मुख्य मजकुरावर जा

Moon बद्दल बायबलमधील वचने: Worshiped

9 वचने · 12 पैलू

"Moon" साठी शोधा

Worshiped बद्दल वचने

  1. यहूदीयाच्या पूर्वीच्या राजांनी नेमलेल्या मूर्तिपूजक याजकांना त्याने ठार मारले. कारण त्यांनी यहूदीया आणि यरुशलेमच्या नगरातील टेकड्यांवरील मंदिरात धूप जाळलेला होता. त्यांनी बआल, सूर्य, चंद्र, तारे व ग्रह यांनाही धूप जाळला होता.

  2. जर आकाशात तळपणार्‍या सूर्याकडे पाहून, अथवा वैभवशाली वाटेने जाणार्‍या चंद्राकडे पाहून,

  3. माझे अंतःकरण गुप्तपणे मोहित झाले असेल, आणि आपल्या हाताच्या चुंबनांने मी त्यांची उपासना केली असेन,

  4. मुलेबाळे लाकडे गोळा करतात, त्यांचे वडील अग्नी पेटवितात, आणि स्त्रिया, आकाशराणीस पोळ्या तयार करून अर्पण करतात. मला क्रोधित करण्यासाठी इतर दैवतांना पेयार्पणे करतात.

  5. आणि ती हाडे चंद्र, सूर्य व तारे यांच्यापुढे पसरील. हीच माझ्या लोकांची दैवते आहेत. यांच्यावरच त्यांचे प्रेम होते, यांना ते अनुसरत होते, यांचा ते सल्ला घेत, यांचीच ते उपासना करीत असत. ही हाडे पुन्हा कोणी गोळा करणार नाहीत वा पुरणार नाहीत. जमिनीवर पडलेल्या शेणाप्रमाणे ती विखुरली जातील.

  6. आम्ही जे करणार असे म्हटले होते, तसे आम्ही निश्चितच करू. आम्ही आकाशराणीस धूप जाळू आणि तिला पेयार्पण करू, जसे आम्ही व आमच्या पूर्वजांनी, आणि आमचे राजे व अधिपती यांनी यहूदीयाच्या नगरात, यरुशलेमच्या रस्त्यात नेहमी केले, तसेच आम्हीही करू. कारण त्या दिवसात आमच्याकडे विपुल अन्न होते आणि आम्ही सुखात होतो व आम्हाला काहीही इजा झाली नाही.

  7. जेव्हापासून आम्ही आकाशराणीला धूप जाळणे थांबविले व तिला पेयार्पणे करण्याचे थांबविले, तेव्हापासून आम्हाला सर्व गोष्टींचा अभाव झाला असून तलवारीने आणि दुष्काळाने आमचा नाश होत आहे.”

  8. स्त्रिया त्याची पुष्टी करीत म्हणाल्या, “आम्ही आकाशराणीची पूजा करीत होतो, तिला पेयार्पणे ओतीत होतो, तिच्यासाठी तिची प्रतिमा असलेल्या पोळ्या करीत होतो, हे सर्व आमच्या पतींना माहीत नव्हते काय?”

  9. सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: तुम्ही आणि तुमच्या स्त्रियांनी म्हटले, ‘आम्ही निश्चितच आकाशराणीस धूप जाळू व तिला पेयार्पणे करू.’ “तर मग करा, तिला दिलेली वचने पूर्ण करा! तुमचे संकल्पही पूर्ण करा!