Predestination बद्दल बायबलमधील वचने: General references
General references बद्दल वचने
तरी परमेश्वराने अब्राहामाला सांगितले, “तुझी स्त्री गुलाम आणि तिचा पुत्र यांच्यामुळे तू मनस्ताप करून घेऊ नकोस. साराहच्या म्हणण्याप्रमाणे कर, कारण इसहाकाद्वारेच तुझी संतती वाढेल.
त्या दासीपुत्रापासूनही मी एक राष्ट्र निर्माण करेन, कारण तोही तुझा पुत्र आहे.”
परंतु मी तुला याच एका उद्देशाने राखून ठेवले की, मी तुला माझे सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव अखिल पृथ्वीवर जाहीर व्हावे.
आणि याहवेह म्हणाले, “मी माझे सर्व चांगुलपण तुझ्यापुढून चालवेन आणि याहवेह म्हणून माझ्या नावाची घोषणा मी तुझ्यासमक्ष करेन. ज्याच्यावर मला कृपा करावयाची त्याच्यावर मी कृपा करेन आणि ज्याच्यावर मला दया करावयाची त्याच्यावर मी दया करेन.”
तुमच्या पूर्वजांवर त्यांची प्रीती होती आणि त्यांनी त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देण्यासाठी निवडले आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला आपल्या उपस्थितीने आणि महान सामर्थ्याने इजिप्त देशामधून बाहेर आणले,
तुम्ही संख्येने अधिक होता म्हणून याहवेहने तुमची निवड केली नाही व तुमच्यावर प्रीती केली नाही, कारण तुम्ही तर सर्व राष्ट्रांमध्ये संख्येने अतिशय अल्प होता.
पण याहवेहची तुमच्यावर प्रीती असल्यामुळे आणि त्यांनी तुमच्या पूर्वजांना दिलेली शपथ पाळावयाची होती, म्हणून त्यांनी तुम्हाला सामर्थ्यशाली हाताने बाहेर काढले आणि इजिप्तचा राजा फारोहच्या दास्यगृहातून तुम्हाला सोडविले.
असे असूनही याहवेहने तुमच्या पूर्वजांवर वात्सल्यमय प्रीती केली व त्यांच्यानंतर तुम्ही इतर सर्व राष्ट्रांहून श्रेष्ठ व्हावे म्हणून त्यांच्या वंशजांची म्हणजे तुमची निवड केली—जसे आजही आहे.
जेव्हा सर्वोच्चांनी पृथ्वीवरील राष्ट्रांना त्यांचे वतन दिले, तेव्हा त्यांनी सर्व मानवजातीची विभागणी केली, इस्राएलाच्या पुत्रांच्या संख्येनुसार त्यांच्या सीमारेषा आखून दिल्या.
कारण याहवेहनेच इस्राएली लोकांशी युद्ध करण्यासाठी या राजांचे हृदय कठोर केले होते, अशासाठी की याहवेहने त्यांना काहीही दयामाया न दाखविता त्यांचा समूळ नाश करावा असे मोशेला आज्ञापिले होते. याहवेहने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे काही दयामाया न दाखविता त्यांचा वध करण्यात आला.
आपल्या महान नामाकरिता याहवेह आपल्या लोकांचा धिक्कार करणार नाहीत, कारण तुम्हाला स्वतःचे लोक बनविणे हे याहवेहला बरे वाटले.
अशाप्रकारे राजाने लोकांचे म्हणणे मानले नाही, कारण शिलोनी संदेष्टा अहीयाहच्याद्वारे याहवेहने नेबाटाचा पुत्र यरोबोअमला सांगितलेल्या वचनांची पूर्तता व्हावी म्हणून या घटना याहवेहकडून घडून आल्या होत्या.
संदेष्टा राजाला म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘ज्या मनुष्याने मरावे असे मी योजले होते, त्याला तू मोकळे सोडले आहे. त्यामुळे त्याच्या जिवाबद्दल तुझा जीव, त्याच्या लोकांसाठी तुझे लोक जातील.’ ”
“ ‘हे तू ऐकले नव्हते काय? याचा निश्चय मी फार पूर्वीच केलेला होता. या घटना मी प्राचीन काळातच योजून ठेवल्या होत्या; आता मी त्या अंमलात आणल्या आहेत, जी तटबंदीची शहरे तू उद्ध्वस्त करून त्यांचा दगडांचा ढिगारा केलास.
परंतु आता येथे माझे नाव असावे म्हणून मी यरुशलेमला निवडले आहे आणि माझ्या इस्राएल लोकांवर राज्य करण्यासाठी मी दावीदाची निवड केली आहे.’
“परंतु ते अतुलनीय आहेत आणि त्यांचा विरोध करणारा कोण आहे? त्यांच्या मनास येईल तसेच ते करतात.
माझ्याविरुद्ध असलेला त्यांचा निवाडा ते पूर्णतेस नेतील, आणि अशा पुष्कळ योजना त्यांनी माझ्यासाठी राखून ठेवल्या आहेत.
ज्या राष्ट्रांचे परमेश्वर याहवेह आहेत, ज्या लोकांना त्यांनी स्वतःच्या वतनाकरिता निवडले ते धन्य.
तुमच्या अंगणात येऊन राहण्यासाठी तुम्ही ज्यांची निवड केली, ते धन्य! आम्ही तुमच्या मंदिरातील पवित्रस्थानाच्या उत्कृष्ट पदार्थांनी संतुष्ट होऊ.
परंतु त्यांनी योसेफाचा डेरा वर्ज्य केला; एफ्राईमचे गोत्र पसंत केले नाही.
तर त्यांनी यहूदाहचे गोत्र निवडले, त्यांना प्रिय असलेल्या सीयोन पर्वतास
त्यांनी आपला सेवक दावीदाची निवड केली, त्यांनी त्याला मेंढरांच्या कोंडवाड्यांतून घेतले.
मेंढरांची राखण करीत त्यांच्यामागे फिरत असतानाच, त्यांनी आपली प्रजा याकोब अर्थात् आपले वतन इस्राएलाचा मेंढपाळ म्हणून त्याची निवड केली.
आणि दावीदाने प्रामाणिक अंतःकरणाने त्यांचे रक्षण केले; कुशल हातांनी त्याने त्यांचे नेतृत्व केले.
तेव्हा त्यांनी एका पुरुषाला— योसेफाला पाठविले.