Skip to content

Procrastination बद्दल बायबलमधील वचने

64 वचने · 15 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पण लोट आढेवेढे घेऊ लागला, तेव्हा दूतांनी त्याचा, त्याच्या पत्नीचा आणि त्याच्या दोन्ही कन्यांचे हात धरून त्यांना नगराबाहेर एका सुरक्षित ठिकाणी आणून सोडले, कारण त्या कुटुंबावर याहवेहची कृपा होती.

  2. “आपल्या धान्यातून किंवा आपल्या फळातून द्यावयाचे दान देण्यास विलंब करू नये. “आपला प्रथम जन्मलेला पुत्र तुम्ही मला समर्पण करावा.

  3. तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराला एखादा नवस करता, तेव्हा तो फेडण्यास विलंब लावू नये, कारण नवसांची फेड तत्परतेने करावी, अशी याहवेह तुमच्या परमेश्वराची अपेक्षा आहे. तसे न केल्याने तुम्ही पापाचे दोषी ठराल.

  4. तुमच्याविषयी माझे अंतःकरण म्हणाले, “त्यांचे मुख शोध!” हे याहवेह, मी तुमचे मुख शोधेन.

  5. कारण ते आपले परमेश्वर आहेत. आपण त्यांच्या कुरणातील प्रजा आणि त्यांचा संरक्षित मेंढरांचा कळप आहोत. आज जर तुम्ही त्यांची वाणी ऐकली, तर किती बरे!

  6. “मरीबाह येथे असताना केली तशी, जसे मस्सा च्या दिवशी तुम्ही रानामध्ये केले तसे, तुमची अंतःकरणे कठीण करू नका.

  7. मी त्वरा करेन, आणि तुमच्या आदेशांचे अविलंब पालन करेन.

  8. उद्याविषयी आज बढाई मारू नका; कारण उद्या काय घडेल ते तुम्हाला ठाऊक नाही.

  9. परमेश्वराशी तू नवस केला असेल, तर तो फेडण्यास उशीर करू नकोस, परमेश्वराला मूर्ख मनुष्यात प्रसन्नता वाटत नाही; तुझा नवस फेडून टाक.

  10. तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझ्या निर्माणकर्त्याचे स्मरण कर, आणि जोपर्यंत कष्टाचे दिवस येत नाहीत आणि अशी वर्षे येत नाहीत जेव्हा तुम्ही म्हणाल, “मला त्यांच्यामध्ये काही संतोष नाही”—

  11. याहवेहच्या प्राप्तीचा काळ आहे, तेव्हा पर्यंतच त्यांचा शोध घ्या. ते समीप आहेत, तेव्हा पर्यंतच त्यांचा धावा करा.

  12. तुमच्या याहवेह परमेश्वराला गौरव द्या तुमच्यावर त्यांनी निबिड अंधार पाडण्याच्या आधी, अंधारलेल्या डोंगरावर तुमची पावले अडखळण्याआधी, तुम्ही प्रकाशाची आशा कराल, पण ते त्यास गहन अंधकारात आणि निबिड काळोखात बदलतील.

  13. याहवेहने मला म्हटले, “मानवपुत्रा, हे ते पुरुष आहेत जे दुष्टतेचा कट करून शहरात वाईट सल्ला देतात.

  14. ते म्हणतात, ‘तुम्ही आपली घरांची हल्लीच पुनर्बांधणी केली नाही काय? हे शहर एक कढई व आपण त्यातील मांस असे आहोत.’

  15. “मानवपुत्रा, इस्राएल देशात ही काय म्हण आहे: ‘दिवस निघून जातात आणि प्रत्येक दृष्टान्त निष्फळ होत आहे’?

  16. “मानवपुत्रा, इस्राएलचे लोक म्हणतात, ‘जो दृष्टान्त तो पाहतो तो यापुढील अनेक वर्षांसाठी आहे आणि तो दूरच्या काळाविषयी भविष्यवाणी करतो.’

  17. “म्हणून त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझा कोणताही शब्द आणखी विलंब करणार नाही; जेव्हा मी ते बोलेन ते पूर्णतेस जाईल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”

  18. “तुमच्या शत्रूने तुम्हाला न्यायालयात नेण्यापूर्वीच, तुम्ही त्याच्याबरोबर वाटेत असतानाच लवकर त्याच्याशी संबंध नीट करा. नाही तर तुमचा शत्रू तुम्हाला न्यायाधीशाच्या स्वाधीन करेल आणि न्यायाधीश तुम्हाला शिपायांच्या स्वाधीन करेल आणि तुम्हाला तुरुंगात टाकेल.

  19. त्यांच्या शिष्यांपैकी दुसर्‍या एकाने म्हटले, “प्रभूजी, प्रथम मला माझ्या वडिलांना पुरावयास जाऊ द्या.”

  20. परंतु समजा तो दुष्ट दास आपल्या मनात म्हणेल, ‘माझा धनी येण्यास पुष्कळ विलंब होत आहे,’

  21. आणि तो सोबतीच्या दासांना मारहाण करू लागेल आणि मद्यपीं बरोबर खाऊ आणि पिऊ लागेल.

  22. तर त्या दासाचा धनी, तो अपेक्षा करीत नाही आणि तो सावध नाही अशा घटकेला येईल.

  23. त्या दासाचे तुकडे करेल व ढोंग्यांबरोबर जिथे रडणे व दातखाणे होईल तिथे त्याला वाटा देईल.

  24. त्यांच्यापैकी पाच मूर्ख होत्या व पाच शहाण्या होत्या.

  25. मूर्ख कुमारींनी दिव्यांबरोबर आपले तेल घेतले नाही.