Micah
Micah चा उल्लेख असलेली वचने
एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात मीखाह नावाचा एक मनुष्य होता,
जेव्हा त्याने चांदी त्याच्या आईला परत केली, तिने दोनशे शेकेल चांदी घेतली आणि रौप्यकाराला दिली, जो त्याद्वारे मूर्ती बनवित असे आणि ती मीखाहच्या घरात ठेवण्यात आली.
आता मीखाहचे एक देवघर होते आणि त्याच्याजवळ एक एफोद आणि काही कुलदेवता होत्या आणि आपल्या पुत्रांपैकी एकाची त्याने पुरोहित म्हणून नेमणूक केली.
यहूदीयातील बेथलेहेम नगर सोडून राहण्यासाठी तो चांगलेसे ठिकाण शोधीत होता. प्रवास करत तो डोंगराळ भागात एफ्राईम देशातील मीखाहच्या घराजवळ आला.
मीखाहने त्याला विचारले, “तू कुठून आलास?” तो म्हणाला, “मी यहूदीयातील बेथलेहेम येथील एक लेवी आहे आणि मी राहण्यासाठी एक ठिकाण शोधत आहे.”
त्यावर मीखाह लेवीला म्हणाला, “तू माझ्यासोबत राहा आणि माझ्या पित्याचे आणि पुरोहिताचे कर्तव्य पार पाड. आणि मी तुला वर्षाचे दहा शेकेल चांदीचे नाणे, एकजोड कपडे आणि अन्न देईल.”
तेव्हा मीखाहने लेवीला शुद्ध केले आणि तो तरुण त्याचा पुरोहित झाला आणि त्याच्या घरात राहू लागला.
आणि मीखाहने म्हटले, “मला माहीत आहे की याहवेह माझे कल्याण करतील, कारण हा लेवी माझा पुरोहित झाला आहे.”
म्हणून दानच्या लोकांनी आपल्या गोत्रातून सोराह व एष्टाओल येथील पाच प्रमुख व्यक्तींना देश हेरायला व भेद घेण्यास पाठविले. हे लोक सर्व दानी लोकांचे प्रतिनिधित्व करीत होते. त्यांनी त्यांना म्हटले, “जा आणि देशाचा भेद घेऊन या!” मग त्यांनी एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात प्रवेश केला आणि ते मीखाहच्या घरी आले, जिथे त्यांनी रात्र घालविली.
जेव्हा ते मीखाहच्या घराजवळ पोहोचले, त्यांनी त्या तरुण लेवीचा आवाज ओळखला. त्यांनी त्याला बाजूला घेतले आणि विचारले, “तुला इथे कोणी आणले? या ठिकाणी तू काय करीत आहेस? तू येथे का आलास?”
त्याने त्यांना सांगितले की मीखाहने त्याच्यासाठी काय केले आणि त्याने म्हटले, “त्यांनी मला कामावर ठेवले आहे आणि मी त्यांचा पुरोहित आहे.”
तिथून ते एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात गेले आणि मीखाहच्या घरी आले.
म्हणून ते तिथे वळले आणि मीखाहकडील त्या तरुण लेवीच्या घरी जाऊन त्याला अभिवादन केले.
जेव्हा ते मीखाहच्या घरापासून काही दूर गेले असता, मीखाहचे शेजारी एकत्र आले आणि त्यांनी दानच्या लोकांना गाठले.
जेव्हा त्यांनी दानच्या लोकांना हाक मारली तेव्हा ते वळले आणि मीखाहला विचारले, “तुला काय झाले आहे की तू आपल्या लोकांना युद्ध करण्यास घेऊन आला आहेस?”
मग दानचे लोक आपल्या मार्गाने गेले आणि मीखाहने पाहिले ते लोक फार शक्तिशाली आहेत, तेव्हा तो माघारी फिरला आणि आपल्या घरी गेला.
मग मीखाहने जे बनविले होते आणि त्याच्या पुरोहितासह दानचे लोक लईश या शहरात येऊन दाखल झाले. तेथील लोक शांत आणि सुरक्षित होते. त्यांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला आणि त्यांचे शहर जाळून टाकले.