Skip to content

Friendship बद्दल बायबलमधील वचने: General references

31 वचने · 1 पैलू

General references बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जर तुमचा स्वतःचा बंधू किंवा तुमचे पुत्र किंवा कन्या किंवा तुमची प्रिय पत्नी किंवा जिवलग मित्र तुम्हाला गुप्तपणे भुरळ पाडेल व म्हणेल, “चल, आपण जाऊ आणि इतर दैवतांची उपासना करू” (ज्यांना तुम्ही वा तुमचे पूर्वज ओळखत नाहीत,

  2. जे तुमच्या शेजार्‍यांचे देव आहेत, ते जवळ असो वा दूर, त्या भूमीच्या एका टोकापासून असो वा दुसर्‍या टोकापर्यंत),

  3. तर त्यांना संमती देऊ नका किंवा त्यांचे ऐकू नका. त्यांची गयही करू नका. त्यांना वाचवू नका किंवा संरक्षण देऊ नका.

  4. तर त्यांना अवश्य जिवे मारावे. त्यांना मृत्युदंड देत असताना, त्यांच्यावर तुमचा हात सर्वप्रथम पडला पाहिजे आणि त्यानंतर इतर लोकांचे हात पडावेत.

  5. “जो कोणी मित्रावर दया करण्यापासून स्वतःस आवरतो त्याने सर्वसमर्थाचे भय सोडून दिले आहे.

  6. माझे बंधुजन खंडित झालेल्या ओढ्याप्रमाणे, वाहून जाणार्‍या ओहोळाप्रमाणे दगा देणारे आहेत

  7. “माझे बंधुजन त्यांनी माझ्यापासून दूर केले आहेत; माझे परिचित मला अगदी परके झाले आहेत.

  8. माझे नातलग माझ्यापासून दूर गेले आहेत; माझ्या जिवलग मित्रांना माझा विसर पडला आहे.

  9. माझे पाहुणे आणि माझ्या सेविका सुद्धा मला परके मानतात; अनोळखी माणसाप्रमाणे ते माझ्याकडे बघतात.

  10. मी माझ्या सेवकाला आज्ञा करतो, आणि माझ्या मुखाने त्याला विनवणी करतो, परंतु तो उत्तर देत नाही.

  11. माझ्या पत्नीसाठी माझा श्वास किळसवाणा झाला आहे; माझ्या परिवारासाठी मी घृणास्पद असा आहे.

  12. लहान मुलेदेखील माझी निंदा करतात; मी दिसलो तरी ते माझा अपमान करतात.

  13. माझ्या जिवलग मित्रांनादेखील माझा वीट येतो; ज्यांच्यावर मी प्रीती केली, तेही माझ्यावर उलटले.

  14. मी आता फक्त हाडे व कातडी असा उरलो आहे; आणि मृत्यूच्या संकटातून थोडक्यात निभावून गेलो आहे.

  15. “माझ्यावर दया करा, माझ्या मित्रांनो, माझ्यावर दया करा, कारण परमेश्वराच्या हाताने माझ्यावर प्रहार केला आहे.

  16. परमेश्वराने करावा असा तुम्हीही माझा छळ का करता? माझ्या वेदना पाहून तुमचे समाधान झाले नाही काय?

  17. ते आजारी असताना, मी गोणपाट नेसून शोक केला; नम्र होऊन मी त्यांच्यासाठी उपास केले. परंतु माझ्या प्रार्थना उत्तर न मिळताच माझ्याकडे परत आल्या.

  18. मी असा विलाप केला जणू काय मी माझ्या मित्रासाठी किंवा भावासाठी विलाप करीत आहे. मी असा शोक केला जसा मी माझ्या आईसाठी शोक करीत आहे.

  19. ज्याने माझी निंदा केली, तो काही माझा शत्रू नव्हता; असता तर मी ते सहन केले असते; मी लपून बसलो असतो आणि निसटून गेलो असतो.

  20. परंतु माझी निंदा करणारा तूच होतास, माझ्यासारखाच मनुष्य, माझा सोबती आणि माझा जिवलग मित्र,

  21. जेव्हा आम्ही आराधकांसह चालत होतो, तेव्हा त्याच्यासोबत परमेश्वराच्या भवनातील मधुर सहभागितेचा मी आनंद घेतला होता.

  22. तापट माणसांची मैत्री करू नका, जो शीघ्रकोपी आहे त्याच्याबरोबर राहू नका,

  23. नाहीतर तुम्ही त्यांचाच कित्ता गिरवाल, आणि तुम्ही स्वतःच आपला जीव पाशात घालाल.

  24. वचन देऊन हात मिळवणी करणार्‍यासारखे तुम्ही होऊ नका किंवा कर्जाचे जामीन होऊ नका;

  25. जर तुमच्याकडे कर्ज फेडण्यास पैसे नसतील तर ते तुमचे अंथरूणसुद्धा काढून घेतील.