Skip to content

Milk बद्दल बायबलमधील वचने

40 वचने · 23 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि ते भरपूर दूध देत असल्यामुळे खाण्यासाठी तिथे दही असेल. त्या देशात जे सर्व राहतील ते दही आणि मध खातील.

  2. “तुमच्यातील सर्व तान्हेल्यांनो, पाण्याजवळ या; आणि तुम्ही, ज्यांच्याकडे पैसे नाहीत, या, घ्या व खा! या, द्राक्षारस अथवा दूध घ्या पैसे न देता, विनामूल्य घ्या.

  3. तू अनेक देशांचे दूध प्राशन करशील आणि तुला राजांचे स्तनपान करविण्यात येईल. तेव्हा तुला कळेल कि मी, याहवेह तुझा उद्धारकर्ता मी तुझा तारणारा, याकोबाचा सर्वसमर्थ आहे.

  4. तेव्हा मी तुमच्या पूर्वजांना वाहलेली शपथ पूर्ण करेन, आणि दूध व मध वाहणारा देश’ ज्यात आज तुम्ही राहत आहात तो मी तुम्हाला देईन.” मी उत्तर दिले, “याहवेह, आमेन.”

  5. आमच्या पूर्वजांना दिलेल्या शपथपूर्वक वचनाप्रमाणे, तुम्ही इस्राएलला दूध व मध वाहता देश दिला.

  6. कोल्हीदेखील आपल्या पिलांना स्तनपान करते, पण माझे लोक वाळवंटातील शहामृगांसारखे निर्दयी झाले आहेत.

  7. त्यांचे अधिपती हिमापेक्षा अधिक तेजस्वी आणि दूधापेक्षा अधिक धवल होते, त्यांचे देह माणकांपेक्षा अधिक तुकतुकीत, सशक्त व निरोगी त्यांची देहरचना नीलरत्नापेक्षा अधिक तेजस्वी होती.

  8. त्या दिवशी मी त्यांच्याशी शपथ वाहिली की मी त्यांना इजिप्तमधून जो देश मी त्यांच्यासाठी शोधला आहे, जिथे दूध व मध वाहते अशा देशात मी त्यांना आणेन, जो सर्व देशांपेक्षा अति सुंदर आहे.

  9. म्हणून तुमच्या पूर्वेस असलेल्या लोकांना त्यांची मालमत्ता म्हणून तुम्हाला मी त्यांच्या स्वाधीन करेन. ते त्यांच्या छावण्या तुमच्यात उभारतील व त्यांचे तंबू तुमच्यात बांधतील; ते तुमची फळे खातील व तुमचे दूध पितील.

  10. “त्या दिवशी नवीन द्राक्षारस पर्वतांवरून पाझरेल, आणि टेकड्यांवरून दूध वाहील; यहूदीयातील ओहोळांची कोरडी पात्रे पाण्याने भरून वाहतील आणि याहवेहच्या मंदिरातून एक झरा निघेल व तो शिट्टीमच्या खोर्‍यात पाणी पुरवेल.

  11. मी तुम्हाला दूध दिले, जड अन्न दिले नाही, कारण तुम्ही त्यासाठी तयार नव्हता आणि निश्चित त्यासाठी तुम्ही अजूनही तयार नाही.

  12. स्वतःच्या खर्चाने कोणता सैनिक सेवा करतो? द्राक्षमळा लावतो, पण द्राक्ष खात नाही असा कोणी आहे का? मेंढराचा कळप पाळून दूध पिणार नाही असा कोणी आहे का?

  13. वास्तविक आतापर्यंत तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होते, पण त्याऐवजी कोणीतरी तुम्हालाच परमेश्वराच्या वचनांची मूलतत्वे परत शिकविण्याची गरज आहे. तुम्हाला दूध हवे, जड अन्न नव्हे!

  14. आणि जो कोणी दुधावर जगतो तो अजून तान्हेबाळ आहे आणि तान्हेबाळ असल्यामुळे नीतिमत्वाच्या शिक्षणाविषयी अपरिचित आहे.

  15. नवीन जन्मलेल्या बालकांसारखे शुद्ध, आध्यात्मिक दुधाची इच्छा धरा म्हणजे तुम्ही तुमच्या तारणाच्या अनुभवामध्ये वाढत जाल.