Skip to content

Profane Swearing बद्दल बायबलमधील वचने

23 वचने · 11 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. याहवेह तुमच्या परमेश्वराचे नाव तुम्ही व्यर्थ घेऊ नका, कारण जे त्यांचे नाव व्यर्थ घेतात, त्यांना याहवेह शिक्षा दिल्यावाचून राहणार नाहीत.

  2. इस्राएली स्त्रीच्या मुलाने परमेश्वराच्या नावाची निंदा केली आणि तो शिव्याशाप देऊ लागला; तेव्हा त्याला मोशेकडे आणले. (त्याच्या आईचे नाव शेलोमीथ होते, ती दान वंशातील दिब्रीची कन्या होती.)

  3. याहवेहच्या नावाची जो कोणी निंदा करेल त्याला निश्चित जिवे मारावे. संपूर्ण मंडळीने त्याच्यावर दगडमार करावा. परदेशीय असो किंवा देशात जन्मलेला, जेव्हा ते परमेश्वराच्या नावाची निंदा करतात त्यांना निश्चित जिवे मारावे.

  4. मग मोशे इस्राएली लोकांसोबत बोलला आणि त्यांनी त्या निंदा करणार्‍याला छावणीबाहेर नेले आणि त्याच्यावर दगडमार केला. याहवेहने मोशेला आज्ञापिल्यानुसार इस्राएली लोकांनी केले.

  5. याहवेह तुमच्या परमेश्वराचे नाव तुम्ही व्यर्थ घेऊ नका, कारण जे त्यांचे नाव व्यर्थ घेतात, त्यांना याहवेह शिक्षा दिल्यावाचून राहणार नाहीत.

  6. इकडे परमेश्वराचा मनुष्य अलीशाचा सेवक गेहजी स्वतःस म्हणाला, “माझ्या धन्याने या अरामी नामानाकडून नजराणे न स्वीकारता त्याला असेच जाऊ दिले. जिवंत याहवेहची शपथ, आता मी स्वतः त्याच्यामागे पळत जाईन आणि त्याच्यापासून काहीतरी घेईन.”

  7. लबाडी व धमक्यांनी त्याचे मुख भरलेले आहे; त्याच्या जिभेखाली उपद्रव आणि दुष्टता आहे.

  8. त्यांच्या मुखाने केलेली पापे, त्यांच्या ओठांचे शब्द आणि त्यांनी दिलेल्या शापांमुळे व लबाड्यांमुळे त्यांना स्वतःच्या अहंकारात अडकू द्या.

  9. इतरांना शाप देणे त्याला आवडत असे— म्हणून त्याचे शाप त्याच्यावरच उलटू द्या. इतरांचे हितचिंतन करण्यात त्याला आनंद वाटत नसे— म्हणून त्याचेही हित न होवो.

  10. त्याने शापाला आपली वस्त्रे म्हणून पांघरली; ते त्याच्या शरीरात पाण्यासारखे, व त्याच्या हाडात तेलासारखे शिरले.

  11. सर्व देश व्यभिचाऱ्यांनी व्यापून टाकला आहे; कारण शाप त्यांच्यावर येऊन भूमी ओसाड झाली आहे. अरण्यातील हिरवीगार कुरणे वाळून गेली आहेत, कारण संदेष्टे दुष्कर्मे करतात आणि त्यांचे सामर्थ्य अयोग्य रीतीने वापरतात.

  12. इस्राएली लोकहो, याहवेहचे वचन ऐका. या देशात राहणार्‍यांवर याहवेहचा आरोप आहे: या देशात विश्वासूपणा नाही, प्रीती नाही, परमेश्वराप्रती ज्ञान नाही.

  13. या ठिकाणी फक्त शाप, खोटे बोलणे आणि खून, चोरी आणि व्यभिचार आहे; सर्व सीमाबंदी ते मोडून टाकतात, आणि रक्तपातानंतर रक्तपात होतो.

  14. म्हणूनच तुमची भूमी कोरडी पडत आहे, येथे राहणारे सर्व नाश पावत आहे; रान पशू, आकाशातील पक्षी आणि समुद्रातील मासे नाहीसे होत आहेत.

  15. परंतु मी तुम्हाला सांगतो, शपथ वाहू नका. स्वर्गाची नव्हे, कारण ते परमेश्वराचे सिंहासन आहे.

  16. किंवा पृथ्वीची, कारण ते त्यांचे पायासन आहे; किंवा यरुशलेमची, कारण ती थोर राजाची नगरी आहे,

  17. आणि स्वतःच्या मस्तकाचीही शपथ वाहू नका, कारण तुम्हाला एक केसही पांढरा किंवा काळा करता येत नाही.

  18. “आंधळ्या मार्गदर्शकांनो, तुमचा धिक्कार असो! ‘परमेश्वराच्या मंदिराची शपथ घेऊन तुम्ही म्हणता, मंदिराची शपथ मोडली तरी चालेल, पण मंदिरातील सोन्याच्या शपथेने मात्र तो बांधील आहे.’

  19. आणि ज्यावेळी तुम्ही मंदिराची शपथ वाहता, त्यावेळी मंदिराबरोबरच मंदिरात राहणार्‍या परमेश्वराचीही शपथ वाहता.

  20. ज्यावेळी तुम्ही स्वर्गाची शपथ वाहता, त्यावेळी तुम्ही परमेश्वराच्या सिंहासनाची आणि खुद्द परमेश्वराची शपथ वाहता.

  21. हे ऐकून पेत्र शाप देऊ लागला व शपथ घेऊन त्यांना म्हणू लागला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही.” तेवढ्यात कोंबडा आरवला.

  22. “त्यांची मुखे तर शापाने व कडूपणाने भरलेली आहेत.”

  23. या सर्वांपेक्षा, माझ्या बंधू आणि भगिनींनो, ना स्वर्गाची, ना पृथ्वीची किंवा दुसर्‍या कोणत्याच गोष्टींची शपथ वाहू नका. जे काही तुम्हाला म्हणावयाचे ते साधे “होय” किंवा “नाही” असावे. नाही तर तुम्ही दोषी ठरविले जाल.