Skip to content

Mother बद्दल बायबलमधील वचने

34 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान करा, म्हणजे जो देश याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत आहे, त्यात तुम्ही दीर्घकाळ राहाल.

  2. “जे कोणी आपला पिता किंवा आईला जिवे मारतात त्यांना जिवे मारावे.

  3. “जो कोणी आपल्या आई किंवा वडिलास शाप देईल त्यास जिवे मारावे.

  4. “ ‘तुझ्या आईबरोबर शारीरिक संबंध ठेवून वडिलांचा अनादर करू नकोस. ती तुझी आई आहे; तिच्याशी संबंध ठेवू नकोस.

  5. “ ‘तुमच्यातील प्रत्येकाने आपल्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे आणि माझा शब्बाथ पाळलाच पाहिजे. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.

  6. “ ‘जो कोणी आपल्या वडिलांना किंवा आईला शाप देतो, त्याला अवश्य जिवे मारावे, कारण त्याने स्वतःच्या आईवडिलांना शाप दिला आहे, त्याच्या रक्ताचा दोष त्याच्याच माथी राहील.

  7. याहवेह तुमच्या परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान करा, म्हणजे जो देश याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत आहे, त्यात तुम्ही दीर्घकाळ राहाल व तुमचे कल्याण होईल.

  8. तेव्हा अलीशाने आपले बैल सोडले आणि एलीयाहच्या मागे धावून गेला. तो म्हणाला, “मला माझ्या आईपित्याचे चुंबन घेऊ दे, मग मी आपल्याबरोबर येईन.” एलीयाहने उत्तर दिले, “परत जा, मी तुला काय केले?”

  9. माझ्या मुला, तुझ्या वडिलांचे शिक्षण ऐकून घे आणि तुझ्या आईची शिकवण विसरू नकोस.

  10. माझ्या मुला, तू तुझ्या पित्याची आज्ञा पाळ, आणि आपल्या आईचे शिक्षण सोडू नकोस.

  11. शलोमोनाची नीतिसूत्रे: शहाणा मुलगा त्याच्या पित्याला सुखी करतो, परंतु मूर्ख मुलगा त्याच्या आईला दुःख देतो.

  12. समंजस पुत्र आपल्या वडिलांना आनंद देतो, परंतु मूर्ख मनुष्य आईला तुच्छ लेखतो.

  13. जे कोणी त्यांच्या वडिलांना लुटतात आणि त्यांच्या आईला हाकलून देतात, ती अशी संतान आहे जी लज्जा व अप्रतिष्ठा यांना कारणीभूत होते.

  14. जो आपल्या आईवडिलांना शिव्याशाप देतो, त्याचा दीप गडद अंधारात विझून जाईल.

  15. आपल्या वडिलांचे ऐक ज्याने तुला जीवन दिले, आणि तुझी आई वृद्ध झाल्यावर तिचा तिरस्कार करू नको.

  16. सत्याला मोलाने विकत घे आणि ते विकू नको— सुज्ञान, शिक्षण आणि समंजसपणासुद्धा मिळव.

  17. नीतिमान मुलाच्या वडिलांना फार आनंद होतो; जो मनुष्य सुज्ञ पुत्राचा पिता आहे त्यामध्ये तो उल्लसित असतो.

  18. तुझे वडील आणि आई आनंदी असावेत; आणि जिने तुला जन्म दिला ती हर्षित असो!

  19. जो आपल्या आईवडिलांना लुबाडतो आणि म्हणतो, “ते चुकीचे नाही,” तो नाश करणार्‍याचा भागीदार आहे.

  20. छडी व ताकीद यामुळे ज्ञान मिळते; परंतु बालकाला बेशिस्त सोडल्यास, ते आपल्या आईला कलंकित करते.

  21. असे काही लोक आहेत जे त्यांच्या वडिलांना शाप देतात, आणि त्यांच्या मातांनाही धन्यता देत नाहीत.

  22. “आपल्या वडिलांचा चेष्टा करणारे डोळे, आणि वृद्ध आईचा तिरस्कार करणारे डोळे, दरीतील डोमकावळे टोची मारून बाहेर काढतील, त्यांची शरीरे गिधाडे खातील.

  23. “जो कोणी माझ्यापेक्षा आपल्या आईवडीलांवर अधिक प्रेम करीत असेल, तर तो मला पात्र नाही; जो कोणी माझ्यापेक्षा आपल्या पुत्र व कन्यांवर अधिक प्रेम करीत असेल, तर ते मला पात्र नाही.

  24. परमेश्वर म्हणाले, ‘तुझ्या वडिलांचा आणि आईचा सन्मान करा’ आणि ‘जो कोणी आपल्या आई किंवा वडिलास शाप देईल त्यास जिवे मारावे.’

  25. परंतु तुम्ही म्हणता, जर कोणी असे घोषित करतो की, आईवडिलांना करत असलेली मदत, ही ‘परमेश्वराला समर्पित’ आहे.