Skip to content

Teraphim बद्दल बायबलमधील वचने

20 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. जेव्हा लाबान आपल्या मेंढरांची लोकर कातरण्यास गेला असताना, राहेलने आपल्या वडिलांच्या कुलदैवतांच्या मूर्ती चोरल्या.

  2. आता तुला जावेसे वाटते कारण तुझ्या नातलगांमध्ये परतण्याची तुला आतुरता आहे. पण तू माझी कुलदैवते का चोरलीस?”

  3. याकोबाने लाबानास उत्तर दिले, “मला भीती वाटत होती की तुम्ही आपल्या मुली माझ्यापासून बळजबरीने काढून घ्याल.

  4. पण ज्याच्याकडून तुम्हाला तुमची कुलदैवते मिळतील, तो जिवंत राहणार नाही. आपल्या नातेवाईकांच्या उपस्थितीत, माझ्याबरोबर येथे तुमचे काही आहे की नाही ते स्वतःच पाहा; आणि असल्यास, ते घ्या.” राहेलने त्या मूर्ती चोरल्या होत्या हे याकोबाला माहीत नव्हते.

  5. लाबान याकोबाच्या तंबूमध्ये गेला. लेआच्या तंबूमध्ये आणि मग दोन दासींच्या तंबूंमध्ये गेला, पण त्याला काही सापडले नाही. नंतर तो लेआच्या तंबूमधून निघून राहेलच्या तंबूमध्ये गेला.

  6. आता राहेलने त्या कुलदैवतांच्या मूर्ती चोरून आपल्या उंटाच्या खोगिरामध्ये लपवून ठेवल्या होत्या आणि ती त्या खोगिरावर बसली होती. लाबानाने तिच्या तंबूमध्ये कसून शोध केला तरी त्याला त्या सापडल्या नाहीत.

  7. राहेल त्याला म्हणाली, “बाबा मी तुमच्यापुढे उभी राहू शकत नाही कारण मी ॠतुमती आहे.” अशाप्रकारे त्याने शोध केला, परंतु त्याला कुलदैवतांच्या मूर्ती आढळल्या नाही.

  8. तेव्हा याकोबाला लाबानाचा खूप संताप आला. त्याने रागाने विचारणा केली, “माझा काय अपराध आहे? मी कोणता गुन्हा केला आहे, की तुम्ही माझा पाठलाग करीत आहात?

  9. माझ्या सर्व सामानाची झडती घेतलीत. आता मी तुमचे जे काही चोरले असेल, ते तुमच्या आणि माझ्या लोकांच्या पुढे ठेवा. त्यांनाच ते पाहू द्या आणि ते कोणाचे आहे हे ठरवू द्या.

  10. “वीस वर्षे मी तुमच्याबरोबर राहिलो. त्या काळात तुमच्या मेंढ्या व शेळ्या यांचा कधीही गर्भपात झाला नाही किंवा मी तुमच्या कळपातील एकाही एडक्याला खाल्ले नाही.

  11. मी तुमच्याकडे वनपशूंनी फाडलेले प्राणी आणले नाहीत; मी स्वतः नुकसान सहन केले आणि दिवसा किंवा रात्री जे काही चोरीला गेले त्याबद्दल तुम्ही माझ्याकडून भरून घेतले.

  12. म्हणून याकोब आपल्या सर्व कुटुंबीयांना व बरोबरच्या सर्वांना म्हणाला, “तुम्ही बरोबर आणलेल्या परक्या दैवतांचा नाश करा, शुद्ध व्हा, आपली वस्त्रे बदला.

  13. चला आपण आता वर बेथेलला जाऊ या. ज्या परमेश्वराने माझ्या संकटसमयी माझ्या प्रार्थनेचे उत्तर दिले आणि मी जिथे कुठे गेलो तिथे माझ्याबरोबर राहिले, त्या परमेश्वरासाठी मी तिथे एक वेदी बांधणार आहे.”

  14. तेव्हा त्या सर्वांनी आपल्याकडील इतर दैवताच्या मूर्ती व कर्णफुले याकोबाला दिली व त्याने ती शेखेमजवळ असलेल्या एका एला वृक्षाखाली पुरून टाकली.

  15. आता मीखाहचे एक देवघर होते आणि त्याच्याजवळ एक एफोद आणि काही कुलदेवता होत्या आणि आपल्या पुत्रांपैकी एकाची त्याने पुरोहित म्हणून नेमणूक केली.

  16. नंतर पाच व्यक्ती जे लईश हेरायला आले होते ते आपल्या दान भाऊबंदांना म्हणाले, “तुम्हाला माहीत आहे का या घरातील एका घरात एक एफोद, काही कुलदेवता आणि अनेक रुप्याचा मुलामा दिलेल्या मूर्ती आहेत? आता काय करावयाचे हे तुम्हाला माहीत आहे.”

  17. मग ते पाच पुरुष, जे तो देश हेरायला गेले होते, ते आत गेले आणि त्यांनी तेथील मूर्ती, एफोद, आणि कुलदेवता घेतली, जेव्हा पुरोहित आणि सहाशे सैनिक बाहेर प्रवेशद्वाराजवळ उभे होते.

  18. जेव्हा ते पाच पुरुष मीखाहच्या घरी गेले आणि त्यांनी मूर्ती, एफोद, आणि कुलदेवता उचलत असता, पुरोहित त्यांना म्हणाला, “तुम्ही हे काय करत आहे?”

  19. त्यांनी त्याला उत्तर दिले, “शांत राहा! एक शब्द सुद्धा बोलू नकोस. आमच्याबरोबर ये आणि आमचा पिता आणि पुरोहित हो. केवळ एका मनुष्याचा पुरोहित होऊन राहण्यापेक्षा, इस्राएलातील एक संपूर्ण गोत्र आणि वंशाचा पुरोहित होऊन राहणे अधिक चांगले नाही का?”

  20. तेव्हा त्या पुरोहिताला अतिशय आनंद झाला. त्याने एफोद, कुलदेवता आणि मूर्ती घेतली आणि तो त्या लोकांबरोबर गेला.