Profane Swearing बद्दल बायबलमधील वचने: Punishment for
Punishment for बद्दल वचने
याहवेहच्या नावाची जो कोणी निंदा करेल त्याला निश्चित जिवे मारावे. संपूर्ण मंडळीने त्याच्यावर दगडमार करावा. परदेशीय असो किंवा देशात जन्मलेला, जेव्हा ते परमेश्वराच्या नावाची निंदा करतात त्यांना निश्चित जिवे मारावे.
मग मोशे इस्राएली लोकांसोबत बोलला आणि त्यांनी त्या निंदा करणार्याला छावणीबाहेर नेले आणि त्याच्यावर दगडमार केला. याहवेहने मोशेला आज्ञापिल्यानुसार इस्राएली लोकांनी केले.
त्यांच्या मुखाने केलेली पापे, त्यांच्या ओठांचे शब्द आणि त्यांनी दिलेल्या शापांमुळे व लबाड्यांमुळे त्यांना स्वतःच्या अहंकारात अडकू द्या.
इतरांना शाप देणे त्याला आवडत असे— म्हणून त्याचे शाप त्याच्यावरच उलटू द्या. इतरांचे हितचिंतन करण्यात त्याला आनंद वाटत नसे— म्हणून त्याचेही हित न होवो.
त्याने शापाला आपली वस्त्रे म्हणून पांघरली; ते त्याच्या शरीरात पाण्यासारखे, व त्याच्या हाडात तेलासारखे शिरले.