मुख्य मजकुरावर जा

Ephesus बद्दल बायबलमधील वचने: Sceva's sons attempt to expel a demon in

4 वचने · 8 पैलू

Sceva's sons attempt to expel a demon in बद्दल वचने

  1. काही यहूदी प्रभू येशूंचे नाव घेऊन फिरत होते आणि ज्यांना दुरात्म्यांनी पछाडलेले होते त्यांना मुक्त करण्याचा प्रयत्न करीत होते. ते असे म्हणत होते, “ज्या येशूंच्या नावाची पौल घोषणा करीत आहे, त्या नावाने मी तुला आज्ञा करतो की याच्यामधून बाहेर नीघ.”

  2. स्कवा, हा यहूदी मुख्य याजक असून त्याचे सात पुत्र हे काम करीत होते.

  3. एके दिवशी त्या दुरात्म्याने त्यांना म्हटले, “येशू मला माहीत आहे आणि पौलही मला माहीत आहे, परंतु तुम्ही कोण आहात?”

  4. मग ज्या मनुष्यास दुरात्मा लागला होता त्याने त्यांच्यावर उडी मारली आणि त्याच्या शक्तीने त्या सर्वांना शरण आणले. त्यांना अशी मारपीट केली की ते उघडेनागडे व घायाळ होऊन त्या घरातून पळून गेले.