Skip to content

Ephesus बद्दल बायबलमधील वचने

45 वचने · 8 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पौल करिंथ येथे काही काळ राहिला. नंतर त्याने तेथील विश्वासणार्‍या बंधू व भगिनींचा निरोप घेतला आणि प्रिस्किल्ला व अक्विलाला बरोबर घेऊन तो सीरियाला जाण्यासाठी जलप्रवासास निघाला. परंतु या प्रवासाला निघण्याआधी, किंख्रिया या ठिकाणी पौलाने आपल्या डोक्याचे मुंडण करून घेतले, कारण त्याने नवस केलेला होता.

  2. इफिसमध्ये पोहोचल्यावर, पौलाने प्रिस्किल्ला व अक्विलाला तिथेच सोडले. तो स्वतः तेथील सभागृहामध्ये गेला आणि त्याने तेथील यहूदी लोकांबरोबर युक्तिवाद गेला.

  3. जेव्हा त्यांनी पौलाला विनंती केली की, त्याने त्यांच्याबरोबर अधिक वेळ घालवावा, परंतु पौलाने ते नाकारले.

  4. परंतु निघताना मात्र त्याने त्यांना वचन दिले, “परमेश्वराची इच्छा असेल, तर मी पुन्हा येईन.” मग इफिस सोडून जलमार्गाने तो निघाला.

  5. जेव्हा तो कैसरीया येथे पोहोचला, तेव्हा तिथून तो वर यरुशलेमकडे आला आणि तेथील मंडळीला अभिवादन करून तो अंत्युखियास गेला.

  6. अंत्युखियामध्ये थोडा काळ घालविल्यानंतर, तिथून पौल बाहेर पडला आणि गलातीया व फ्रुगिया या प्रांतामधून ठिकठिकाणी प्रवास करीत तेथील सर्व शिष्यांना त्याने प्रोत्साहित केले.

  7. त्याचवेळी आलेक्सांद्रियाचा रहिवासी, अपुल्लोस नावाचा यहूदी इफिस येथे आला होता. तो एक विद्वान मनुष्य होता आणि त्याला शास्त्रलेखाचे सखोल ज्ञान होते.

  8. प्रभूच्या मार्गाचे शिक्षण त्याला देण्यात आलेले होते आणि तो आवेशाने बोलत होता, जरी त्याला फक्त योहानाच्या बाप्तिस्म्याबद्दल माहिती होती, तरी येशूंबद्दल अचूक शिक्षण देत होता.

  9. तो धैर्याने सभागृहामध्ये बोलू लागला. जेव्हा प्रिस्किल्ला आणि अक्विला यांनी त्याचा संदेश ऐकला, तेव्हा त्यांनी त्याला त्यांच्या घरी आमंत्रित केले आणि परमेश्वराचा मार्ग त्याला अधिक स्पष्टपणे समजावून सांगितला.

  10. जेव्हा अपुल्लोसला अखया येथे जायचे होते, तेव्हा बंधू व भगिनींनी त्याला उत्तेजन दिले व अखया येथील शिष्यांनी त्याचे स्वागत करावे असे विनंती पत्र त्याच्या हाती देऊन त्याचा निरोप घेतला. जेव्हा तो तिथे आला, तेव्हा कृपेद्वारे ज्यांनी विश्वास ठेवला होता त्यांना त्याची फार मोठी मदत झाली.

  11. कारण सार्वजनिक वाद करून त्याने अतिशय सशक्तपणे यहूदीयांच्या सर्व वादांचे खंडन केले आणि शास्त्राच्या आधाराने त्यांच्या निदर्शनास आणून दिले की, येशू हेच ख्रिस्त आहेत.

  12. काही यहूदी प्रभू येशूंचे नाव घेऊन फिरत होते आणि ज्यांना दुरात्म्यांनी पछाडलेले होते त्यांना मुक्त करण्याचा प्रयत्न करीत होते. ते असे म्हणत होते, “ज्या येशूंच्या नावाची पौल घोषणा करीत आहे, त्या नावाने मी तुला आज्ञा करतो की याच्यामधून बाहेर नीघ.”

  13. स्कवा, हा यहूदी मुख्य याजक असून त्याचे सात पुत्र हे काम करीत होते.

  14. एके दिवशी त्या दुरात्म्याने त्यांना म्हटले, “येशू मला माहीत आहे आणि पौलही मला माहीत आहे, परंतु तुम्ही कोण आहात?”

  15. मग ज्या मनुष्यास दुरात्मा लागला होता त्याने त्यांच्यावर उडी मारली आणि त्याच्या शक्तीने त्या सर्वांना शरण आणले. त्यांना अशी मारपीट केली की ते उघडेनागडे व घायाळ होऊन त्या घरातून पळून गेले.

  16. आशिया प्रांतामध्ये फार दिवस राहावे लागू नये म्हणून इफिस शहराच्या पुढे जाण्याचे पौलाने ठरविले होते, कारण शक्य झाल्यास पेन्टेकॉस्टच्या दिवसांच्या वेळी यरुशलेममध्ये पोहोचावे, या दृष्टीने तो घाई करीत होता.

  17. मिलेताहून पौलाने इफिस येथील मंडळीच्या वडीलजनांना निरोप पाठविला.

  18. ते आल्यानंतर त्याने त्यांना म्हटले, “मी आशियात आल्यानंतर पहिल्या दिवसापासून पूर्णवेळ तुम्हाबरोबर नेहमी कसा होतो व कसा राहिलो, याची तुम्हाला जाणीव आहे.

  19. म्हणजे फार नम्रतेने, आसवे गाळीत आणि माझ्या यहूदीयांच्या कटांमुळे मजवर आलेली अतिशय कठीण परीक्षा व संकटे सोशीत मी प्रभूची सेवा कशी केली, हे तुम्हाला माहीत आहे.

  20. जे तुमच्यासाठी हितकारक आहे, त्याचा प्रचार करण्यास उशीर अथवा कुरकुर केली नाही, परंतु लोकांमध्ये उघडपणे आणि घरोघरी जाऊन शिक्षण दिले.

  21. त्यांनी पश्चात्ताप करून परमेश्वराकडे वळणे आवश्यक आहे आणि आपल्या प्रभू येशूंवर विश्वास ठेवावा याविषयी यहूदी व गैरयहूदी लोकांमध्ये मी घोषणा करीत आलो आहे.

  22. “आणि आता, जसे आत्म्याद्वारे मला यरुशलेमकडे जाण्यास भाग पाडले जात आहे. तिथे माझ्याबाबतीत काय होणार आहे याची मला जाणीव नाही.

  23. मला माहीत आहे की प्रत्येक शहरामध्ये तुरुंगवास व यातना यांना मला तोंड द्यावे लागणार आहे, असा इशारा पवित्र आत्मा मला देत आहे.

  24. तरीपण, माझे जीवन माझ्याकरिता मोलाचे नाही; माझे एकच ध्येय आहे की धाव संपविणे व जे कार्य प्रभू येशूंनी मला दिले आहे ते पूर्ण करणे म्हणजे परमेश्वराने जी कृपा केली आहे, त्याची शुभवार्ता इतरांना सांगणे हे होय.

  25. “आणि आता मला माहीत झाले आहे की ज्या तुम्हामध्ये मी परमेश्वराच्या राज्याचा प्रचार करीत फिरत होतो, त्या तुम्ही मला पुन्हा पाहणार नाही.