Skip to content

Reed बद्दल बायबलमधील वचने

29 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह इस्राएलवर असा वार करतील की ते वाहत्या पाण्यावरील बोरूप्रमाणे होतील. जी चांगली भूमी मी त्यांच्या पूर्वजांना दिली, त्यातून मी त्यांना उपटून टाकीन व फरात नदीपलीकडे त्यांना पांगून टाकीन, कारण त्यांनी अशेराची खांब तयार करून याहवेहला क्रोधित केले आहे.

  2. पाहा, मला माहीत आहे की तू इजिप्तवर अवलंबून आहेस, पाहा, जी एक तुटलेली वेळूची काठी आहे, जो कोणी त्यावर टिकेल ती त्याच्या हाताला टोचणार! इजिप्तचा राजा फारोह, त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्या सर्वांसाठी असेच असल्याचे सिद्ध होते.

  3. कालव्यांना दुर्गंधी येईल; मिसरचे झरे ओसरतील आणि कोरडे होतील. लव्हाळे आणि वेळू सुकून जातील,

  4. तसेच नाईल नदीच्या काठावरील, नदिमुखावरील झाडेसुद्धा, नाईल नदीच्या काठावर पेरणी केलेले प्रत्येक शेत कोरडे होईल व उडून नाहीसे होईल.

  5. तप्त झालेली वाळू एक जलाशय होईल, आणि तहानलेल्या जमिनीवर उफाळणारे झरे येतील. जिथे कधी कोल्हे निजले, त्या जागी बोरू व लव्हाळे यासहित गवत उगवेल.

  6. पाहा, मला माहीत आहे की तू इजिप्तवर अवलंबून आहेस. पाहा, जी एक तुटलेली वेळूची काठी आहे, जो कोणी त्यावर टिकेल ती त्याच्या हाताला टोचणार! इजिप्तचा राजा फारोह, त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्या सर्वांसाठी असेच असल्याचे सिद्ध होते.

  7. चेपलेला बोरू तो मोडणार नाही. मिणमिणती वात तो विझविणार नाही. तो विश्वासूपणाने न्यायदान करेल;

  8. नदीवरील पूल जप्त करण्यात आले आहेत, दलदली जळत आहेत, सैन्य भयभीत झाले आहेत.”

  9. तेव्हा इजिप्तमध्ये राहणारे जाणतील की मीच याहवेह आहे. “ ‘तू इस्राएल लोकांसाठी बोरूच्या काठीप्रमाणे होतास.

  10. याहवेहने मला तिथे नेले आणि मी एक मनुष्य पाहिला जो कास्यासारखा दिसत होता; तो तागाची एक दोरी व मापन-दंड हातात घेऊन वेशीवर उभा होता.

  11. तो मनुष्य मला म्हणाला, “मानवपुत्रा, काळजीपूर्वक पाहा आणि जवळ येऊन ऐक आणि जे काही मी तुला दाखविणार आहे त्याकडे लक्ष दे, त्यासाठीच तुला येथे आणले गेले आहे. तू जे काही बघतो ते इस्राएली लोकांना सांग.”

  12. मंदिराच्या क्षेत्राच्या सभोवती असलेली भिंत मी पाहिली. त्या मनुष्याच्या हातात असलेला मापन-दंड सहा हात लांब होता, ते प्रत्येक माप एक हात आणि एक वीत होते. त्याने भिंतीचे माप घेतले; ते एक काठी जाडी व एक काठी उंच होती.

  13. मग तो पूर्वेकडील द्वाराकडे गेला. त्याने त्याच्या पायर्‍या चढून जाऊन द्वाराच्या उंबरठ्याचे माप घेतले; तो एक मापन-दंड होता.

  14. पहारेकर्‍यांची चौकी एक काठी लांब व एक काठी रुंद होती, आणि दोन्ही चौक्यांमध्ये पाच हात अंतर होते. आणि मंदिरासमोर असलेल्या देवडीजवळच्या द्वाराचा उंबरठा एका मापन-दंडा इतका होता.

  15. त्यानंतर त्याने मापन-दंडाने वेशीच्या देवडीचे माप घेतले;

  16. मी पाहिले की मंदिराला सभोवार उंच केलेला एक आधार होता, जो बाजूच्या खोल्यांसाठी पाया होता. तो मापन-दंडाच्या लांबीचा म्हणजेच सहा हात लांब होता.

  17. मापन-दंडाने त्याने पूर्वेकडील भाग मापला; तो पाचशे हात होता.

  18. त्याने उत्तरेकडील भाग मापला; तो मापन-दंडाने पाचशे हात भरला.

  19. त्याने दक्षिणेचा भाग मापला; तो मापन-दंडाने पाचशे हात होता.

  20. मग त्याने वळून पश्चिमेचे माप घेतले; ते मापन-दंडाने पाचशे हात होते.

  21. “ ‘जेव्हा तुम्ही भूमीची वतन म्हणून वाटणी कराल, तेव्हा तुम्ही भूमीचा एक भाग याहवेहसाठी एक पवित्र प्रदेश म्हणून समर्पित करावा, तो पंचवीस हजार हात लांब आणि वीस हजार हात रुंद असावा; तो संपूर्ण भाग पवित्र असावा.

  22. योहानाचे शिष्य निघून गेल्यावर येशू जमावाशी योहानाविषयी बोलू लागले. ते म्हणाले, “तुम्ही ओसाड अरण्यात काय पाहण्यासाठी गेला? वार्‍याच्या झोताने हलणार्‍या लव्हाळ्याला काय?

  23. जोपर्यंत तो न्याय विजयास आणणार नाही तोपर्यंत चेपलेला बोरू तो मोडणार नाही, मिणमिणती वात तो विझवणार नाही.

  24. मग त्यांनी काट्यांचा एक मुकुट गुंफला आणि त्यांच्या मस्तकांवर घातला. राजदंड म्हणून त्यांनी त्यांच्या उजव्या हातात एक काठी दिली आणि त्यांनी गुडघे टेकले आणि त्यांचा उपहास करीत ते त्यांना म्हणाले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!”

  25. ते त्यांच्या तोंडावर थुंकले, त्यांच्या हातात दिलेली काठी त्यांनी हिसकावून घेतली आणि त्यांच्या मस्तकावर वारंवार मारले.