Jonathan बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
एक तरुण लेवी जो यहूदाह कुळातील यहूदीयातील बेथलेहेम नगरात राहत होता,
यहूदीयातील बेथलेहेम नगर सोडून राहण्यासाठी तो चांगलेसे ठिकाण शोधीत होता. प्रवास करत तो डोंगराळ भागात एफ्राईम देशातील मीखाहच्या घराजवळ आला.
मीखाहने त्याला विचारले, “तू कुठून आलास?” तो म्हणाला, “मी यहूदीयातील बेथलेहेम येथील एक लेवी आहे आणि मी राहण्यासाठी एक ठिकाण शोधत आहे.”
त्यावर मीखाह लेवीला म्हणाला, “तू माझ्यासोबत राहा आणि माझ्या पित्याचे आणि पुरोहिताचे कर्तव्य पार पाड. आणि मी तुला वर्षाचे दहा शेकेल चांदीचे नाणे, एकजोड कपडे आणि अन्न देईल.”
तो लेवी त्याच्यासोबत राहण्यास तयार झाला आणि त्याच्या पुत्रांपैकी एक असा तो राहू लागला.
तेव्हा मीखाहने लेवीला शुद्ध केले आणि तो तरुण त्याचा पुरोहित झाला आणि त्याच्या घरात राहू लागला.
आणि मीखाहने म्हटले, “मला माहीत आहे की याहवेह माझे कल्याण करतील, कारण हा लेवी माझा पुरोहित झाला आहे.”
शम्मयाचा भाऊ यादायाचे पुत्र: येथेर व योनाथान. येथेर हा पुत्रहीन मेला.
योनाथानचे पुत्र: पेलेथ व जाजा.