मुख्य मजकुरावर जा

The, Are Compared To Wicked बद्दल बायबलमधील वचने

58 वचने · 55 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “अहो सापांनो! विषारी सापांच्या पिलांनो! नरक-दंडापासून स्वतःची सुटका कशी कराल?

  2. मग सर्व राष्ट्रे त्याच्यासमोर एकत्र होतील आणि मेंढपाळ मेंढरे व शेरडे वेगळे करतो तसा तो लोकांना एकमेकांपासून वेगळे करेल.

  3. “चांगल्या जातीचे झाड वाईट फळ देत नाही किंवा वाईट जातीचे झाड चांगले फळ देत नाही.

  4. परंतु हे लोक जे काही त्यांना समजत नाही त्या गोष्टींविषयी निंदा करीत असतात. ते उपजत निर्बुद्ध प्राणी पकडले जाऊन त्यांचा नाश व्हावा एवढ्यासाठी जन्मलेल्या पशूंसारखे स्वतःचा सुद्धा नाश करून घेतील.

  5. हे लोक कोरड्या झर्‍यांसारखे, वादळाने उडविलेल्या ढगांसारखे आहेत. त्यांच्यासाठी काळाकुट्ट अंधार राखलेला आहे.

  6. अशा लोकांसाठी या म्हणी खर्‍या आहेत: “कुत्रा त्याच्या ओकारीकडे परत जातो,” आणि “धुतलेली डुकरीण तिच्या चिखलात लोळण्यास परत जाते,” अशा म्हणींप्रमाणे त्यांची गत झालेली असते.

  7. हे लोक प्रीती भोजनात डाग, लपलेले खडक असून तुमच्याबरोबर जेवतात—केवळ स्वतःचे पोट भरणारे मेंढपाळ. ते निर्जल मेघासारखे वार्‍याने उडून जाणारे; शरद ऋतूत फळ न देणारे, दोनदा मेलेले आणि उपटलेल्या झाडांसारखे आहेत.

  8. ते समुद्राच्या लज्जास्पद फेस आणणार्‍या बेबंद लाटेसारखे; भटकलेल्या तार्‍यांसारखे, ज्यांच्यासाठी सर्वकाळचा काळाकुट्ट अंधार राखून ठेवलेला आहे.