Skip to content

Spirituality बद्दल बायबलमधील वचने

21 वचने · 6 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. याहवेह तुमच्या परमेश्वरावर तुमच्या पूर्ण हृदयाने, तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्णशक्तीने प्रीती करा.

  2. परंतु याहवेहचा सेवक मोशेने तुम्हाला दिलेल्या आज्ञा आणि नियमांचे काळजीपूर्वक पालन करा: याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करा, त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागा आणि त्यांच्या नियमानुसार चला, याहवेहला धरून राहा व तुमच्या सर्व अंतःकरणाने आणि तुमच्या संपूर्ण जिवाने त्यांची सेवा करा.”

  3. आणि म्हटले: “हे याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, वर स्वर्गात किंवा खाली पृथ्वीवर तुमच्यासारखा परमेश्वर नाही; जे आपले सेवक सर्व हृदयाने आपल्या मार्गात चालतात त्यांच्याशी आपण आपल्या प्रीतीच्या कराराची पूर्तता करतात.

  4. पण ज्यांचा आनंद याहवेहच्या नियमांचे पालन करणे, आणि त्यांच्या नियमावर रात्रंदिवस ध्यान करणे असतो.

  5. पाहा, अंतःकरणाची सत्यता तुम्हाला आवडते, म्हणून माझ्या खोल अंतर्यामाला तुमच्या ज्ञानाचे शिक्षण दिले.

  6. ज्यांचे मन स्थिर आहे, त्या तुम्हाला परिपूर्ण शांती मिळेल, कारण ते तुमच्यावर भरवसा ठेवतात.

  7. “ ‘तरी देखील, मी यरुशलेमला आरोग्य व स्वास्थ्य प्रदान करेन; मी त्यांना आरोग्य देईन व विपुल शांती आणि सुरक्षितेचा आनंद उपभोगू देईन.

  8. धन्य आहेत ते, ज्यांना नीतिमत्वाची तहान व भूक लागली आहे, कारण ते तृप्त केले जातील.

  9. परंतु वास्तविक, केवळ एकाच गोष्टीची गरज आहे. मरीयेने चांगला वाटा निवडून घेतला आहे तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.”

  10. नाशवंत अन्नासाठी कष्ट करू नका, तर जे अन्न सार्वकालिक जीवनासाठी टिकते व जे मानवपुत्र तुम्हाला देतो, ते मिळविण्यासाठी झटा, कारण परमेश्वरपित्याने आपल्या मान्यतेचा शिक्का त्यांच्यावर दिला आहे.”

  11. आणि मी पित्याजवळ मागेन, ते तुम्हाला मदत करण्यासाठी दुसरा कैवारी देतील, जो तुम्हाबरोबर सर्वकाळ राहील—

  12. सत्याचा आत्मा. त्याला जग स्वीकारणार नाही, कारण जग त्याला पाहत नाही व ओळखत नाही. परंतु तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो आणि तुम्हामध्ये राहील.

  13. यासाठी की जे देहाने नव्हे तर पवित्र आत्म्याप्रमाणे जीवन जगतात, त्यांच्यामध्ये नियमांसाठी आवश्यक असणारे नीतिमत्व पूर्ण व्हावे.

  14. मन दैहिक असणे म्हणजे मरण आहे; पवित्र आत्म्याने नियंत्रित मनाला जीवन व शांती लाभते,

  15. परमेश्वराचे राज्य खाणे व पिणे यात नाही, तर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद यात आहे.

  16. बंधू व भगिनींनो, वेळ थोडा आहे. यापुढे ज्यांना पत्नी आहे त्यांनी आपल्याला पत्नी नाही अशाप्रकारे राहावे.

  17. जे विलाप करतात त्यांनी जणू काही तो केला नाही असे समजावे; जे आनंदित आहेत ते जणू काही आनंदी नाहीत असे समजावे; जे विकत घेतात, त्यांनी स्वतःचे काही नसल्यासारखे समजावे.

  18. जे ऐहिक गोष्टींचा उपभोग घेतात, त्यांनी त्यातच गर्क होऊन जाऊ नये, कारण सध्याचे जग लयाला जात आहे.

  19. यास्तव, ख्रिस्ताबरोबर तुम्ही उठविले गेला आहात, तर जिथे ख्रिस्त परमेश्वराच्या उजवीकडे बसले आहे, तेथील वरील गोष्टींकडे आपली मने लावा.

  20. तुम्ही आपली अंतःकरणे स्वर्गीय गोष्टींकडे लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका.

  21. कारण तुम्ही मृत असून, आता तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर परमेश्वरामध्ये गुप्त ठेवलेले आहे.