Skip to content

Scoffing बद्दल बायबलमधील वचने: General references

58 वचने · 1 पैलू

General references बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. राजाज्ञेनुसार, राजा आणि त्याच्या अधिकार्‍यांकडून पत्रे घेऊन संदेशवाहक संपूर्ण इस्राएल आणि यहूदीयामध्ये गेले, ज्यात लिहिले होते: “अहो, इस्राएलचे लोकहो, अब्राहाम, इसहाक आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेहकडे परत या, म्हणजे, अश्शूरी राजांच्या हातातून जे निसटले आहेत त्यांच्याकडे ते परत येतील.

  2. तुमच्या पालकांसारखे होऊ नका आणि तुमच्याबरोबर असलेल्या इस्राएली लोकांसारखे होऊ नका, जे त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहबरोबर अविश्वासू राहिले, त्यामुळे त्यांनी त्यांना उपहासाचे पात्र केले, जसे ते तुम्हाला दिसतात.

  3. तुम्ही तुमच्या पूर्वजांसारखे ताठ मानेचे होऊ नका. याहवेहना शरण जा. त्यांनी सनातनकाळासाठी पवित्र केलेल्या त्यांच्या पवित्रस्थानात या. तुमचे परमेश्वर याहवेहची सेवा करा, म्हणजे त्यांचा भयंकर क्रोध तुमच्यापासून दूर होईल.

  4. जर तुम्ही याहवेहकडे परत याल, तर तुमच्याबरोबर असणारे इस्राएली लोक आणि तुमच्या मुलाबाळांवर त्यांना कैद करणाऱ्यांकडून दया करण्यात येईल आणि ते या देशात परत येतील, कारण तुमचे परमेश्वर याहवेह हे कृपाळू आणि दयाळू आहेत. जर तुम्ही त्यांच्याकडे परत आलात तर ते तुमच्यापासून मुख फिरविणार नाहीत.”

  5. संदेशवाहक एफ्राईम आणि मनश्शेह येथील गावोगाव तसेच जबुलूनपर्यंत गेले, परंतु लोकांनी त्यांचा तिरस्कार केला आणि त्यांची थट्टा केली.

  6. परंतु त्यांनी तिथे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईपर्यंत परमेश्वराच्या संदेष्ट्यांची चेष्टा केली, याहवेहचा राग त्यांच्या लोकांविरुद्ध चेतवेपर्यंत त्यांच्या शब्दांचा तिरस्कार केला आणि त्यांच्या संदेष्ट्यांची थट्टा केली.

  7. तरी ते परमेश्वराला म्हणतात, ‘आमच्यापासून दूर जा! तुमचे मार्ग जाणून घेण्याची आमची इच्छा नाही.

  8. हा सर्वसमर्थ कोण आहे, की आम्ही त्यांची सेवा करावी? त्यांच्याकडे विनंती करून आम्हाला काय मिळणार?’

  9. इय्योबासारखा आणखी कोणी मनुष्य आहे काय, जो पाण्याप्रमाणे उपहास पितो?

  10. धन्य ते लोक, जे दुष्टांच्या मसलतीने चालत नाहीत, किंवा पापी लोकांच्या मार्गात उभे राहत नाहीत, आणि थट्टा करणार्‍यांच्या संगतीमध्ये बसत नाहीत.

  11. रात्र आणि दिवस, माझे अश्रू माझा आहार झाले आहेत. मला लोक सतत असे विचारीत आहेत. “कुठे आहे तुझा परमेश्वर?”

  12. माझे शत्रू दिवसभर थट्टेने मला विचारतात, “तुझा परमेश्वर कुठे आहे?” यामुळे माझ्या हाडांना नश्वर वेदना होत आहे.

  13. ते असेही म्हणतात, “परमेश्वराला कसे समजणार? परात्पर परमेश्वराला सर्व गोष्टीचे ज्ञान आहे काय?”

  14. ते परमेश्वराच्या विरोधात बोलले; ते म्हणाले, “परमेश्वर खरोखर वाळवंटात मेज लावू शकतात का?

  15. खरे आहे, त्यांनी खडकावर मारले, आणि पाण्याचे स्त्रोत फुटले, प्रचंड प्रवाह वाहू लागले; पण काय ते आम्हाला भाकरदेखील देऊ शकतात? काय ते आपल्या लोकांना मांस पुरवतील?”

  16. कारण त्यांनी परमेश्वराच्या आदेशाविरुद्ध बंडखोरी केली आणि परमोच्चाच्या योजनेला तुच्छ मानले.

  17. मग त्यांनी त्यांना कठोर परिश्रम करण्यास भाग पाडले; ते पडले आणि त्यांचे साहाय्य करण्यास कोणीही नव्हते.

  18. “अहो भोळ्यांनो, तुमच्या भोळेपणावर तुम्ही किती दिवस प्रीती करणार? कुचेष्टा करणारे तुम्ही कुचेष्टा करण्यात किती वेळ आनंद करणार आणि मूर्खांनो, किती काळ तुम्ही ज्ञानाचा द्वेष करणार?

  19. कारण तुम्ही माझा सल्ला जुमानला नाही. आणि माझे धमकाविणे स्वीकारले नाहीत,

  20. उपहास करणार्‍या गर्विष्ठांचा ते उपहास करतात, परंतु जे नम्र आणि पीडित आहेत त्यांच्यावर ते कृपा करतात.

  21. जर तू सुज्ञ असशील, तर तुझे सुज्ञान तुला बक्षीस देईल; जर तू टवाळखोर आहेस, तर तू एकटाच यातना भोगशील.

  22. सुज्ञ पुत्र आपल्या पित्याच्या शिक्षणाकडे काळजीपूर्वक लक्ष देतो, परंतु उपहास करणारा पुत्र फटकारास प्रतिसाद देत नाही.

  23. टवाळखोर ज्ञान शोधतो आणि ते त्याला मिळत नाही, परंतु ज्ञान विवेकी मनुष्याकडे सहजपणे येते.

  24. मूर्खांना पापक्षालन करणे म्हणजे थट्टा वाटते, परंतु नीतिमान लोकांमध्ये सदिच्छा असतात.

  25. निंदकांसाठी शिक्षा आणि मूर्खांची पाठ फटक्यांसाठी निर्धारित केली आहे.