Skip to content

Responsibility बद्दल बायबलमधील वचने

143 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जे मला नाकारतात व माझ्या वचनांचा स्वीकार करीत नाही; त्यांचा न्याय करणारे एकच आहे; जी वचने मी बोललो होतो तीच त्यांचा न्याय करतील.

  2. मी आलो नसतो व त्यांच्याशी बोललो नसतो, तर त्यांच्यावर पापाचा दोष नसता; परंतु आता त्यांना त्यांच्या पापासाठी काहीही सबब सांगता येणार नाही.

  3. जो कोणी माझा द्वेष करतो, तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो.

  4. जे कोणीही केले नाही, ते कार्य मी त्यांच्यामध्ये केले नसते, तर ते दोषी समजले गेले नसते. परंतु वस्तुस्थिती ही आहे की, त्यांनी आम्हा दोघांचा, म्हणजे माझा व माझ्या पित्याचा द्वेष केला आहे.

  5. पूर्वी परमेश्वराने अशा अज्ञानाकडे दुर्लक्ष केले, परंतु आता सर्व ठिकाणच्या लोकांनी पश्चात्ताप करावा अशी आज्ञा ते करीत आहे.

  6. कारण त्यांनी असा एक दिवस ठरविला आहे, त्या दिवशी ते त्यांनी नियुक्त केलेल्या मनुष्याच्या द्वारे या जगाचा न्याय नीतीने करतील. त्यांना त्यांनी मरणातून जिवंत करून या गोष्टींबाबत प्रत्येकाला खात्री करून दिली आहे.”

  7. मला दिलेल्या कृपेने मी तुम्हातील प्रत्येकाला सांगतो: स्वतःला वाजवीपेक्षा अधिक समजू नका, तर आपणास परमेश्वराने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणाप्रमाणे मर्यादेने स्वतःला माना.

  8. आपल्या सर्वांना जी कृपा दिली आहे, त्यानुसार आपल्याला वेगवेगळी दाने दिली आहेत. जर तुम्हाला परमेश्वराचे संदेश सांगण्याचे कृपादान असेल, तर तो संदेश आपल्या विश्वासानुसार सांगा.

  9. जर सेवा करण्याचे, तर सेवा करा. जर शिकविण्याचे, तर शिकवा.

  10. जर उत्तेजनाचे, तर उत्तेजन द्या; जर देण्याचे असेल, तर औदार्याने द्या; जर व्यवस्थापनाचे असेल, तर आस्थेने करा; जर करुणा करण्याचे, तर उल्हासाने करा.

  11. जो पेरतो व जो पाणी घालतो त्यांचा हेतू एकच आहे आणि त्या दोघांनाही त्यांच्या श्रमाचे प्रतिफळ मिळेल.

  12. तर त्या प्रत्येकाचे काम जसे आहे तसे दिसेल, कारण तो दिवस ते प्रकाशात आणेल. अग्नीद्वारे ते प्रकट होईल, प्रत्येकाचे काम कसे आहे हे अग्नीने पारखले जाईल.

  13. बांधलेले टिकून राहिले, तर बांधकाम करणार्‍याला त्याचे प्रतिफळ मिळेल.

  14. परंतु जर ते जळून गेले, तर बांधकाम करणार्‍याला हानी सोसावी लागेल; परंतु तो स्वतः वाचेल, परंतु जणू काय अग्नी ज्वालांमधून बाहेर ओढून काढल्यासारखाच वाचेल.

  15. आपल्यातील प्रत्येकाने आपापला भार वाहिला पाहिजे.

  16. तरी आपल्यापैकी प्रत्येकाला, ख्रिस्ताने नेमल्याप्रमाणे कृपा देण्यात आली आहे.

  17. हे तीमथ्या, जी ठेव तुला सोपविली आहे तिचे रक्षण कर आणि अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि ज्ञानाच्या फुशारक्या मारणार्‍याबरोबर मूर्खपणाचे वाद वर्ज्य कर.

  18. मी तिच्या लेकरांना ठार मारीन, म्हणजे सर्व मंडळ्यांना कळून येईल की, मी मने व अंतःकरणांची पारख करणारा आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाला मी ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईन.