The, Are Compared To Wicked बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
त्यांच्या लोकांची शक्ती कमी होत गेली, ते निराश व लज्जित झालेले आहेत. ते शेतातील पिकासारखे, कोवळी पाने आलेल्या रोपासारखे, छतावर उगविलेल्या गवतासारखे, पूर्ण वाढण्याआधीच उन्हाने करपून गेलेले होते.
जसे रानगाढवाचे शिंगरू मनुष्याचा जन्म घेऊ शकत नाही तसेच अक्कलशून्य मनुष्य शहाणा होणार नाही.
तो स्वप्नासारखा विरून जाईल आणि पुन्हा सापडणार नाही. रात्रीच्या दृष्टांताप्रमाणे तो नाहीसा होईल.
ते कितीदा वार्यापुढे वाळलेल्या पेंढ्यांप्रमाणे असतात, व वादळापुढे उडविलेल्या भुशासारखे उडून जातात?
परंतु दुष्ट तसे नाहीत. ते वार्याने उडून जाणार्या भुश्यासारखे आहेत.
शिकार करण्यास उत्सुक असलेल्या उपाशी सिंहासारखे, दबा धरून बसलेल्या उग्र सिंहाप्रमाणे ते आहेत.
तुम्ही युद्ध करण्यासाठी जेव्हा प्रगट व्हाल, तेव्हा तुम्ही अग्नीच्या भट्टीमध्ये भस्म केल्यागत त्यांना नष्ट कराल. आपल्या क्रोधाने याहवेह त्यांना गिळंकृत करतील, याहवेहचा अग्नी त्यांना भस्म करेल.
अनेक बैलांनी मला घेरले; बाशानातील दांडग्या बैलांनी मला घेरलेले आहे.
कारण ते गवताप्रमाणे लवकर वाळून जातील, हिरवळीप्रमाणे ते शीघ्र नष्ट होऊन जातील.
मी एक वाईट व क्रूर मनुष्य पाहिला आहे. तो सुपीक जमिनीतील हिरव्यागार झाडासारखा पसरलेला होता.
परंतु लोकांची संपत्ती कितीही असली, तरी ते नाशवंत पशूसारखेच आहेत.
त्यांचे विष सर्पाच्या विषासारखे आहे, ते कान बंद ठेवणार्या नागसर्पांसारखे आहेत,
तुम्ही त्यांना धुरासारखे उडवून लावो— जसे अग्नी समक्ष मेण वितळते, तसे परमेश्वराच्या समक्षतेपुढून दुष्ट लोक नष्ट होवोत.
हे माझ्या परमेश्वरा, वावटळीच्या धुळीगत, वार्याने उडणार्या भुशागत त्यांना करा.
दुष्ट लोक गवताप्रमाणे जरी भराभर उगवतात व त्यांची भरभराट होते, तरी त्यांच्यापुढे केवळ अनंतकालचा नाशच आहे.
मूर्ती घडविणारे त्यांच्यासारखेच होतील, आणि त्यांच्यावर भरवसा ठेवणारेही तसेच होतील.
मधमाश्यांप्रमाणे ते माझ्याभोवती घोंगावत होते, पण जळत्या काटेरी झुडूपांसारखे ते लगेच जळून खाक झाले; याहवेहच्या नावाने मी त्यांचा नाश केला.
पृथ्वीवरील सर्व दुष्टांना तुम्ही एखाद्या गाळाप्रमाणे टाकून देता; म्हणूनच तुमचे नियम मला प्रिय आहेत.
वावटळ येते आणि निघून जाते, तसा दुष्ट नाहीसा होतो, परंतु नीतिमान सर्वकाळ स्थिर उभा राहतो.
जसा कुत्रा त्याच्या ओकारीकडे परत जातो तसाच मूर्ख पुन्हापुन्हा मूर्खपणा करतो.
गोड शब्द उच्चारणाऱ्या दुष्टाचे अंतःकरण चांदीचा मुलामा दिलेल्या मातीच्या पात्रासारखे आहे.
तुम्ही पाने कोमेजून गेलेल्या एलावृक्षासारखी, पाणी नसलेल्या बागेसारखे व्हाल.
सर्वसमर्थ याहवेहच्या क्रोधाने भूमी होरपळून जाईल आणि लोक त्या आगीचे इंधन होतील; ते एकमेकांना वाचविणार नाहीत.
परंतु तुला तुझ्या कबरेतून नको असलेल्या फांदीसारखे बाहेर टाकले आहे; ज्यांना तलवारीने भोसकून टाकले, जे दगडांच्या खड्ड्यात टाकण्यात येतात, ज्याप्रकारे माणसांची प्रेते पायाखाली तुडविली जातात तसे त्यांना तुमच्यावर झाकून टाकले आहे.
सार्वभौम याहवेह मला साहाय्य करतात. मला कोण दोषी ठरविणार? माझ्यावर आरोप करणारे सर्व जुन्या कपड्याप्रमाणे विरून जातील; कसर त्यांना खाऊन टाकेल.