मुख्य मजकुरावर जा

Synagogues बद्दल बायबलमधील वचने: Revival of, after the captivity

8 वचने · 27 पैलू

Revival of, after the captivity बद्दल वचने

  1. आता सर्व लोक जल वेशीसमोरील चौकात एकत्र जमले. आणि त्यांनी नियम शिकविणारा शिक्षक एज्राला विनंती केली की याहवेहने इस्राएली लोकांना दिलेले मोशेचे नियमशास्त्र त्याने बाहेर आणून सर्वांना वाचून दाखवावे.

  2. तेव्हा सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी एज्रा याजक मोशेचे नियमशास्त्र घेऊन बाहेर आला. ते कळण्यास समर्थ असलेले सर्व स्त्री-पुरुष सभेत एकत्र जमा झाले.

  3. सकाळपासून दुपारपर्यंत त्याने जल वेशीसमोरील चौकाच्या दिशेने आपले मुख करून समजण्यास समर्थ असे जितके लोक होते त्यासर्वांच्या समक्षतेत वाचन केले. सर्व लोकांनी नियमशास्त्र लक्षपूर्वक ऐकले.

  4. त्या प्रसंगासाठी खास तयार केलेल्या उंच लाकडी चौकटीवर एज्रा शिक्षक उभा राहिला. त्याच्या उजवीकडे मत्तिथ्याह, शमा, अनायाह, उरीयाह, हिल्कियाह व मासेयाह हे उभे होते; व त्याच्या डावीकडे पदायाह, मिशाएल, मल्कीयाह, हाशूम, हश्बद्दानाह, जखर्‍याह व मशुल्लाम हे उभे होते.

  5. एज्राने पुस्तक उघडले. प्रत्येकजण त्याला पाहू शकत होता, कारण तो इतरांपेक्षा जास्त उंचीवर उभा होता; तो उघडीत असताना सर्वजण उभे राहिले

  6. नंतर एज्राने महान परमेश्वर याहवेहची स्तुती केली आणि सर्व लोक आपले हात उंचाऊन उत्तरले “आमेन! आमेन!” आपली मस्तके लववून, भूमीकडे मुखे करून त्यांनी याहवेहची आराधना केली.

  7. लेवी—येशूआ, बानी, शेरेब्याह, यामीन, अक्कूब, शब्बथई, होदीयाह, मासेयाह, कलीता, अजर्‍याह, योजाबाद, हानान व पेलतियाह—यांनी तिथे उभे असलेल्या लोकांना नियमशास्त्राची माहिती स्पष्ट करून सांगितली.

  8. ते सर्व लोकांमध्ये जाऊन, वाचण्यात येणार्‍या परमेश्वराच्या नियमशास्त्रातील उतार्‍याचा अर्थ त्यांना समजावून सांगत होते.