Reed बद्दल बायबलमधील वचने: Used as a measuring device of six cubits
Used as a measuring device of six cubits बद्दल वचने
याहवेहने मला तिथे नेले आणि मी एक मनुष्य पाहिला जो कास्यासारखा दिसत होता; तो तागाची एक दोरी व मापन-दंड हातात घेऊन वेशीवर उभा होता.
तो मनुष्य मला म्हणाला, “मानवपुत्रा, काळजीपूर्वक पाहा आणि जवळ येऊन ऐक आणि जे काही मी तुला दाखविणार आहे त्याकडे लक्ष दे, त्यासाठीच तुला येथे आणले गेले आहे. तू जे काही बघतो ते इस्राएली लोकांना सांग.”
मंदिराच्या क्षेत्राच्या सभोवती असलेली भिंत मी पाहिली. त्या मनुष्याच्या हातात असलेला मापन-दंड सहा हात लांब होता, ते प्रत्येक माप एक हात आणि एक वीत होते. त्याने भिंतीचे माप घेतले; ते एक काठी जाडी व एक काठी उंच होती.
मग तो पूर्वेकडील द्वाराकडे गेला. त्याने त्याच्या पायर्या चढून जाऊन द्वाराच्या उंबरठ्याचे माप घेतले; तो एक मापन-दंड होता.
पहारेकर्यांची चौकी एक काठी लांब व एक काठी रुंद होती, आणि दोन्ही चौक्यांमध्ये पाच हात अंतर होते. आणि मंदिरासमोर असलेल्या देवडीजवळच्या द्वाराचा उंबरठा एका मापन-दंडा इतका होता.
त्यानंतर त्याने मापन-दंडाने वेशीच्या देवडीचे माप घेतले;
मी पाहिले की मंदिराला सभोवार उंच केलेला एक आधार होता, जो बाजूच्या खोल्यांसाठी पाया होता. तो मापन-दंडाच्या लांबीचा म्हणजेच सहा हात लांब होता.
मापन-दंडाने त्याने पूर्वेकडील भाग मापला; तो पाचशे हात होता.
त्याने उत्तरेकडील भाग मापला; तो मापन-दंडाने पाचशे हात भरला.
त्याने दक्षिणेचा भाग मापला; तो मापन-दंडाने पाचशे हात होता.
मग त्याने वळून पश्चिमेचे माप घेतले; ते मापन-दंडाने पाचशे हात होते.
“ ‘जेव्हा तुम्ही भूमीची वतन म्हणून वाटणी कराल, तेव्हा तुम्ही भूमीचा एक भाग याहवेहसाठी एक पवित्र प्रदेश म्हणून समर्पित करावा, तो पंचवीस हजार हात लांब आणि वीस हजार हात रुंद असावा; तो संपूर्ण भाग पवित्र असावा.
मग मला एक मापनपट्टी देण्यात आली आणि मला सांगण्यात आले, “जा परमेश्वराच्या मंदिराचे आणि वेदीचे मोजमाप उपासकांसहित घे.
नगरी, वेशी व तटबंदी यांचे मोजमाप घेण्यासाठी देवदूताच्या हातामध्ये सोन्याची एक मोजकाठी होती.
ती नगरी चौरस होती. म्हणजे तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती, देवदूताने नगरीचे माप काठीने घेतले. ते लांबीला 2,200 किलोमीटर भरले. तिची रुंदी व उंची समान होती.