Skip to content

Stars बद्दल बायबलमधील वचने

37 वचने · 12 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परमेश्वराने दोन मोठ्या ज्योती निर्माण केल्या—दिवसावर प्रभुत्व चालविण्यासाठी प्रखर आणि रात्रीवर प्रभुत्व चालविण्यासाठी सौम्य प्रकाश. त्यांनी तारेही निर्माण केले.

  2. जेव्हा तुम्ही वर आकाशाकडे बघाल आणि तुम्हाला सूर्य, चंद्र व तारे—आकाशातील सर्व नक्षत्र—दिसतील, तेव्हा त्यांची उपासना करण्याच्या आणि त्यांना दंडवत घालण्याच्या मोहात पडू नका. याहवेह तुमच्या परमेश्वराने आकाशाखाली असलेल्या पृथ्वीतलावरील इतर राष्ट्रांना ते वाटून दिले आहेत.

  3. त्यांनी याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या, सर्व आज्ञांचा त्याग केला आणि स्वतःसाठी दोन वासरांच्या मूर्ती घडविल्याआणि अशेरास्तंभ घडविले. सर्व नक्षत्रगणांची आणि बआल दैवताची उपासना केली.

  4. त्याचे वडील हिज्कीयाहने नष्ट केलेली उच्च स्थाने त्याने पुन्हा बांधली; इस्राएलचा राजा अहाबने केल्याप्रमाणे त्यानेही बआल दैवतांसाठी वेद्या आणि अशेराचे स्तंभ तयार केले. त्याने सर्व तारांगणांना लवून नमन केले आणि त्यांची उपासना केली.

  5. यहूदीयाच्या पूर्वीच्या राजांनी नेमलेल्या मूर्तिपूजक याजकांना त्याने ठार मारले. कारण त्यांनी यहूदीया आणि यरुशलेमच्या नगरातील टेकड्यांवरील मंदिरात धूप जाळलेला होता. त्यांनी बआल, सूर्य, चंद्र, तारे व ग्रह यांनाही धूप जाळला होता.

  6. ते सूर्याशी बोलतात आणि तो प्रकाशित होत नाही; ते तार्‍यांचा प्रकाश मुद्रित करतात.

  7. सप्तर्षी, मृगशीर्ष, कृत्तिका आणि दक्षिणेकडील नक्षत्रमंडळे यांचा तेच उत्पन्नकर्ता आहेत.

  8. केवळ त्यांच्या श्वासाने आकाशाला सौंदर्य लाभते; त्यांच्या हाताने वेगाने सळसळणार्‍या सर्पाला विंधले आहे.

  9. जेव्हा प्रभात तार्‍यांनी एकत्र गाणी गाईली आणि सर्व देवदूतांनी हर्षनाद केला तेव्हा तू कुठे होता?

  10. जेव्हा तुमच्या बोटांची रचना असलेल्या आकाशाकडे बघून मी विचार करतो, चंद्र आणि तारे यथास्थानी स्थापित केलेले पाहतो,

  11. याहवेहच्या शब्दाने स्वर्ग अस्तित्वात आला; त्यांच्या मुख श्वासाने सर्व नक्षत्रे निर्माण झाली.

  12. त्यांनी प्रचंड ज्योती निर्माण केल्या— त्यांची करुणा सनातन आहे.

  13. रात्रीवरील प्रभुत्वासाठी चंद्र व तारे निर्माण केले; त्यांची करुणा सनातन आहे.

  14. जोपर्यंत सूर्य आणि प्रकाश, आणि चंद्र आणि तारे अंधकारमय होत नाहीत, पावसानंतर ढग परत जात नाहीत;

  15. आकाशातील तारे आणि त्यांची नक्षत्रे त्यांचा प्रकाश देणार नाहीत. उगवता सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र त्याचा प्रकाश देणार नाही.

  16. आकाशातील सर्व तारे विरघळून जातील आणि आकाशे चर्मपत्राच्या गुंडाळीसारखे गुंडाळले जातील; द्राक्षवेलावरील कोमेजलेल्या पानांप्रमाणे, अंजिराच्या झाडावरील सुकून गेलेल्या अंजिरांप्रमाणे सर्व तारांगण गळून पडतील.

  17. यरुशलेममधील घरे व यहूदीयांच्या राजांचे राजवाडे तोफेतासारखे भ्रष्ट करेन—ज्या घरांच्या धाब्यांवर त्यांनी आकाशातील शक्तींना धूप जाळला व इतर दैवतांस पेयार्पणे वाहिली.’ ”

  18. तो आकाशाच्या सैन्यापर्यंत पोहोचेपर्यंत वाढला आणि त्याने काही ताऱ्यांचे सैन्य पृथ्वीवर फेकले आणि त्यांना तुडविले.

  19. पृथ्वी त्यांच्यापुढे कापते आणि आकाशे थरथरतात, सूर्य आणि चंद्र काळवंडतात, आणि तारे चमकणे सोडून देतात.

  20. सूर्य व चंद्र काळे पडतील आणि तारे यापुढे प्रकाशणार नाही.

  21. ज्यांनी कृत्तिका नक्षत्रे व मृगशीर्ष नक्षत्रे निर्माण केले, जे मध्यरात्रीचे रूपांतर पहाटेत करतात, आणि जे दिवसाचे रूपांतर रात्रीत करतात, जे समुद्राच्या पाण्यास बोलवितात आणि ते जमिनीच्या पृष्ठभागावर ओततात— याहवेह, हे त्यांचे नाव आहे.

  22. तुम्ही तुमच्या राजाचा देव्हारा, तुमच्या काइवान मूर्तीची बैठक, तुमच्या दैवताचा तारा उंचाविला; जो तुम्ही तुमच्यासाठी बनविला.

  23. जे त्यांच्या घरांच्या धाब्यांवर जातात आणि आकाशातील नक्षत्रांना नमन करतात. जे याहवेहला नमन करून त्यांची शपथ घेतात, आणि मोलेख दैवताचीही शपथ घेतात,

  24. “क्लेशांच्या काळाची समाप्ती झाल्यावर “ ‘त्या दिवसात, सूर्य अंधकारमय होईल, आणि चंद्र आपला प्रकाश देणार नाही; आकाशातून तारे गळून पडतील, आणि आकाशमंडळ डळमळेल.’

  25. आकाशातून तारे गळून पडतील, आणि आकाशमंडळ डळमळेल.’