- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Sanctification बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
“ ‘त्यांनी वेश्यावृत्तीने भ्रष्ट झालेल्या किंवा त्यांच्या पतीला घटस्फोट दिलेल्या स्त्रियांबरोबर विवाह करू नये; कारण याजक त्यांच्या परमेश्वरासाठी पवित्र आहेत.
त्यांना पवित्र मानावे, कारण ते तुमच्या परमेश्वराला अन्न अर्पण करतात. त्यांना पवित्र समजावे, कारण मी याहवेह पवित्र आहे—मीच आहे जो तुम्हाला पवित्र करतो.
“ ‘एखाद्या याजकाची कन्या वेश्याकर्म करून स्वतःला भ्रष्ट करते तर ती आपल्या पित्याला अशुद्ध करते, म्हणून तिला अग्नीत जाळून टाकावे.
“ ‘प्रमुख याजक, म्हणजे ज्याच्या मस्तकावर अभिषेकाचे तेल ओतण्यात आले आहे व जो याजकीय वस्त्रे घालण्यास पवित्र करण्यात आला आहे, त्याने शोक व्यक्त करण्याकरिता आपले केस मोकळे सोडू नयेत किंवा आपली वस्त्रे फाडू नये.
ज्या ठिकाणी मृतदेह असेल अशा ठिकाणी त्याने प्रवेश करू नये. मग तो त्याच्या वडिलांचा असो किंवा आईचा, त्याने स्वतःला अशुद्ध करू नये.
त्याच्या परमेश्वराचे पवित्रस्थान सोडू नये किंवा ते अपवित्र करू नये, कारण तो त्याच्या परमेश्वराच्या अभिषेकाच्या तेलाद्वारे समर्पित करण्यात आलेला आहे. मी याहवेह आहे.
“ ‘त्याने कुमारिकेबरोबरच विवाह करावा.
त्याने विधवा, घटस्फोटित किंवा वेश्यावृत्तीने भ्रष्ट झालेल्या स्त्रीसह विवाह करू नये, परंतु त्याने त्याच्या स्वतःच्याच वंशातील कुमारिकेशी विवाह करावा,
त्यामुळे तो त्याच्या लोकांमध्ये त्याचे वंशज अशुद्ध करणार नाही. मी याहवेह आहे, जो त्याला पवित्र करतो.’ ”
याहवेह मोशेला म्हणाले,
“अहरोनास सांग, ‘पिढ्यान् पिढ्या त्याच्या कुळातील शरीराने अपंग असलेल्या कोणीही अन्नार्पण करण्यासाठी परमेश्वराजवळ येऊ नये.
एखादा मनुष्य आंधळा, लंगडा, चपट्या नाकाचा, हातापायांना अधिक बोटे असलेला;
ज्याचा पाय किंवा हात तुटलेला आहे,
कुबडा, ठेंगणा, डोळ्यात कमतरता असलेला, त्वचेचे रोग असलेला व भग्नांड असून
तो अहरोन याजकाचा वंशज असला, तरी शारीरिक व्यंग असल्यामुळे त्याने याहवेहला अन्न अर्पिण्यास जाऊ नये; त्याच्यात कमतरता आहे; त्याने त्याच्या परमेश्वराजवळ अन्नार्पण करण्यासाठी जाऊ नये.
तरी त्याच्या परमेश्वराचे परमपवित्र अन्न व पवित्र अन्न तो खाऊ शकतो;
पण त्याला शारीरिक व्यंग असल्यामुळे त्याने पडद्यामागील परमपवित्रस्थानात किंवा वेदीजवळही जाऊ नये, त्याने तसे केल्यास, माझे पवित्रस्थान भ्रष्ट होईल, कारण त्यांना पवित्र करणारा मीच याहवेह आहे.’ ”
“ ‘याजकांनी माझी सेवा काळजीपूर्वक करावी, नाहीतर माझी सेवा निंदापूर्वक केल्याने त्यांना दोषी ठरवून मरणदंड भोगावा लागेल. त्यांना पवित्र करणारा मी याहवेह आहे.
“ ‘जर एखाद्याने याहवेहला आपले घर पवित्र म्हणून समर्पित केले आणि नंतर त्याची इच्छा असेल की, ते सोडवून घ्यावे, तर याजक त्या घराची चांगलीवाईट स्थिती पाहून त्याचे मूल्य ठरवेल, आणि घरमालक याजकाने ठरविलेली किंमत अधिक वीस टक्के भरून ते घर आपल्या ताब्यात घेईल.
And if he that sanctified it will redeem his house, then he shall add the fifth part of the money of thy estimation unto it, and it shall be his.
“ ‘जर कोणी त्यांच्या वतनाच्या शेताचा काही भाग याहवेहला समर्पित करीत असतील तर त्या शेतामध्ये किती बी पेरले जाऊ शकेल त्याप्रमाणे त्या शेताची किंमत ठरविली जाईल, एक होमेर जव पेरता येईल तेवढ्या भागाचे मूल्य चांदीचे पन्नास शेकेल होतील.
हे लक्षात ठेवा, विश्वासू सेवकांस याहवेहने स्वतःसाठी निवडून बाजूला ठेवले आहे; मी जेव्हा त्यांचा धावा करेन, तेव्हा ते माझे ऐकतील.
“मी तुला गर्भाशयात घडविण्याच्या पूर्वीपासून ओळखतो, तुझा जन्म होण्यापूर्वीच मी तुला समर्पित केले आहे; आणि राष्ट्रांकरिता माझा संदेष्टा म्हणून तुझी नेमणूक केली आहे.”
जेव्हा माझे पवित्रस्थान सदासर्वकाळ त्यांच्यामध्ये राहील, तेव्हा सर्व राष्ट्रे जाणतील की मी याहवेह इस्राएलला पवित्र करतो.’ ”
सत्याने त्यांना पवित्र करा; तुमचे वचन सत्य आहे.