Skip to content

Law बद्दल बायबलमधील वचने

175 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग तो म्हणाला, “हे कराराचे रक्त आहे, तो पाळावा म्हणून परमेश्वराने तुम्हाला आज्ञा दिली आहे.”

  2. आणि त्याच प्रकारे त्याने दोन्ही मंडप व विधींसाठी जी उपकरणे वापरली जात, त्यावरही रक्तसिंचन केले.

  3. खरे म्हणजे, नियमाप्रमाणे अंदाजे प्रत्येक वस्तू रक्तसिंचन करूनच शुद्ध करण्यात येई; आणि रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा होत नाही.

  4. मग हे आवश्यक होते की, स्वर्गीय गोष्टींचे प्रतिरूप या बलिदानांने शुद्ध करणे अगत्याचे होते, परंतु स्वर्गीय गोष्टी याहून चांगल्या बलिदानांने शुद्ध करणे अगत्याचे अगत्य होते.

  5. ख्रिस्ताने मानवी हाताने बांधलेल्या पवित्र मंदिरात प्रवेश केला नाही कारण ते खर्‍या मंदिराची केवळ नक्कल होती; आपल्यावतीने परमेश्वराच्या समक्षतेत उपस्थित राहण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष स्वर्गात प्रवेश केला आहे.

  6. नियमशास्त्र ज्या येणार्‍या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची छाया आहे—त्याचे खरे स्वरूप नाही. या कारणासाठी ते प्रतिवर्षी नित्य अर्पण केल्या जाणार्‍या त्याच यज्ञांनी उपासनेसाठी येणार्‍यांना परिपूर्ण करण्यास केव्हाही समर्थ ठरत नाही.

  7. तसे झाले असते, तर एकच अर्पण पुरेसे नव्हते काय? उपासक कायमचे शुद्ध झाले असते तर त्यांची दोषाची भावना नाहीशी झाली असती.

  8. पण त्यांनी त्यांच्या पापांची प्रतिवर्षी त्यांना आठवण करून दिली.

  9. कारण बैलांचे व शेळ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे.

  10. यास्तव, जेव्हा ख्रिस्त जगात आले तेव्हा ते म्हणाले, “यज्ञ किंवा अर्पणे यांची इच्छा तुम्हाला नाही, परंतु तुम्ही माझ्यासाठी एक शरीर तयार केले;

  11. होमार्पण व पापार्पण यांनी तुम्हाला संतोष झाला नाही.

  12. मग मी म्हणालो, ‘मी येथे आहे; शास्त्रलेखात माझ्याविषयी लिहिले आहे, हे माझ्या परमेश्वरा तुमची इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे.’ ”

  13. ते प्रथम म्हणाले, “बली आणि दाने, होमार्पणे आणि पापार्पणाची तुम्हाला इच्छा नाही व त्यात तुम्हाला संतोष नाही;” जरी ते नियमानुसार अर्पण करत होते.

  14. नंतर ते म्हणाले, “हा मी येथे आहे, तुमच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.” दुसरी व्यवस्था स्थापन करून त्यांनी पहिली व्यवस्था रद्द केली.

  15. आणि त्या इच्छेद्वारे आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देह बलिदानाद्वारे पवित्र केलेले आहोत.

  16. प्रत्येक याजक प्रतिदिवशी धार्मिक कामे करत आणि जे यज्ञ पापे दूर करावयाला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करत उभा असतो.

  17. परंतु या याजकाने पापांसाठी सार्वकालिक असे एकच बली अर्पण करून ते परमेश्वराच्या उजव्या हाताशी बसले आहेत.

  18. आणि त्या वेळेपासून त्यांचे शत्रू त्यांचे पायासन होईपर्यंत वाट पाहत आहेत.

  19. कारण एकाच यज्ञामुळे ज्यांना ते पवित्र करीत आहे, त्या सर्वांना त्यांनी परिपूर्ण केले आहे.

  20. याबाबत पवित्र आत्मा आपल्याला साक्ष देतो, प्रथम त्यांनी म्हटले:

  21. “मी त्यांच्याबरोबर करार करेन तो असा, प्रभू म्हणतात त्या वेळेनंतर, मी माझे नियम त्यांच्या मनात ठेवेन आणि ते मी त्यांच्या हृदयावर लिहेन.”

  22. मग पुढे ते म्हणतात, “त्यांची पापे व नियमबाह्य कृत्ये यापुढे मी स्मरणार नाही.”

  23. आणि जिथे क्षमा झालेली आहे, तिथे पापांसाठी आणखी यज्ञ करण्याची मुळीच गरज नाही.

  24. पेटलेला अग्नी, काळोख व वादळांनी वेढलेल्यास स्पर्श करू शकाल अशा पर्वताजवळ तुम्ही आला नाही.

  25. तिथे रणशिंगाचा इतका भयावह नाद झाला व भयप्रद संदेश देणारी एक वाणी ऐकू आली की लोकांनी परमेश्वराला त्यांचे बोलणे थांबविण्याची याचना केली.