Skip to content

Creditor बद्दल बायबलमधील वचने

63 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “तुम्ही जर एखादा इब्री गुलाम विकत घेतला, तर त्याने तुमची सहा वर्षे सेवा करावी. परंतु सातव्या वर्षी तो काहीही भरपाई न घेता स्वतंत्र होईल.

  2. जर तो एकटाच आला, तर तो एकटाच स्वतंत्र जाईल; परंतु तो आपल्या पत्नीसोबत आला तर तीसुद्धा त्याच्याबरोबर जाईल.

  3. जर गुलाम असताना त्याच्या मालकाने त्याचे लग्न करून दिले आणि त्याला मुले व मुली झाले, तर ती स्त्री व तिची लेकरे त्या मालकाच्या हक्काची राहतील आणि तो मनुष्य एकटाच स्वतंत्र केला जाईल.

  4. “पण जर तो गुलाम जाहीर करतो की, मी माझ्या मालकावर, माझ्या पत्नीवर व माझ्या लेकरांवर प्रीती करतो आणि तुम्हाला सोडून जाण्याची माझी इच्छा नाही,

  5. तर त्याच्या मालकाने त्याला न्यायाधीशांसमोर आणावे. मग त्याने त्याला दरवाजाकडे किंवा दरवाजाच्या चौकटीजवळ आणावे व आरीने त्याचा कान टोचावा. यानंतर तो त्याचा जीवनभर गुलाम म्हणून राहील.

  6. “तुमच्यामध्ये असलेल्या माझ्या गरजवंत लोकांना जर तुम्ही उसने पैसे दिले, तर त्यांच्याशी सावकारी व्यवहार करू नका; व व्याज लावू नका.

  7. तुम्ही आपल्या शेजार्‍याचे पांघरूण मागून घेतले, तर सूर्यास्तापूर्वी ते परत करा,

  8. कारण तुमच्या शेजार्‍याजवळ पांघरावयाला तेवढेच असेल, तर ते रात्री काय घेऊन झोपतील? आणि जेव्हा ते माझ्याकडे धावा करतील, तेव्हा मी त्यांचे ऐकेन, कारण मी दयाळू आहे.

  9. “ ‘यासाठी की तुम्ही जेव्हा आपल्या लोकांना जमीन विकाल किंवा त्याच्याकडून विकत घ्याल, तेव्हा तुमच्याकडून अन्यायाचा व्यवहार होऊ नये.

  10. योबेल वर्षानंतरच्या वर्षांच्या संख्येच्या आधारावर तुम्ही तुमच्या लोकांकडून विकत घ्यावयाची आणि पीक कापणीसाठी किती वर्षे शिल्लक आहेत या आधारावर त्याची तुम्हाला विक्री करावयाची आहे.

  11. जर वर्षे अनेक असतील तर जमिनीची किंमत त्या मानाने जास्त असेल, परंतु ही वर्षे थोडी असल्यास तिची किंमत त्या मानाने कमी असेल; कारण खरोखर विक्री जमिनीची होत नाही, तर ती जमीन किती वेळा पिके देऊ शकेल यावर तिची किंमत अवलंबून राहील.

  12. एकमेकांचा गैरफायदा घेऊ नका, तर तुमच्या परमेश्वराचे भय बाळगा. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.

  13. “ ‘जर तुमच्या कोणी इस्राएल बंधूला दारिद्र्य आले आणि ते तुमच्यामध्ये स्वतःचे पालनपोषण करू शकत नसतील, तर जसे तुम्ही परदेशी आणि परक्यांना मदत कराल तशी त्यांना करा, जेणेकरून ते तुमच्यामध्ये राहतील.

  14. परमेश्वराची भीती बाळगावी आणि तुमच्या बंधूला तुमच्या घरात राहू द्यावे. त्याला उसने म्हणून दिलेल्या पैशावर तुम्ही व्याज घेऊ नये.

  15. तुम्ही त्यांना व्याजाने पैसे देऊ नयेत किंवा जे खाद्यपदार्थ तुम्ही त्यांना विकाल त्यावर नफा घेऊ नये.

  16. कर्जमाफीची प्रक्रिया अशी असावी: प्रत्येक सावकाराने आपल्याजवळ असलेल्या कोणाही इस्राएली बंधूचे कर्ज माफ करावे. त्यांना स्वतःच्या लोकांपैकी कोणाकडूनही पैसे घ्यावे लागणार नाहीत, कारण कर्जाची फेड करण्याची वेळ याहवेहने घोषित केली आहे.

  17. परदेशी पासून असलेले कर्ज तुम्हाला वसूल करता येईल, परंतु तुमच्याच बांधवांची देणी तुम्ही मुळीच वसूल करू नयेत.

  18. तुमच्या इस्राएली बंधूला दिलेल्या कर्जावर व्याज मागू नका, मग ते कर्ज पैशाच्या, अन्नाच्या अथवा दुसर्‍या कशाच्याही रूपाने दिलेले असो, त्याच्यावर व्याज मागू नका.

  19. तुम्ही एखाद्या परदेशीकडून व्याज घेऊ शकता, पण कोणाही इस्राएली बांधवाकडून घेऊ नका, म्हणजे याहवेह तुमचे परमेश्वर जेव्हा तुम्हाला वतन म्हणून ज्या देशात आणतील, तेव्हा तुम्ही केलेल्या प्रत्येक कार्याला आशीर्वाद देतील.

  20. जेव्हा तुम्ही आपल्या शेजार्‍याला काही उसने देता, तर तारण घेण्यासाठी तुम्ही त्याच्या घरात शिरू नये,

  21. तुम्ही बाहेर उभे राहावे आणि ज्या शेजार्‍याला तुम्ही कर्ज देत आहात त्याने तुम्हाला बाहेर तारण आणून द्यावे.

  22. जर शेजारी गरीब असेल, तर तुम्ही त्याने तारण म्हणून दिलेले पांघरूण अंगावर घेऊन झोपू नका.

  23. गहाणादाखल त्याने आपले पांघरूण दिले असेल व तर सूर्यास्तसमयी ते त्याला परत करावे म्हणजे ते पांघरूण अंगावर घेऊन तो झोपेल. तो तुमचे आभार मानेल आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने तुमचे हे कृत्य नीतिमत्व असे ठरेल.

  24. काही काळानंतर स्त्रीपुरुषांनी आपल्या यहूदी बांधवांविरूद्ध तक्रार करण्यास सुरुवात केली.

  25. काहीजण म्हणाले, “आम्ही व आमचे पुत्र व कन्या असे बरेच लोक आहोत आणि जिवंत राहण्यासाठी आम्हाला धान्याची गरज आहे.”