Skip to content

Fasting बद्दल बायबलमधील वचने: Unclassified scriptures relating to

19 वचने · 41 पैलू

Unclassified scriptures relating to बद्दल वचने

  1. आम्ही अहवा कालव्याच्या किनारी असतानाच मी जाहीर केले की सर्वांनी उपवास करावा, म्हणजे आपल्या परमेश्वरासमोर आपण स्वतःला नम्र करून, त्यांनी आमचे व आमच्या मुलाबाळांचे व मालमत्तेचे प्रवासात संरक्षण करावे अशी प्रार्थना करावी.

  2. कारण प्रवासात शत्रूपासून संरक्षण मिळावे म्हणून राजाजवळ सैनिक व स्वार मागण्याची मला लाज वाटली. आम्ही राजाला आधीच सांगितले होते, “जे आमच्या परमेश्वराची भक्ती करतात, त्यांचा वरदहस्त त्यांच्यावर असतो आणि जे त्यांना सोडतात, त्यांच्यावरच अरिष्ट येते.”

  3. म्हणून आम्ही उपास केला आणि आमची काळजी घेण्याबद्दल परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्यांनी आमचे रक्षण केले.

  4. ते म्हणतात, ‘आम्ही उपास केला, पण तुम्ही बघितलेही नाही? आम्ही नम्र झालो, आणि तुम्ही त्याकडे लक्षही दिले नाही?’ “तरी तुमच्या उपासाच्या दिवशी, तुम्ही मनाला वाटेल तसे करता आणि तुमच्या कामगारांची पिळवणूक करता.

  5. तुमचे उपास कलह व भांडणाने आणि एकमेकांशी दुष्टपणे मारामारी करण्याने संपतात. तुम्ही जसा उपास करता, तसा आता करून तुमचा आवाज उच्चस्थानी ऐकला जाईल अशी अपेक्षा करता.

  6. असा उपास मी निवडला आहे काय, लोकांनी नम्र होण्याचा एक दिवस? केवळ वार्‍याने लवणार्‍या लव्हाळ्याप्रमाणे वाकण्याकरिता, आणि गोणपाट नेसून राख फासण्याकरिता? यालाच तुम्ही उपास म्हणता का, याहवेहला असा दिवस मान्य असेल काय?

  7. “मी निवडलेला उपास याप्रकारचा नाही का: अन्यायाची बंधने तुटली जावी आणि जोखडाचे बंद सोडावे, पीडितांना मुक्त करावे आणि प्रत्येक जोखड तोडून टाकला जावा?

  8. भुकेल्यांना तुमच्या अन्नात तुम्ही वाटेकरी करू नये काय व निराश्रितांना आश्रय द्यावा— जेव्हा तुम्ही निर्वस्त्राला बघाल, त्याला पांघरूण घाला, आणि आपल्या रक्त व मांसाच्या बाधवांना दूर लोटावे का?

  9. त्यावेळेस मी, दानीएल, तीन आठवडे शोक करीत होतो.

  10. मी माझे आवडते भोजन केले नाही; मी मांस खाल्ले नाही वा द्राक्षारस आपल्या ओठाला लावले नाही; तीन आठवडे पूर्ण होईपर्यंत मी तेलाचा अभ्यंगसुद्धा केले नाही.

  11. तरी आताही याहवेह म्हणतात, तुम्ही आपल्या संपूर्ण अंतःकरणाने, उपास, आक्रंदन व शोक करीत मजकडे परत या.

  12. तुमची वस्त्रे फाडून नव्हे, तर तुमचे अंतःकरण फाडा. याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत या, कारण ते कृपाळू व दयाळू आहेत. ते मंदक्रोध आणि अधिक प्रीती करणारे आहेत, आणि ते विपत्तीविषयी अनुताप करतात.

  13. “तुम्ही उपास करता त्यावेळी, ढोंग्याप्रमाणे उदास चेहरा करू नका. आपण उपास करीत आहोत असे लोकांना दाखविण्यासाठी ते कोमेजलेल्या चेहर्‍यांनी वावरतात. मी तुम्हाला खरोखरच सांगतो की, त्यांचे संपूर्ण प्रतिफळ त्यांना मिळून चुकले आहे.

  14. तुम्ही उपास करता तेव्हा डोक्याला तेल लावा व आपले तोंड धुवा,

  15. म्हणजे तुम्ही उपास करीत आहात असे लोकांना समजणार नाही. पण केवळ तुमच्या अदृश्य पित्याला समजेल आणि मग तुमचा पिता जे तुम्ही गुप्त प्रकारे केलेल्या गोष्टी पाहतात ते तुम्हाला प्रतिफळ देतील.

  16. एके दिवशी बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचे शिष्य येशूंकडे आले आणि त्यांनी त्यांना प्रश्न केला, “गुरुजी, आम्ही आणि परूशी लोक उपास करतो तसे तुमचे शिष्य का करत नाहीत?”

  17. येशूंनी उत्तर दिले, “वराचे पाहुणे वर त्यांच्याबरोबर असताना शोक कसे करू शकतात? परंतु अशी वेळ येत आहे की, वर त्यांच्यापासून काढून घेण्यात येईल आणि मग ते उपास करतील.

  18. पहाट होण्यापूर्वी पौलाने प्रत्येकाला अन्न खाण्यासाठी विनंती केली. तो म्हणाला, “आज चौदा दिवसापासून, अनिश्चित अशा मनःस्थितीत तुम्ही उपाशी राहिला आहात, काहीही खाल्ले नाही.

  19. आता मी विनंती करतो की थोडेतरी खा म्हणजे तुमचा बचाव होईल कारण तुम्हातील कोणाच्या डोक्याच्या एकाही केसाचा नाश होणार नाही.”