मुख्य मजकुरावर जा

The Affections बद्दल बायबलमधील वचने: False teachers seek to captivate

7 वचने · 16 पैलू

False teachers seek to captivate बद्दल वचने

  1. आता मी माणसांची पसंती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे का, किंवा परमेश्वराची? किंवा मी लोकांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करीत आहे का? जर मी अजूनही लोकांना प्रसन्न करीत असतो तर मी ख्रिस्ताचा सेवक नसेन.

  2. ते लोक तुम्हाला आपल्या पक्षात घेण्यास उत्सुक आहेत, पण ते तुमच्या भल्यासाठी नाही. परंतु तुम्ही त्यांचे शिष्य व्हावे, म्हणून ते तुम्हाला आम्हापासून वेगळे करू पाहतात.

  3. ते अशा प्रकारचे लोक आहेत की ते घरांमध्ये शिरतात व पापांनी दबलेल्या, सर्वप्रकारच्या दुष्ट वासनांनी वेढलेल्या व सतत शिकत असूनही ज्यांना सत्य कधीही उमगले नाही, अशा स्त्रियांना वश करतील.

  4. हे शिक्षक त्यांच्या लोभापायी बनावट गोष्टी सांगून तुमच्याकडून पैसे मिळवतील. त्यांच्यासाठी नेमलेला दंड दीर्घकाळापासून त्यांच्यावर लटकत आहे आणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.

  5. कारण जेव्हा चुकीने वागणार्‍या लोकांमधून कोणी बाहेर पडले असतील, त्यांना हे लोक मूर्खपणाच्या, मोठ्या फुगीर गोष्टी बोलून आणि देहाच्या वासनांद्वारे कामातुरपणाने भुरळ घालतात.

  6. परंतु, माझ्याजवळ तुमच्याविरुद्ध काही गोष्टी आहेत: त्या या की, बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे काही लोक तुमच्यामध्ये आहेत. त्यांनी बालाकाच्या शिक्षणानुसार इस्राएली लोकांपुढे असे अडखळण केले की, जेणे करून त्यांनी मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खावा व लैंगिक अनीती करावी.

  7. परंतु, माझ्याजवळ तुमच्याविरुद्ध हे आहे: ईजबेल नावाची जी स्त्री स्वतःला संदेष्टी म्हणविते आणि लैंगिक अनीती करण्यास व मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खाण्यास माझ्या सेवकांना तिच्या शिकवणीने भुलविते, तिचे तुम्ही सहन करता.