मुख्य मजकुरावर जा

Offerings बद्दल बायबलमधील वचने

433 वचने · 61 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि प्रत्येक कोकर्‍याबरोबर धान्यार्पण म्हणून तेलात मळलेले एक दशांश बारीक पीठ अर्पण करावे. हे होमार्पण सुवासिक अर्पण, अन्नार्पण म्हणून याहवेहसाठी सादर करावे.

  2. प्रत्येक गोर्‍ह्याबरोबर अर्धा हीन पेयार्पण; आणि प्रत्येक मेंढ्याबरोबर एकतृतीयांश हीन, व प्रत्येक कोकर्‍याबरोबर एक पाव हीन द्राक्षारस आणावा. वर्षभरातील प्रत्येक पोर्णिमेच्या दिवशी करावयाचे हे मासिक होमार्पण आहे.

  3. नियमित होमार्पण व त्याचे पेयार्पण याशिवाय एक बोकड पापार्पण म्हणून याहवेहला सादर करावा.

  4. अशाप्रकारे सात दिवस दररोज याहवेहसाठी सुवास म्हणून हे अन्नार्पण करावे; नियमित होमार्पण व त्याचे पेयार्पण याबरोबरच ही अर्पणे अर्पावीत.

  5. सातव्या दिवशी पवित्र सभा भरवावी आणि नियमित कामे करू नये.

  6. “ ‘प्रथमफळांच्या दिवशी, जेव्हा तुम्ही आठवड्याच्या सणाच्या वेळी याहवेहला नवीन धान्याचे अर्पण करता, तेव्हा पवित्र सभा बोलवा आणि नियमित कामे करू नका.

  7. याहवेहला सुवासिक होमार्पण म्हणून दोन तरुण गोर्‍हे, एक मेंढा व एक वर्षाची सात नरकोकरे अर्पण करा.

  8. प्रत्येक गोर्‍ह्याबरोबर तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पीठ यांचे धान्यार्पण करावे; गोर्‍ह्याबरोबर दोन दशांश;

  9. आणि सात कोकर्‍यांकरिता प्रत्येकी एक दशांश बारीक पीठ अर्पावे.

  10. तुमच्यासाठी प्रायश्चित व्हावे म्हणून एक बोकड अर्पावा.

  11. नियमित होमार्पण व त्याचे धान्यार्पण याबरोबरच ही अर्पणे त्यांच्या पेयार्पणासह अर्पावीत. गुरे निर्दोष असतील याची खात्री करावी.

  12. मासिक व रोजचे होमार्पण व त्यांचे नेमलेले धान्यार्पण व पेयार्पण याबरोबरच ही अर्पणे करावी. ही याहवेहस आवडणारी सुवासिक अन्नार्पणे आहेत.

  13. “ ‘याच सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी एक पवित्र सभा भरवा. तुम्ही स्वसुखाचा त्याग करावा व कोणतेही नियमित काम करू नये.

  14. याहवेहला सुवास म्हणून एक तरुण गोर्‍हा, एक मेंढा आणि एक वर्षाची सात कोकरे यांचे होमार्पण सादर करा, ते सर्व निर्दोष असावेत;

  15. गोर्‍ह्याकरिता तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पीठ; आणि मेंढ्याकरिता दोन दशांश असे धान्यार्पण करावे;

  16. आणि सात कोकर्‍यातील प्रत्येकी एक दशांश बारीक पीठ अर्पावे.

  17. प्रायश्चित्ताचे पापार्पण, नियमित होमार्पण व त्याचे धान्यार्पण व त्याचे पेयार्पण, याबरोबरच पापार्पणासाठी एक बोकड अर्पण करावा.

  18. गोर्‍हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे त्यांचे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे.

  19. नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.

  20. “ ‘तिसर्‍या दिवशी अकरा गोर्‍हे, दोन मेंढे, व एक वर्षाची चौदा कोकरे अर्पण करावी. हे सर्व निर्दोष असावेत.

  21. गोर्‍हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे त्यांचे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे.

  22. नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.

  23. “ ‘चौथ्या दिवशी दहा गोर्‍हे, दोन मेंढे, एक वर्षाची चौदा कोकरे अर्पण करावी, हे सर्व निर्दोष असावेत.

  24. गोर्‍हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे त्यांचे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे.

  25. नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.