्या वस्तू अग्नीत टिकत नाहीत, त्या शुद्धीकरणाच्या पाण्यात घालून काढाव्या.

  2. सातव्या दिवशी तुम्ही आपली वस्त्रे धुवावीत म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल, मग तुम्ही छावणीत परत यावे.”

  3. दुसर्‍या दिवशी सकाळ होताच यहोशुआने इस्राएली लोकांना त्यांच्या गोत्रानुसार पुढे बोलाविले आणि यहूदाहचे गोत्र निवडण्यात आले.

  4. यहूदाहचे गोत्र पुढे आले आणि जेरहाचे कूळ निवडण्यात आले. त्याच्या कुळातील प्रत्येक कुटुंब पुढे आले आणि जब्दीचे घराणे निवडले गेले.

  5. मग जब्दीच्या घराण्यातील एकाएका पुरुषाला समोर आणण्यात आले आणि यहूदाहच्या वंशातील जेरहाचा पुत्र जब्दीचा पुत्र कर्मीचा पुत्र आखान निवडला गेला.

  6. तेव्हा यहोशुआ आखानास म्हणाला, “माझ्या मुला, याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचे गौरव कर आणि आपले पाप कबूल कर. तू काय केलेस ते मला सांग; माझ्यापासून काहीही लपवू नकोस.”

  7. तेव्हा आखानाने यहोशुआला उत्तर दिले, “खचितच मी याहवेह इस्राएलच्या परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे. मी जे केले ते हे:

  8. लुटीमध्ये मी एक सुंदर शिनारी झगा आणि दोनशे शेकेल चांदी, पन्नास शेकेल सोन्याची लगड या वस्तू पाहिल्या, तेव्हा त्या मला इतक्या हव्याशा वाटल्या की, मी त्या घेतल्या आणि त्या वस्तू माझ्या डेर्‍यात खाली जमिनीत पुरून ठेवलेल्या आहेत. झगा आणि सोने यांच्याहून चांदी सर्वात खाली पुरलेली आहे.”

  9. इस्साखारचे राजपुत्र दबोरा सोबत होते; होय, इस्साखार बाराक सोबत, रऊबेनच्या जिल्ह्यांमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली खोर्‍यामध्ये पाठविले अंतःकरणाचा बारकाईने शोध घेतला गेला.

  10. मेंढ्यांच्या कळपांची शिट्टी ऐकण्यासाठी तू मेंढवाड्यात का राहिलास? रऊबेनच्या जिल्ह्यांमध्ये अंतःकरणाचा बारकाईने शोध घेतला गेला.

  11. गिलआद यार्देनेपलीकडे राहिला, पण दान आपल्या जहाजांपाशीच का राहिला? आशेर सागरकिनारीच राहिला आणि खाडीतील त्याच्या सुरक्षित स्थळी राहिला.

  12. नंतर त्यांनी विचारले “मिस्पाह येथे याहवेहसमोर इस्राएलचा कोणता गोत्र आला नव्हता?” तेव्हा त्यांना कळून आले की, याबेश गिलआदातील लोकांपैकी कोणीही हजर नव्हते.

  13. कारण जेव्हा त्यांनी लोकांची मोजणी केली, त्यांना आढळून आले की याबेश गिलआदातील लोकांपैकी कोणीही तिथे नव्हते.

  14. म्हणून सभेने बारा हजार योद्ध्यांना सूचना देऊन याबेश-गिलआद येथे पाठविले आणि त्यांनी जाऊन तिथे राहणार्‍यांचा, स्त्रियांचा आणि लेकरांचा तलवारीने संहार करावा.

  15. तुम्हाला हे करावयाचे आहे ते म्हणाले, “सर्व पुरुष आणि स्त्रिया ज्या कुमारिका नाहीत त्या सर्वांना तुम्ही मारावे.”

  16. त्या दिवशी इस्राएल कष्टात होते, कारण शौलाने लोकांना असे म्हणत शपथबद्ध केले होते, “दिवस मावळण्यापूर्वी व मी माझ्या शत्रूंवर सूड घेईपर्यंत, जो कोणी भोजन करेल तो शापित होईल!” त्यामुळे सैन्यातील कोणीही अन्न चाखले नाही.

  17. सर्व सैन्य जेव्हा रानात गेले, त्यावेळी जमिनीवर मध पडलेले होते.

  18. जेव्हा ते आत जंगलात गेले, तेव्हा त्यांनी मध वाहत असलेले पाहिले; परंतु कोणीही आपला हात तोंडाला लावला नाही, कारण त्यांना शपथेचे भय होते.

  19. परंतु आपल्या पित्याने लोकांना शपथबद्ध केले आहे याविषयी योनाथानला माहीत नव्हते, म्हणून त्याने त्याच्या हातात असलेल्या काठीचे टोक मधाच्या पोळ्यात घातले व ते खाल्ले आणि त्याचे डोळे टवटवीत झाले.

  20. नंतर त्याला एका सैनिकाने सांगितले, “तुझ्या पित्याने सैन्याला सक्त शपथेने बद्ध केले की ‘आज जो कोणी भोजन करेल तो शापित होईल!’ म्हणूनच लोक खूप थकून गेले आहेत.”

  21. योनाथान म्हणाला, “माझ्या पित्याने देशावर कष्ट आणले आहे. हे थोडे मध चाखून माझे डोळे पाहा किती टवटवीत झाले आहेत.

  22. आपल्या शत्रूकडून मिळालेल्या लुटीतील लोकांनी काही खाल्ले तर किती बरे असते. पलिष्ट्यांचा संहार केल्याचा आनंद यापेक्षा मोठा असता काय?”

  23. त्या दिवशी मिकमाशपासून अय्यालोन पर्यंत पलिष्ट्यांना त्यांनी मारले होते, त्यामुळे ते अतिशय थकले होते.

  24. तेव्हा ते लुटीवर तुटून पडले, त्यांनी मेंढरे, गुरे व वासरे घेऊन त्यांना जमिनीवर कापले आणि ते रक्तासहित खाल्ले.

  25. मग कोणी शौलाला सांगितले, “पाहा, रक्तासहित मांस खाऊन लोक याहवेहविरुद्ध पाप करीत आहेत.” “तुम्ही विश्वासघात केला आहे,” तो म्हणाला, “एक मोठा दगड इकडे लवकर लोटत आणा.”