Skip to content

Moon बद्दल बायबलमधील वचने

44 वचने · 12 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह असे म्हणतात, दिवसा सूर्यप्रकाश द्यावा म्हणून ज्यांनी सूर्याला नियुक्त केले, व रात्री प्रकाश देण्यासाठी चंद्र व ताऱ्यांना आज्ञा दिली, गर्जना करणार्‍या लाटा उसळाव्यात म्हणून जे समुद्र ढवळतात; त्यांचे नाव सर्वसमर्थ याहवेह असे आहे:

  2. आम्ही जे करणार असे म्हटले होते, तसे आम्ही निश्चितच करू. आम्ही आकाशराणीस धूप जाळू आणि तिला पेयार्पण करू, जसे आम्ही व आमच्या पूर्वजांनी, आणि आमचे राजे व अधिपती यांनी यहूदीयाच्या नगरात, यरुशलेमच्या रस्त्यात नेहमी केले, तसेच आम्हीही करू. कारण त्या दिवसात आमच्याकडे विपुल अन्न होते आणि आम्ही सुखात होतो व आम्हाला काहीही इजा झाली नाही.

  3. जेव्हापासून आम्ही आकाशराणीला धूप जाळणे थांबविले व तिला पेयार्पणे करण्याचे थांबविले, तेव्हापासून आम्हाला सर्व गोष्टींचा अभाव झाला असून तलवारीने आणि दुष्काळाने आमचा नाश होत आहे.”

  4. स्त्रिया त्याची पुष्टी करीत म्हणाल्या, “आम्ही आकाशराणीची पूजा करीत होतो, तिला पेयार्पणे ओतीत होतो, तिच्यासाठी तिची प्रतिमा असलेल्या पोळ्या करीत होतो, हे सर्व आमच्या पतींना माहीत नव्हते काय?”

  5. सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: तुम्ही आणि तुमच्या स्त्रियांनी म्हटले, ‘आम्ही निश्चितच आकाशराणीस धूप जाळू व तिला पेयार्पणे करू.’ “तर मग करा, तिला दिलेली वचने पूर्ण करा! तुमचे संकल्पही पूर्ण करा!

  6. जेव्हा मी तुझा नाश करेन, मी आकाशे झाकीन आणि त्यातील तारे अंधुक करेन; सूर्याला मी ढगांनी आच्छादेन आणि चंद्र आपला प्रकाश देणार नाही.

  7. पृथ्वी त्यांच्यापुढे कापते आणि आकाशे थरथरतात, सूर्य आणि चंद्र काळवंडतात, आणि तारे चमकणे सोडून देतात.

  8. याहवेहचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल.

  9. सूर्य व चंद्र काळे पडतील आणि तारे यापुढे प्रकाशणार नाही.

  10. तुमच्या झेप घेणाऱ्या बाणांच्या तेजाने विजेप्रमाणे चकाकणार्‍या तुमच्या भाल्याच्या प्रकाशाने सूर्य व चंद्र आकाशात स्तब्ध उभे राहिले.

  11. “क्लेशांच्या काळाची समाप्ती झाल्यावर “ ‘त्या दिवसात, सूर्य अंधकारमय होईल, आणि चंद्र आपला प्रकाश देणार नाही; आकाशातून तारे गळून पडतील, आणि आकाशमंडळ डळमळेल.’

  12. “हा भयानक क्लेशांचा काळ संपल्याबरोबर त्या दिवसात, “ ‘सूर्य अंधकारमय होईल, आणि चंद्र आपला प्रकाश देणार नाही;

  13. “तेव्हा सूर्य, चंद्र व तारे यामध्ये चिन्हे घडतील. पृथ्वीवर राष्ट्रे समुद्राच्या गर्जणार्‍या लाटांनी हैराण होतील आणि गोंधळून जातील.

  14. प्रभूचा महान व गौरवी दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल.

  15. सूर्याला एका विशिष्ट प्रकारचे तेज असते, चंद्राला दुसर्‍या प्रकारचे आणि तार्‍यांना वेगळ्या प्रकारचे तेज आहे. शिवाय सर्व तार्‍यांचेही तेज वेगवेगळे असते.

  16. मी पाहत असताना त्याने सहावा शिक्का फोडला, तेव्हा एक प्रचंड भूमिकंप झाला. सूर्य शेळ्याच्या केसांपासून तयार केलेल्या गोणपाटासारखा काळा झाला; चंद्र रक्तासारखा लाल झाला.

  17. चौथ्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा सूर्याचा तिसरा हिस्सा, चंद्र व तारे यांचाही तिसरा हिस्सा काळा झाला. त्यामुळे दिवसाचा एकतृतीयांश भाग प्रकाशाविना आणि रात्रीचा एकतृतीयांश भाग अंधार झाला.

  18. मग स्वर्गामध्ये एक अलौकिक चिन्ह मला दिसले. सूर्य परिधान केलेली एक स्त्री मी पाहिली. तिच्या पायाखाली चंद्र होता. तिच्या डोक्यावर बारा तार्‍यांचा मुकुट होता.

  19. नगरीला प्रकाश देण्यासाठी सूर्यचंद्राची गरज नाही, कारण परमेश्वराचे गौरव तिला प्रकाश देते आणि कोकरा तिचा दिवा आहे.