मुख्य मजकुरावर जा

Sackcloth बद्दल बायबलमधील वचने: A symbol of mourning

11 वचने · 21 पैलू

A symbol of mourning बद्दल वचने

  1. त्याचे अधिकारी त्याला म्हणाले, “पाहा, आम्ही असे ऐकले आहे की इस्राएली राजे फार दयाळू असतात. तर आपण आपल्या कंबरेस गोणपाट नेसून आणि आपल्या डोक्याला दोरी बांधून इस्राएलच्या राजाकडे जाऊ, कदाचित तो तुझा जीव वाचवेल.”

  2. तेव्हा आपल्या कंबरेला गोणपाट नेसून व डोक्याला दोरी बांधून, ते इस्राएलच्या राजाकडे गेले व म्हणाले, “आपला सेवक बेन-हदाद म्हणतो: ‘कृपया मला जीवनदान द्यावे.’ ” राजाने म्हटले, “तो अजूनही जिवंत आहे काय? तो तर माझा भाऊ आहे.”

  3. “मी गोणपाटाने माझे शरीर झाकले आहे आणि माझे डोके धुळीला मिळविले आहे.

  4. रस्त्यांवर ते गोणपाट घालतात; छतावर आणि सार्वजनिक चौकांमध्ये ते सर्व आक्रोश करतात, विलाप करीत पालथे पडतात.

  5. म्हणून आपल्या अंगावर गोणपाट वेष चढवा, शोक व आक्रोश करा. कारण याहवेहचा महाभयंकर क्रोध अजून आमच्यावरून शमलेला नाही.

  6. माझ्या लोकांनो, गोणपाट धारण करा, आणि राखेत लोळा; एकुलत्या एका पुत्रासाठी आक्रोश करतो तसा आक्रोश कर. कारण संहारक सेना एकाएकी तुझ्यावर हल्ला करेल.

  7. “हेशबोना, आकांत कर, कारण आय शहर नष्ट झाले आहे! राब्बाहच्या रहिवाशांनो, तुम्ही आक्रोश करा! गोणपाटाची वस्त्रे धारण करून विलाप करा; भिंतीच्या आत इकडे तिकडे धावाधाव करा, कारण त्याच्या सरदारांसह व पुजार्‍यांसह दैवत मोलेख बंदिवासात जाईल.

  8. सीयोनकन्येचे वडीलजन मूकपणे जमिनीवर बसले आहेत; त्यांनी मस्तकांवर धूळ शिंपडून घेतली आहे आणि त्यांनी गोणपाट नेसले आहे. यरुशलेमच्या तरुणींनी माना खाली घातल्या आहेत.

  9. ते गोणपाट नेसतील आणि भयाचे वस्त्र घालतील. प्रत्येक चेहरा लज्जेने झाकला जाईल, आणि प्रत्येक डोक्याचे मुंडण केले जाईल.

  10. तेव्हा मी याहवेह परमेश्वराकडे वळून प्रार्थना आणि उपवास करून आणि गोणपाट नेसून आणि अंगाला राख फासून त्यांना विनंती केली.

  11. जशी एक कुमारी गोणपाट नेसून आपल्या तारुण्यातील प्रियकरासाठी करते, तसा तुम्हीही शोक करा.