- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Predestination बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
ही योजना काळाच्या पूर्णतेची होती, यासाठी की स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्वगोष्टी ख्रिस्तामध्ये एकत्र व्हाव्या.
कारण ज्यांच्या इच्छेनुसार व उद्देशानुसार जे सर्वकाही चालवितात, त्यांच्या पूर्व योजनेनुसार आपण त्यांच्यामध्ये निवडलेले होतो.
कारण परमेश्वराने पूर्वीच आमच्यासाठी नेमून ठेवलेली चांगली कृत्ये करण्याकरिता आम्ही ख्रिस्त येशूंमध्ये घडविलेली परमेश्वराची हस्तकृती आहोत.
हा त्यांच्या युगानुयुगाचा उद्देश ख्रिस्त येशू आपला प्रभू यामध्ये पूर्ण व्हावा.
यास्तव, परमेश्वराचे निवडलेले लोक, पवित्र आणि अतिप्रिय या नात्याने करुणा, दया, लीनता, सौम्यता आणि सहनशीलता ही परिधान करा.
परमेश्वराचे प्रीतीस पात्र माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला माहीत आहे की परमेश्वराने तुम्हाला निवडले आहे.
तुम्हाला उत्तेजन, सांत्वन आणि विनंती करून सांगतो की ज्या परमेश्वराने तुम्हाला त्यांच्या गौरवी राज्यात बोलाविले आहे, त्यांना शोभेल असे जीवन जगा.
परंतु प्रभूला प्रिय असलेल्या बंधू आणि भगिनींनो, आम्ही तुमच्यासाठी परमेश्वराची सतत उपकारस्तुती केली पाहिजे, कारण परमेश्वराने तुम्हाला आत्म्याद्वारे होणार्या पवित्रीकरणाच्या कार्यात व सत्यावरील विश्वासात प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे.
त्यांनीच आपले तारण केले आणि पवित्र जीवनासाठी आपल्याला पाचारण केले हे त्यांनी आपण काही केले म्हणून नव्हे, तर स्वतःच्या हेतूसाठी व कृपेमुळे केले. ही कृपा आपल्याला ख्रिस्त येशूंमध्ये युगाच्या पूर्वी दिलेली होती.
परमेश्वराने निवडलेल्या लोकांच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी आणि त्यांना भक्तीच्या मार्गावर नेणार्या सत्याच्या ज्ञानासाठी नेमलेला परमेश्वराचा दास व येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल याच्याकडून,
परमेश्वर जे कधीही खोटे बोलत नाहीत, त्यांनी सार्वकालिक जीवनाच्या आशेचे अभिवचन सुरवातीच्या काळाच्या आधीपासून दिले
त्यांनी आपल्याला सत्य वचनाद्वारे जन्म देण्यासाठी निवडले आहे, यासाठी की त्यांनी जे सर्वकाही उत्पन्न केले त्यामधील आपण प्रथमफळ व्हावे.
जे परमेश्वर पित्याच्या पूर्वज्ञानानुसार निवडलेले, आत्म्याच्या पवित्रीकरणाच्या कार्याद्वारे, येशू ख्रिस्ताचे आज्ञापालन करणारे, त्यांच्या रक्ताने सिंचन झालेले:
या जगाची निर्मिती होण्यापूर्वीच त्यांची निवड झाली होती, परंतु या शेवटच्या काळात ते तुमच्यासाठी प्रकट झाले.
यास्तव, माझ्या बंधू आणि भगिनींनो तुमचे पाचारण आणि निवड दृढ करण्यासाठी होईल तितके प्रयत्न करा. असे केल्यास तुम्ही कधीही अडखळणार नाही किंवा तुमचे पतन होणार नाही,
ज्यांच्यासाठी दंडाज्ञा फार पूर्वीच लिहून ठेवलेली होती असे काही लोक गुप्तपणे तुमच्यामध्ये आत शिरले आहेत. हे अनीतिमान लोक, परमेश्वराची कृपा विकृत करून तिला अनैतिकतेचे स्वरूप देतात आणि येशू ख्रिस्त आपल्या एकाच सार्वभौम प्रभूला नाकारतात.
पृथ्वीवरील ते सर्व लोक ज्यांची नावे जगाच्या उत्पत्तीपासून वधलेल्या कोकराच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत ते त्या पशूची उपासना करतील.