मुख्य मजकुरावर जा

Civil Officer बद्दल बायबलमधील वचने

32 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अहीमाजकडे नफताली होते (त्याने शलोमोनची कन्या बासमाथ हिच्याशी विवाह केला होता);

  2. हूशाईचा पुत्र बआना आशेर आणि बालोथवर;

  3. पारुआहचा पुत्र यहोशाफाट हा इस्साखारमध्ये होता;

  4. एलाचा पुत्र शिमी हा बिन्यामीन प्रांतावर.

  5. उरीचा पुत्र गेबेर हा गिलआद प्रांतावर (अमोर्‍यांचा राजा सीहोन आणि बाशानचा राजा ओग यांचा प्रदेश). त्या जिल्ह्यावर तो एकटाच अधिकारी होता.

  6. परंतु इस्राएली लोकांपैकी कोणावरही शलोमोनने गुलामी लादली नाही; ते त्याचे योद्धे, त्याचे सरकारी अधिकारी, सरदार, सेनापती व त्याच्या रथांचे व रथस्वारांचे अधिकारी होते.

  7. आणि एज्रा, तुला परमेश्वराने दिलेली सुज्ञता वापरून परमेश्वराच्या नियमाचे पालन करणाऱ्या न्यायाधीश व इतर अधिकारी यांची निवड आणि नेमणूक करावी. हे अधिकारी फरात नदीच्या पश्चिमेकडील भागात न्यायदान करतील. जर त्यांना तुमच्या परमेश्वराचे नियम माहीत नसतील, तर तू ते त्यांना शिकवावे.