मुख्य मजकुरावर जा

Synagogues बद्दल बायबलमधील वचने

57 वचने · 27 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तिथे हात वाळून गेलेला एक मनुष्य उपस्थित होता. येशूंवर आरोप सिद्ध व्हावे म्हणून त्यांनी विचारले, “शब्बाथ दिवशी बरे करणे नियमानुसार आहे काय?”

  2. मेजवान्यात मानाची स्थाने आणि सभागृहांमध्ये प्रमुख जागेवर बसणे त्यांना प्रिय आहे.

  3. यास्तव मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी आणि शिक्षक पाठवित आहे. काहींचा तुम्ही वध कराल आणि क्रूसावर द्याल; काहींना सभागृहात फटके माराल आणि नगरोनगरी त्यांच्या पाठीस लागाल.

  4. इतक्यात, सभागृहामध्ये अशुद्ध आत्म्याने पछाडलेला एक मनुष्य ओरडला,

  5. मग ते सर्वत्र गालील प्रांतात प्रवास करीत, त्यांच्या सभागृहांमध्ये उपदेश करीत आणि दुरात्म्यांना बाहेर काढीत फिरले.

  6. त्यावेळी याईर नावाचा सभागृहाचा एक पुढारी आला, येशूंना पाहून त्यांच्या पाया पडला.

  7. ज्या नासरेथ गावी त्यांची वाढ झाली होती, तिथे ते आले व नेहमीप्रमाणे शब्बाथ दिवशी आपल्या प्रथेप्रमाणे सभागृहामध्ये पवित्रशास्त्र वाचण्यासाठी उभे राहिले.

  8. यशायाह संदेष्ट्याचे भविष्य असलेल्या अभिलेखाची गुंडाळी त्यांच्या हाती देण्यात आली आणि त्यांनी ती उघडली, ज्यात असे लिहिलेले होते:

  9. नंतर गुंडाळी गुंडाळून, ती सेवकाकडे दिली व ते खाली बसले. सभागृहामधील प्रत्येक व्यक्तीची नजर त्यांच्यावर एकवटली होती.

  10. येशू पुढे त्यांना म्हणाले, “हा शास्त्रलेख जो आज तुम्ही ऐकत आहात, तो पूर्ण झाला आहे.”

  11. कारण तो आमच्या राष्ट्रावर प्रेम करतो, एवढेच नाही, तर त्याने आमच्यासाठी सभागृह ही बांधून दिले आहे.”

  12. “ज्यावेळी तुम्हाला सभागृह, पुढारी, राज्यकर्ते यांच्यापुढे आणण्यात येईल, तेव्हा तुम्ही स्वतःचा बचाव कसा करावा व काय बोलावे याविषयी चिंता करू नका.

  13. एकदा शब्बाथ दिवशी येशू एका सभागृहामध्ये शिक्षण देत होते,

  14. तिथे एका स्त्रीला दुरात्म्याने अठरा वर्षे अपंग करून ठेवले होते. ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते.

  15. “तरी हे सर्व घडण्यापूर्वी, ते तुम्हाला पकडून तुमचा छळ करतील. माझ्या नावामुळे तुम्हाला सभागृहामध्ये नेतील व तुरुंगात टाकतील आणि तुम्हाला राज्यपाल आणि राजे यांच्यापुढे आणण्यात येईल.

  16. त्याचे आईवडील यहूदी पुढार्‍यांच्या भीतीमुळे असे म्हणाले, कारण त्यांनी आधी ठरविले होते की जे कोणी, येशू हा ख्रिस्त आहे, असे कबूल करतील, त्यांना सभागृहामधून बाहेर टाकण्यात यावे.

  17. तेव्हा यहूदी पुढारी म्हणाले, “तू जन्मापासून पापात बुडलेला आहेस आणि आम्हाला शिकवितोस?” आणि त्यांनी त्याला बाहेर घालविले.

  18. त्याच वेळेला पुष्कळांनी आणि पुढार्‍यांपैकी अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. परंतु परूश्यांमुळे ते आपला विश्वास व्यक्त करीत नव्हते. आपण सभागृहातून बहिष्कृत केले जाऊ असे त्यांना भय वाटत होते;

  19. कारण ते तुम्हाला सभागृहामधून काढून टाकतील आणि खरोखर, अशी वेळ येत आहे की, जे कोणी तुम्हाला जिवे मारतील त्यांना आपण परमेश्वराला सेवेचा यज्ञ अर्पण करीत आहोत असे वाटेल.

  20. परंतु लिबेर्तिन (असे ज्यास म्हणत होते त्या) सभागृहातील काही सभासद, कुरेनेकर, आलेक्सांद्रेयकर आणि किलिकिया व आशिया प्रदेशातील यहूदी लोक स्तेफनाबरोबर वादविवाद करू लागले.

  21. आणि दिमिष्क येथील सभागृहासाठी अशी पत्रे मागितली की, हा मार्ग अनुसरणारे कोणीही पुरुष किंवा स्त्रिया जर त्याला दिसून आले तर त्यांना बंदिवान करून यरुशलेमेत न्यावे.

  22. ताबडतोब तो सभागृहात गेला आणि येशू हे परमेश्वराचे पुत्र आहेत असा उपदेश करू लागला.

  23. सलमीस या शहरात आल्यानंतर, ते यहूदी लोकांच्या सभागृहांमध्ये गेले व त्यांनी परमेश्वराचे वचन जाहीर केले. योहान त्यांच्याबरोबर मदतनीस म्हणून गेला होता.

  24. ते पेर्गापासून पुढे पिसिदिया प्रांतातील अंत्युखियास गेले. शब्बाथ दिवशी ते सभागृहात गेले आणि तिथे खाली जाऊन बसले.

  25. नेहमीप्रमाणे नियमशास्त्र व संदेष्ट्यांच्या ग्रंथातून वाचल्यानंतर, सभागृहातील पुढार्‍यांनी त्यांना म्हटले: “बंधूंनो, आपल्याजवळ लोकांसाठी काही उत्तेजनपर वचन असेल तर कृपा करून आम्हास सांगा.”