Seed बद्दल बायबलमधील वचने: Illustrative
Illustrative बद्दल वचने
तू आपले बी सकाळी पेर, आणि संध्याकाळीही आपल्या हातांना विसावा देऊ नकोस. कारण त्यातील कोणते फलदायी होईल, हे किंवा ते, किंवा ते दोन्हीही चांगले फळ देतील, हे तुला ठाऊक नाही.
तुम्ही आपल्यासाठी नीतिमत्वाची पेरणी करा, न बदलणार्या प्रीतीचे फळ घ्या, आणि पडीक जमीन नांगरून टाका; जोपर्यंत ते येऊन तुमच्यावर नीतिमत्वाचा वर्षाव करत नाही तोपर्यंत, याहवेहला शोधण्याची हीच वेळ आहे.
परंतु हे लक्षात ठेवा जो कोणी राखून पेरतो, तर तो राखूनच कापणी करेल. जो उदारपणे बी पेरतो, तो उदारपणे कापणी करेल.
फसविले जाऊ नका; परमेश्वराचा उपहास करू शकत नाही. कारण मनुष्य जे पेरतो तेच कापतो!
जो देहाकरीता पेरतो, त्याला देहापासून नाशाचे पीक मिळेल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याला संतुष्ट करण्यासाठी पेरतो त्याला पवित्र आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल.