Sanctification बद्दल बायबलमधील वचने: The Lord, the sanctifier
The Lord, the sanctifier बद्दल वचने
“इस्राएली लोकांना सांग, ‘तुम्ही माझे शब्बाथ अवश्य पाळावेत. येणार्या पिढ्यांपर्यंत हे माझ्या व तुमच्यामध्ये चिन्ह राहील, यासाठी की तुम्ही जाणावे की जो तुम्हाला पवित्र करतो, तो मीच याहवेह आहे.
तुम्ही माझे नियम पाळा आणि त्याचे पालन करा. मी याहवेह आहे, जो तुम्हाला पवित्र करतो.
त्यांना पवित्र मानावे, कारण ते तुमच्या परमेश्वराला अन्न अर्पण करतात. त्यांना पवित्र समजावे, कारण मी याहवेह पवित्र आहे—मीच आहे जो तुम्हाला पवित्र करतो.
“ ‘याजकांनी माझी सेवा काळजीपूर्वक करावी, नाहीतर माझी सेवा निंदापूर्वक केल्याने त्यांना दोषी ठरवून मरणदंड भोगावा लागेल. त्यांना पवित्र करणारा मी याहवेह आहे.