Skip to content

Sackcloth बद्दल बायबलमधील वचने

36 वचने · 21 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सीयोनकन्येचे वडीलजन मूकपणे जमिनीवर बसले आहेत; त्यांनी मस्तकांवर धूळ शिंपडून घेतली आहे आणि त्यांनी गोणपाट नेसले आहे. यरुशलेमच्या तरुणींनी माना खाली घातल्या आहेत.

  2. ते गोणपाट नेसतील आणि भयाचे वस्त्र घालतील. प्रत्येक चेहरा लज्जेने झाकला जाईल, आणि प्रत्येक डोक्याचे मुंडण केले जाईल.

  3. तेव्हा मी याहवेह परमेश्वराकडे वळून प्रार्थना आणि उपवास करून आणि गोणपाट नेसून आणि अंगाला राख फासून त्यांना विनंती केली.

  4. जशी एक कुमारी गोणपाट नेसून आपल्या तारुण्यातील प्रियकरासाठी करते, तसा तुम्हीही शोक करा.

  5. अहो याजकांनो, गोणपाट परिधान करा आणि शोक करा; वेदीची सेवा करणार्‍यांनो, विलाप करा. तुम्ही जी परमेश्वराची सेवा करता, या, गोणपाट परिधान करीत रात्र घालावा; कारण अन्नार्पणे व पेयार्पणे तुमच्या परमेश्वराच्या भवनात येणे बंद झाले आहेत.

  6. तेव्हा निनवेहच्या लोकांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला. सर्वत्र उपवास जाहीर केला आणि त्या सर्वांनी, मोठ्यांपासून लहानापर्यंत सर्वांनी गोणपाट परिधान केले.

  7. पण मनुष्याने आणि प्राण्याने गोणपाट घालावे. प्रत्येकाने त्वरित परमेश्वराचा धावा केला करावा आणि आपली वाईट कृत्ये आणि हिंसाचार सोडावा.

  8. “त्या दिवशी प्रत्येक खोटा संदेष्टा आपल्या भविष्यकथनाच्या दानाबद्दल लज्जित होईल. ते संदेष्ट्यांसाठी केसांनी बनविलेली विशिष्ट वस्त्रे घालणार नाहीत.

  9. योहानाचा पोशाख उंटाच्या केसांपासून तयार केलेला आणि त्याच्या कंबरेला चामड्याचा पट्टा बांधलेला होता. त्याचे भोजन टोळ आणि रानमध होते.

  10. मी पाहत असताना त्याने सहावा शिक्का फोडला, तेव्हा एक प्रचंड भूमिकंप झाला. सूर्य शेळ्याच्या केसांपासून तयार केलेल्या गोणपाटासारखा काळा झाला; चंद्र रक्तासारखा लाल झाला.

  11. आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना गोणपाट नेसून 1,260 दिवस भविष्य सांगण्यासाठी निवडणार आहे.”