मुख्य मजकुरावर जा

Offerings बद्दल बायबलमधील वचने

433 वचने · 61 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “ ‘पाचव्या दिवशी नऊ गोर्‍हे, दोन मेंढे व एक वर्षाची चौदा कोकरे अर्पावी. हे सर्व निर्दोष असावेत.

  2. गोर्‍हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे.

  3. नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.

  4. “ ‘सहाव्या दिवशी आठ गोर्‍हे, दोन मेंढे, एक वर्षाची चौदा कोकरे अर्पावी. हे सर्व निर्दोष असावेत.

  5. गोर्‍हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे.

  6. नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.

  7. “ ‘सातव्या दिवशी सात गोर्‍हे, दोन मेंढे आणि एक वर्षाची चौदा कोकरे अर्पावी. हे सर्व निर्दोष असावेत.

  8. गोर्‍हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे त्यांचे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे.

  9. नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.

  10. “ ‘आठव्या दिवशी विशेष समारोप सभा बोलवावी व कोणतीही नियमित कामे करू नये.

  11. याहवेहसाठी एक गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाची सात कोकरे यांचे सुवासिक अन्नार्पण म्हणजेच होमार्पण अर्पावे. हे सर्व निर्दोष असावेत.

  12. गोर्‍हा, मेंढा व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे.

  13. नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.

  14. “ ‘तुमचे नवस व तुमची स्वखुशीची अर्पणे याबरोबरच तुमची होमार्पणे, धान्यार्पणे, पेयार्पणे व शांत्यर्पणे तुमच्या नेमलेल्या सणाच्या वेळी याहवेहस अर्पण करावे.’ ”

  15. याहवेहने आज्ञापिल्याप्रमाणे मोशेने सर्वकाही इस्राएली लोकांना सांगितले.

  16. तिथेच तुम्ही आपली होमार्पणे, यज्ञार्पणे, तुमचे दशांश व विशेष भेटी, नवस फेडण्यासाठी आणलेली अर्पणे आणि तुमची स्वेच्छार्पणे आणि तुमच्या गुरांची व शेरडामेंढरांची प्रथम वत्सांची अर्पणे आणावीत.

  17. तेव्हाच तुम्ही तुमची सर्व होमार्पणे, यज्ञार्पणे, दशांश, नवसाची अर्पणे व स्वेच्छार्पणे—याहवेह तुमचे परमेश्वर स्वतःच्या नावाचे निवासस्थान म्हणून ज्या ठिकाणाची निवड करतील तिथे आणावीत.

  18. आणि त्या ठिकाणी तुम्ही, तुमचे पुत्र आणि कन्या, तुमचे दास व दासी आणि तुमच्या नगरातील लेवी, ज्यांना स्वतःचा कोणताही वाटा किंवा वतन नाही, या सर्वांसह—याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर आनंदोत्सव करावा.

  19. तुमच्या शेतात प्रत्येक वर्षी होणार्‍या उत्पन्नाचा दशांश भाग वेगळा ठेवण्याची खात्री करा.

  20. मग याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर तुम्ही सप्ताहांचा उत्सव साजरा करावा. यावेळी तुम्ही तुम्हाला मिळालेल्या आशीर्वादांच्या प्रमाणात याहवेह तुमच्या परमेश्वराला स्वेच्छार्पणे वाहावीत.

  21. याशिवाय धान्य, नवा द्राक्षारस व जैतुनाचे तेल यांच्या उत्पन्नाचे प्रथम भाग आणि मेंढरांची प्रथम कातरलेली लोकर त्यांना दिली जावी,

  22. वेश्येच्या कमाईचा अथवा पुमैथुन करणार्‍याच्या मिळकतीचा पैसा याहवेह तुमच्या परमेश्वराच्या मंदिरात नवस फेडण्यासाठी कोणीही आणू नये; कारण हे दान व दान देणारी व्यक्ती या दोन्हीही गोष्टी याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने ओंगळ होत.

  23. तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराला एखादा नवस करता, तेव्हा तो फेडण्यास विलंब लावू नये, कारण नवसांची फेड तत्परतेने करावी, अशी याहवेह तुमच्या परमेश्वराची अपेक्षा आहे. तसे न केल्याने तुम्ही पापाचे दोषी ठराल.

  24. परंतु तुम्ही नवस केला नसेल, तर ते मात्र पाप नाही.

  25. तुमच्या ओठांनी तुम्ही जे काही वचन दिले असेल, त्याप्रमाणे तुम्ही अवश्य केले पाहिजे; कारण तो नवस तुम्ही मुखाने, स्वखुशीने याहवेह तुमच्या परमेश्वराला केला होता.