Skip to content

Seed बद्दल बायबलमधील वचने

54 वचने · 39 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग परमेश्वराने म्हटले, “भूमीतून वनस्पतीचा उपज होवो: निरनिराळी रोपे व झाडे, फळे देणारी व त्या फळातच स्वजातीचे बीज असणार्‍या फळझाडांचा भूमीतून उपज होवो” आणि तसे घडून आले.

  2. भूमीने वनस्पतीचा उपज केला: फळे देणारी व त्या फळातच स्वजातीचे बीज असणारी फळझाडे भूमीने उपजविली. परमेश्वराने पाहिले की हे चांगले आहे.

  3. मग परमेश्वर म्हणाले, “पाहा, भूतलावर बीज देणारी प्रत्येक वनस्पती आणि फळांमध्येच वृक्ष निर्माण करणारे बीज असलेले प्रत्येक फळझाड मी तुम्हाला दिले आहे. ती तुमचे अन्न होतील.

  4. तेव्हा याहवेह अर्पणाच्या सुगंधाने संतुष्ट झाले आणि आपल्या अंतःकरणात म्हणाले: “जरी लहानपणापासून मानवी हृदयाची प्रत्येक प्रवृत्ती वाईट आहे तरी मी मनुष्यामुळे जमिनीला पुन्हा कधी शाप देणार नाही आणि जसा मी केला आहे, तसा सर्व जिवंत प्राण्यांचा नाश यापुढे कधीही करणार नाही.

  5. “पृथ्वी अस्तित्वात आहे, तोपर्यंत वसंतॠतू व हंगामाचा काळ, थंडी व उष्णता, हिवाळा व उन्हाळा, दिवस व रात्र ही व्हावयाची थांबणार नाहीत.”

  6. इसहाकाने त्या देशात धान्य पेरले व त्याच वर्षी त्याला शंभरपट पीक मिळाले, कारण याहवेहने इसहाकाला आशीर्वादित केले.

  7. जर शेतात पेरण्याच्या बियाण्यांना त्यांच्या मृत शरीराचा स्पर्श झाला तर ते शुद्धच राहते;

  8. पण ओल्या बियाण्यावर मृतदेह पडले तर ते बियाणे तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.

  9. “ ‘माझ्या आज्ञा पाळा. “ ‘तुम्ही आपल्या पशूंना भिन्न जातीच्या जनावरांशी संग करू देऊ नये. “ ‘तुमच्या शेतात दोन प्रकारच्या बियांची पेरणी करू नका. “ ‘दोन प्रकारच्या कापडांपासून विणलेली वस्त्रे वापरू नयेत.

  10. पण सातव्या वर्षी जमिनीला शब्बाथ विश्रांती राहील; जो याहवेहसाठी शब्बाथ आहे. तुम्ही तुमच्या शेतात बी पेरू नका आणि तुमच्या द्राक्षमळ्यांची छाटणी करू नका.

  11. पन्नासावे वर्ष हे योबेल वर्ष असेल; आपोआप उगविलेल्या पिकांची कापणी करू नये किंवा छाटणी न झालेल्या द्राक्षवेलीची द्राक्षे गोळा करू नये.

  12. तुम्ही असे विचाराल, “जर आम्ही झाडे लावली नाही किंवा आमच्या पिकांची कापणी केली नाही, तर आम्ही सातव्या वर्षी काय खावे?”

  13. तर मी तुमच्यासोबत हे करेन: तुम्हाला एकाएकी भयंकर भीतीने ग्रासून टाकेन, तुम्हाला क्षयरोग होईल व असे भयंकर ज्वर तुम्हाला पछाडतील की त्यामुळे तुमचे नेत्र अंधुक होतील आणि तुमची शक्ती कोमेजून जाईल. तुम्ही केलेली धान्याची पेरणी व्यर्थ जाईल, कारण तुमचे पीक तुमचे शत्रू खाऊन टाकतील.

  14. “ ‘भूमीचा दशांश, मग ते शेतातील उत्पादन असो किंवा झाडांची फळे, याहवेहचे आहेत; ते याहवेहसाठी पवित्र आहेत.

  15. कारण ज्या देशात तुम्ही प्रवेश करणार आहात व तो ताब्यात घेणार आहात, तो देश तुम्ही सोडून आलेल्या इजिप्त देशातील भूमीसारखा नाही. तिथे तुम्ही पेरणी केली व भाज्यांचे मळे लावण्यासाठी जलसिंचन केले.

  16. तुमच्या द्राक्षमळ्यात तुम्ही दोन प्रकारचे बी पेरू नये; तसे केल्यास, दोन्हीही पिकेच नव्हे तर दोन्ही बीजे देखील दूषित समजल्या जातील.

  17. तुम्ही कष्ट करून वाढविलेली पिके एखादे परकीय राष्ट्र, ज्याचे नावही तुम्ही कधी ऐकले नाही, ते खातील. तुमची नेहमीच छळवणूक होईल व तुम्ही नेहमीच चिरडले जाल.

  18. तुम्ही पुष्कळ बी पेराल, पण थोडक्याच पिकांची कापणी कराल, कारण टोळ ते खाऊन टाकतील.

  19. तुमचा नाश होईपर्यंत ते तुमच्या गुराचे वत्स व तुमच्या भूमीचा उपज खाऊन टाकतील. तुमचे धान्य, नवीन द्राक्षारस, जैतुनाचे तेल, वासरे आणि कोकरे ही सर्व नाहीशी करून तुमचा पूर्णपणे नाश करतील.

  20. मी असे पाहिले आहे की, जे दुष्टाईची नांगरणी करतात आणि दुःख पेरतात तेच त्यांची कापणी करतात.

  21. जे अश्रूंनी पेरणी करतात, ते आनंदाने कापणी करतील.

  22. जे रडत पेरणीसाठी बी घेऊन जातात, ते आपल्या पेंढ्या घेऊन, आनंदाने हर्षगीते गात परत येतील.

  23. तू आपल्या धान्याची समुद्रावरून निर्यात कर; पुष्कळ दिवसांनी त्याचा मोबदला तुला लाभेल.

  24. जो वार्‍याकडे पाहत राहतो तो पेरणी करणार नाही आणि जो ढगांना पाहत राहतो तो कापणी करत नाही.

  25. तू आपले बी सकाळी पेर, आणि संध्याकाळीही आपल्या हातांना विसावा देऊ नकोस. कारण त्यातील कोणते फलदायी होईल, हे किंवा ते, किंवा ते दोन्हीही चांगले फळ देतील, हे तुला ठाऊक नाही.