Spirituality बद्दल बायबलमधील वचने: Brings indifference to worldly good
Brings indifference to worldly good बद्दल वचने
बंधू व भगिनींनो, वेळ थोडा आहे. यापुढे ज्यांना पत्नी आहे त्यांनी आपल्याला पत्नी नाही अशाप्रकारे राहावे.
जे विलाप करतात त्यांनी जणू काही तो केला नाही असे समजावे; जे आनंदित आहेत ते जणू काही आनंदी नाहीत असे समजावे; जे विकत घेतात, त्यांनी स्वतःचे काही नसल्यासारखे समजावे.
जे ऐहिक गोष्टींचा उपभोग घेतात, त्यांनी त्यातच गर्क होऊन जाऊ नये, कारण सध्याचे जग लयाला जात आहे.
यास्तव, ख्रिस्ताबरोबर तुम्ही उठविले गेला आहात, तर जिथे ख्रिस्त परमेश्वराच्या उजवीकडे बसले आहे, तेथील वरील गोष्टींकडे आपली मने लावा.
तुम्ही आपली अंतःकरणे स्वर्गीय गोष्टींकडे लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका.
कारण तुम्ही मृत असून, आता तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर परमेश्वरामध्ये गुप्त ठेवलेले आहे.