Skip to content

Communion With God बद्दल बायबलमधील वचने

28 वचने · 39 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तिथे याकोब एकटाच होता. त्याचवेळी कोणा पुरुषाने सूर्योदय होईपर्यंत त्याच्याशी झोंबी केली.

  2. याकोबावर जय मिळणे शक्य नाही, असे पाहून त्या पुरुषाने याकोबाच्या जांघेवर प्रहार केला आणि तो सांधा त्याने उखडून टाकला.

  3. मग तो याकोबाला म्हणाला, “मला आता जाऊ दे, कारण पहाट होत आहे.” पण याकोब म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिल्यावाचून मी तुला जाऊ देणार नाही.”

  4. मग त्याने याकोबास विचारले, “तुझे नाव काय आहे?” तेव्हा त्याने उत्तर दिले, “याकोब.”

  5. यावर तो मनुष्य म्हणाला, “आता तुझे नाव याकोब राहणार नाही, तर ‘इस्राएल’ असे पडेल; कारण तू परमेश्वराशी व मनुष्याशीही संघर्ष करून यशस्वी झाला.”

  6. मग याकोबाने त्याला विचारले, “कृपया आपले नाव मला सांगा.” तेव्हा तो म्हणाला, “तू मला माझे नाव का विचारतोस?” मग त्याने याकोबाला आशीर्वाद दिला.

  7. जसा एखादा व्यक्ती आपल्या मित्राशी बोलतो तसे याहवेह मोशेशी समोरासमोर बोलत असत. मग मोशे छावणीकडे परत जात असे, परंतु त्याचा तरुण सहकारी, नूनाचा पुत्र यहोशुआ हा मंडप सोडून जात नसे.

  8. मग मोशे याहवेहशी बोलला, “तुम्ही मला सांगत आला, ‘या लोकांना चालव,’ परंतु माझ्याबरोबर तुम्ही कोणाला पाठविणार हे तुम्ही मला सांगितले नाही. तुम्ही म्हणाला, ‘मी तुला नावाने ओळखतो आणि तू माझ्या दृष्टीने कृपा पावला आहेस.’

  9. जर तुम्ही माझ्यावर संतुष्ट असाल, तर मला तुमचे मार्ग शिकवा, यासाठी की मी तुम्हाला जाणून तुमच्या दृष्टीत कृपा पावावी. हे स्मरणात असू द्या की हे राष्ट्र तुमचे लोक आहेत.”

  10. यावर याहवेहने उत्तर दिले, “माझी समक्षता तुझ्याबरोबर जाईल आणि मी तुला विसावा देईन.”

  11. मग मोशे याहवेहला म्हणाला, “जर तुमची समक्षता आमच्याबरोबर गेली नाही, तर आम्हाला येथून पुढे पाठवू नका.

  12. तुम्ही आम्हाबरोबर आला नाही, तर माझ्यावर आणि आपल्या लोकांवर तुमची कृपादृष्टी झाली आहे की नाही हे कसे कळणार? मी व तुमचे लोक पृथ्वीवरील इतर सर्व लोकांपासून वेगळे आहोत हे कसे समजणार?”

  13. यावर याहवेहने मोशेला म्हटले, “जी गोष्ट तू माझ्याकडे मागितली आहे तीच मी करेन, कारण तुझ्यावर मी संतुष्ट आहे आणि मी तुला नावाने ओळखतो.”

  14. तेव्हा मोशेने विनंती केली, “आता मला तुमचे गौरव दाखवा.”

  15. आणि याहवेह म्हणाले, “मी माझे सर्व चांगुलपण तुझ्यापुढून चालवेन आणि याहवेह म्हणून माझ्या नावाची घोषणा मी तुझ्यासमक्ष करेन. ज्याच्यावर मला कृपा करावयाची त्याच्यावर मी कृपा करेन आणि ज्याच्यावर मला दया करावयाची त्याच्यावर मी दया करेन.”

  16. याहवेह म्हणाले, “पण तू माझा चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण मला पाहिल्यानंतर कोणीही मनुष्य जगत नाही.”

  17. मग याहवेह म्हणाले, “माझ्याजवळ एक जागा आहे, जिथे एका खडकावर तू उभा राहा.

  18. माझे गौरव जवळून जात असता, मी तुला खडकाच्या कपारीत ठेवेन आणि मी पार होईपर्यंत मी तुला माझ्या हाताने झाकीन.

  19. मग मी माझा हात काढून घेईन आणि तू माझी पाठ पाहशील; पण माझा चेहरा तुला दिसणार नाही.”

  20. दावीद जेव्हा महनाईम येथे पोहोचला, तेव्हा अम्मोन्यांच्या राब्बाह येथील नाहाशाचा पुत्र शोबाई आणि लो-देबार येथील अम्मीएलाचा पुत्र माखीर आणि रोगलीम येथील गिलआदी बारजिल्लई यांनी

  21. दावीद आणि त्याच्या लोकांसाठी बिछाने आणि पात्रे, मातीची भांडी आणली. त्यांना खाण्यासाठी गहू व जव, पीठ आणि भाजलेली धान्ये, शेंगा व डाळी,

  22. मध व दही, मेंढरे आणि गाईच्या दुधाचा खवा, हे सुद्धा आणले. कारण ते म्हणाले, “रानात दावीद आणि त्याचे लोक थकलेले, भुकेले व तहानलेले झाले असतील.”

  23. आणि मी पित्याजवळ मागेन, ते तुम्हाला मदत करण्यासाठी दुसरा कैवारी देतील, जो तुम्हाबरोबर सर्वकाळ राहील—

  24. सत्याचा आत्मा. त्याला जग स्वीकारणार नाही, कारण जग त्याला पाहत नाही व ओळखत नाही. परंतु तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो आणि तुम्हामध्ये राहील.

  25. मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही; मी तुमच्याकडे येईन.