मुख्य मजकुरावर जा

Patriarchal Government बद्दल बायबलमधील वचने

75 वचने · 9 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तो आपले गाढव द्राक्षवेलीला, गाढवीचे शिंगरू उत्कृष्ट द्राक्षवेलीला बांधून ठेवणार आहे; आपला झगा द्राक्षारसात, आपली वस्त्रे द्राक्षाच्या रक्तात धुणार आहे.

  2. त्याचे नेत्र द्राक्षारसापेक्षा गर्द होतील, त्याचे दात दुधापेक्षाही पांढरे होतील.

  3. “जबुलून समुद्रकिनारी राहील आणि तो जहाजांचे बंदर होईल. त्याची सीमा सीदोनपर्यंत पसरेल.

  4. “इस्साखार बळकट गाढव आहे. तो मेंढवाड्यांमध्ये दबून बसला आहे.

  5. त्याची विश्रांतीची जागा किती रम्य आहे आणि तिकडचा प्रदेश किती आल्हाददायक आहे, हे पाहून तो आपल्या खांद्याला भार वाहण्यासाठी वाकवेल आणि मजुरीचा दास होऊन जाईल.

  6. “दान आपल्या लोकांना न्यायदान करेल, इस्राएलाच्या एका गोत्राप्रमाणे तो हे करेल.

  7. दान हा रस्त्याच्या कडावरील सर्प बनेल, तो वाटेवरील विषारी सर्प बनेल, जो घोड्याच्या टापांचा चावा घेईल व घोडेस्वार खाली कोसळेल.

  8. “हे याहवेह, मी तुमच्या तारणाची वाट पाहत आहे.

  9. “एक लुटारूची टोळी गादवर हल्ला करेल, पण गाद त्यांच्या टाचेवर तडाखा देईल.

  10. “आशेरला पौष्टिक अन्न मिळेल; आणि तो राजास योग्य अशी मिष्टान्ने पुरवेल.

  11. “नफताली स्वैर हरिणीप्रमाणे आहे, त्याला सुंदर पाडसे होतील.

  12. “योसेफ हा फलवंत वेल आहे, पाण्याच्या झर्‍याजवळ लावलेली फलवंत वेल आहे, तिच्या फांद्या भिंतीवर पसरल्या आहेत.

  13. कटुतेने तिरंदाजांनी त्याच्यावर हल्ला केला; त्यांनी त्याच्यावर वैराने बाण सोडले.

  14. परंतु त्याचे धनुष्य स्थिर राहिले, त्याचे बाहू मजबूत राहिले, याचे कारण याकोबाचे सर्वसमर्थ परमेश्वर, ते मेंढपाळ आणि इस्राएलचे खडक आहेत.

  15. कारण तुझ्या पित्याचे परमेश्वर, तुझे सहायक आहेत, कारण सर्वसमर्थ, जे तुला आशीर्वादित करतात, वरून स्वर्गातील आशीर्वाद, खोलातील डोहातून निघणार्‍या झर्‍यातील आशीर्वाद, स्तने आणि गर्भांच्या आशीर्वादांचा वर्षाव करो.

  16. तुझ्या पित्याचे आशीर्वाद पूर्वजांच्या पर्वतापेक्षा श्रेष्ठ आशीर्वाद आहेत, ते सर्वकालीन पर्वतांच्या संपन्नतेपेक्षा श्रेष्ठ आहेत. हे आशीर्वाद योसेफाच्या मस्तकी, जो आपल्या भावामधील राजपुत्र आहे, त्याच्या मस्तकी येवोत.

  17. “बिन्यामीन, हा भुकेला लांडगा आहे; तो सकाळच्या प्रहरी शिकार करतो, आणि संध्याकाळी लूट वाटतो.”

  18. हे सर्व इस्राएलचे बारा गोत्र आहेत आणि मुलांना आशीर्वाद देण्याकरिता त्यांचा पिता असा बोलला, प्रत्येकाला त्याने यथायोग्य आशीर्वाद दिला.

  19. नंतर त्याने आपल्या पुत्रांस या सूचना दिल्या: “आता लवकरच माझा अंत होईल, तेव्हा एफ्रोन हेथीपासून विकत घेतलेल्या गुहेमध्ये माझ्या वाडवडिलांच्या सोबत मला मूठमाती द्या.

  20. कनान देशात अब्राहामाने एफ्रोन हेथीपासून विकत घेतलेली स्मशानभूमी मम्रेसमोरील मकपेला नावाच्या शेतातील गुहेमध्ये आहे.

  21. तिथेच त्यांनी अब्राहाम आणि त्याची पत्नी साराहला मूठमाती दिली; तिथेच त्यांनी इसहाक आणि त्याची पत्नी रिबेकाहला मूठमाती दिली आणि तिथेच मी लेआला मूठमाती दिली.

  22. ते शेत आणि ती गुहा हेथीच्या लोकांपासून विकत घेतली होती.”

  23. आपल्या पुत्रांसंबंधीची भविष्यवाणी संपविल्यावर याकोबाने आपले पाय बिछान्यावर उचलून घेतले व त्याने अखेरचा श्वास घेऊन प्राण सोडला आणि तो त्याच्या पूर्वजास जाऊन मिळाला.

  24. रऊबेन हा ज्येष्ठपुत्र होता खरा, पण त्याने आपल्या पित्याचा पलंग भ्रष्ट केला म्हणून त्याचा ज्येष्ठत्वाचा हक्क इस्राएलपुत्र योसेफच्या संततीस देण्यात आला, म्हणून वंशावळीत रऊबेनचे नाव ज्येष्ठत्वाच्या हक्काप्रमाणे नमूद करण्यात आले नाही.

  25. या भोजनसमारंभाचा कालावधी आटोपल्यावर इय्योब त्यांच्या शुद्धीकरणाची व्यवस्था करी. तो पहाटेस उठून त्या सर्वांकरिता होमार्पणाचा यज्ञ करी; कारण तो विचार करीत असे, “न जाणो माझ्या लेकरांनी पाप केले असेल आणि आपल्या अंतःकरणात परमेश्वराला शाप दिला असेल.” असा इय्योबाचा नित्यक्रम असे.